Monsoon Rain
Monsoon Rain agrowon

Monsoon Rain : पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज; माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान; अनेक भागात पावसाची शक्यता

Weather Update : आज आणि उद्या राज्यात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज तर काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचाही अंदाज दिला.
Published on

Pune News : माॅन्सूनने काल प्रगती केल्यानंतर आज त्याच भागात मुक्काम केला होता. तर राज्याच्या अनेक भागात ढगाळ वातावरणासह पाऊस पडत आहे. हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. तर काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचाही अंदाज दिला. 

हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यभरात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. आज संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भात तसेच खानदेशात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर मध्य महाराष्ट्रात सांगली आणि नगर वगळता इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे. कोकणातील सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. 

Monsoon Rain
Rain Update : पावसाची उघडीपीने चिंता; पिकांना सोडले पाणी

उद्या सिंधुदूर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी अतिजोरदार तर अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला. रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील उर्वरित जिल्हे, तसेच मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील संपूर्ण जिल्ह्यांना ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.

Monsoon Rain
Rain Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाला सुरुवात

सोमवारी, मंगळवारी आणि बुधवारी विदर्भात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तसेच खानदेश, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यांना उद्या येलो अलर्ट देण्यात आला. तसेच सोमवारी, मंगळवारी आणि बुधवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. 

तर दुसरीकडे आज माॅन्सूनने प्रगती केली नव्हती. माॅन्सूनची सिमा आज नवसारी, जळगाव, मांडला, पेंद्रा रोड, झारसुगुंडा, बालासोर, हलदीया, पाकूर, साहीबगंज आणि रौक्सोल भागात होती. माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे ३ ते ४ दिवसांत महाराष्ट्राचा उर्वरित भाग माॅन्सून व्यापेल. तसेच अरबी समुद्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात माॅन्सून पोचेल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com