Agriculture Weather
Agriculture Weather  Agrowon
हवामान

Weekly Weather : राज्यात हलक्या पावसाची शक्यता

 डॉ. रामचंद्र साबळे 

Agriculture Weather : महाराष्ट्रावरील हवेचे दाब आठवडाभर १००० ते १००४ हेप्टापास्कल इतके कमी राहण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर भारतातील ईशान्य भागावर हवेचे दाब ९९६ हेप्टापास्कल, तर उत्तरेकडील राजस्थान व काश्मीर भागावर हवेचे दाब ९९० हेप्टापास्कल इतके राहण्याची शक्यता आहे. मात्र, अद्यापही मॉन्सून वारे उत्तरेच्या दिशेने

वेगाने पुढे जात नसल्याने मॉन्सूनचा जोर कमी झाल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. अद्याप मॉन्सून पूर्व विदर्भ व मध्य विदर्भाच्या उत्तरेकडील

भागावर पोहोचलेला नाही. त्यामुळे त्याची प्रगती अतिशय धीम्या गतीने होताना दिसते आहे. आतापर्यंत मॉन्सून वाऱ्यांनी गुजरात व मध्य प्रदेशचा भाग व्यापून उत्तर प्रदेशमध्ये दाखल होणे अपेक्षित होते. मात्र तशी स्थिती अद्यापतरी दिसून आलेली नाही.

कमाल व किमान तापमानात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ ते ३६ अंश सेल्सिअसवर, तर किमान तापमान २३ ते २६ अंश सेल्सिअसवर स्थिरावले आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांत आकाश पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहेत. वाऱ्याचा ताशी वेग उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रात ताशी १४ ते १९ कि.मी. इतका अधिक राहण्याची शक्यता आहे.

प्रशांत महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान विषुववृत्तीय भागात १६ ते २५ अंश सेल्सिअस, तर हिंदी महासागराच्या विषुववृत्तीय भागात ते ३१ अंश सेल्सिअस इतके अधिक राहण्याची शक्यता आहे. अरबी समुद्र व बंगालच्या उपसागराच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअस राहील.

कोकण

आज आणि उद्या (ता.२३, २४) सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३३ ते ३६ मि.मी., रत्नागिरी जिल्ह्यात १८ ते २० मि.मी. पावसाची शक्यता आहे. मात्र रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ९ ते १० मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत नैॡत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत ९ ते १३ कि.मी. राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस, रायगड जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस, तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस, तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत आकाश पूर्णतः ढगाळ राहील. मात्र रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८१ ते ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५३ ते ७४ टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्र

आज आणि उद्या (ता.२३,२४) नाशिक व धुळे जिल्ह्यांत १ ते २ मि.मी., तर नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत ३ ते ५ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. सर्वच जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १६ ते १९ किमी राहील. कमाल तापमान नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअस, तर नंदुरबार जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नाशिक जिल्ह्यात ८२ टक्के, तर उर्वरित जिल्ह्यांत ६४ ते ७५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ४० ते ५० टक्के राहील.

मराठवाडा

आज आणि उद्या (ता.२३, २४) लातूर जिल्ह्यात १३ ते ३१ मि.मी., नांदेड जिल्ह्यात १० ते १७ मि.मी., बीड जिल्ह्यात ४५ मि.मी., परभणी जिल्ह्यात १७ मि.मी., धाराशिव जिल्ह्यात २७ मि.मी., तर हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत १० मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा धाराशिव व लातूर जिल्ह्यांत वायव्येकडून, तर नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत नैॡत्येकडून राहील. कमाल तापमान नांदेड, बीड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस, तर लातूर जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. कमाल तापमान धाराशिव व जालना जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस राहील. धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस, तर जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ३४ ते ३५ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० ते ८० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४० ते ५० टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ

आज आणि उद्या (ता.२३, २४) वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ७ ते ८ मि.मी., तर अकोला व बुलडाणा जिल्ह्यांत २ ते ३ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १४ कि.मी. राहील. कमाल तापमान बुलडाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस, तर अमरावती जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४४ ते ४७ टक्के राहील.

मध्य विदर्भ

आज आणि उद्या (ता.२३,२४) यवतमाळ जिल्ह्यात ३ ते ७ मि.मी., नागपूर जिल्ह्यात ४ ते ७ मि.मी., तर वर्धा जिल्ह्यात १ ते २ मि.मी. पावसाची शक्यता राहील. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १३ कि.मी. राहील. कमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील. वर्धा, नागपूर व यवतमाळ जिल्ह्यांत किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६६ ते ७० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४४ ते ४८ टक्के राहील.

पूर्व विदर्भ

आज आणि उद्या (ता.२३,२४) गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ५ ते ८ मि.मी., तर चंद्रपूर जिल्ह्यात २ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ११ कि.मी. राहील. कमाल तापमान गोंदिया जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७३ ते ८४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४५ टक्के राहील.

पश्‍चिम महाराष्ट्र

आज आणि उद्या (ता.२३, २४) कोल्हापूर जिल्ह्यात २.८ मि.मी., तर सोलापूर जिल्ह्यात ५.३ मि.मी. पावसाची शक्यता राहील. सांगली, सातारा, पुणे व नगर जिल्ह्यांत १ ते २ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत १४ ते २० कि.मी. राहील. कमाल तापमान कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस, तर नगर जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. कमाल तापमान सांगली व सोलापूर जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस, तर सोलापूर जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस, तर सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस आणि नगर जिल्ह्यात २५ सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७५ ते ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५१ टक्के राहील.

कृषी सल्ला

वांगी, ढोबळी मिरची, मिरची, टोमॅटो या पिकांच्या लागवडीसाठी गादीवाफ्यावर बियांची पेरणी करावी.

मूग, चवळी, उडीद लागवडीसाठी सुधारित जातींची निवड करावी.

लागवडीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया अवश्य करावी.

खरीप पिकांच्या पेरण्या जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतर कराव्यात.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Kharif Sowing : कांद्याचा पुरेसा स्टाॅक, लागवडीत २८ टक्के वाढ? कांद्याचे भाव नियंत्रणात राहतील असा सरकारचा विश्वास

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण योजने'त काळाबाजार आढळल्यास थेट कारवाई, पालकमंत्री मुश्रीफांचे पोलिसांना आदेश

Crop Insurance : राज्य सरकार पंतप्रधान पीक विमा योजनेला पर्याय का शोधत आहे ?

Farmer Registration : रेशीम शेतीसाठी पाचशे शेतकऱ्यांची नोंदणी

Ravikant Tupkar : 'काय कारवाई करायची ती खुशाल करा!'; तुपकरांचे थेट राजू शेट्टींना आव्हान

SCROLL FOR NEXT