अॅग्रोवन वृत्तसेवा
Weather News : पुणे : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाला सुरुवात झाली आहे. कोकणातील रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये जोरदार, मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि विदर्भात अमरावती, वर्धा जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडला. दोडामार्ग येथे सर्वाधिक १७९ मिलिमीटर पाऊस झाला. या पावसामुळे खरीप पेरलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे. तर पेरण्यांनाही वेग येणार आहे.
राज्यातील कोकण, घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. रत्नागिरी जिल्ह्याला शुक्रवारी (ता. २१) मुसळधार पावसाने झोडपून काढले. चिपळूणमध्ये परशुराम घाटात संरक्षण भिंतीचा भराव कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्गावरून एकेरी वाहतूक सुरू होती. खेड येथील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडल्याने किनारी भागातील गावांना दक्षतेचा इशारा दिला आहे. तर राजापूर तालुक्यात शाळेचे छप्पर आणि संरक्षक भिंत कोसळून नुकसान झाले. मंडणगड, खेड, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूरमध्ये पावसाने चांगलेच धुतले. सिंधुदुर्गला संततधार पावसाने गुरुवारी (ता. २०) दुपारनंतर अक्षरशः झोडपून काढले. नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. शुक्रवारी सकाळपासून जिल्ह्यात हलक्या सरी सुरू होत्या.
मध्य महाराष्ट्रात नाशिक, पुणे, सोलापूर जिल्ह्यांत पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. तर सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक होता. बावडा येथे ८९.१ मिलिमीटर पाऊस पडला. घाटमाथ्यावर भात रोपवाटिकांना आधार मिळाला आहे. मराठवाड्यात पेरण्या वेगात सुरू आहेत. विदर्भातही पाऊस
सक्रिय होत आहे. गुरुवारी सायंकाळी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव येथे ५७.५ मिलिमीटर, यवतमाळमधील बाभूळगाव येथे ४८.५, नेरमध्ये ५४.२ वर्ध्यातील समुद्रपूर येथे ४७ मिलिमीटर पाऊस पडला.
८० मिलिमीटरहून अधिक पावसाची ठिकाणे
खेड १४६.९, दापोली १२१.२, चिपळूण १०७.४, कणकवली ११०.७, वैभववाडी १३८.८, सावंतवाडी ९७.३, कल्याण ८१.१, माणगाव ८८.४.
शुक्रवारी (ता.२१) सकाळी आठ वाजेपर्यंतचा केंद्रनिहाय पाऊस (मिमी) : स्रोत - कृषी विभाग
कोकण : ठाणे ६६.१, मुरबाड ६४.३, भिवंडी ७४.९, शहापूर ५४.२, उल्हासनगर ६१.८, अंबरनाथ ६६.२, पनवेल ६४.२, कर्जत ६३.३, सुधागड ४१.६, महाड ५२.८,
रोहा ४१.५, पोलादपूर ४१.९, म्हसळा ४२.८, तला ७२.५, गुहागर ४९.७, मंडणगड ५४.५, संगमेश्वर ५१.३, राजापूर ७३.०, लांजा ५१.१, देगवड ४१.७, वेंगुर्ला ४२.०,
कुडाळ ८२.७
मध्य महाराष्ट्र : अंमळनेर २६.२, जामखेड १५.६, वेल्हे १८.७, आंबेगाव १९, सातारा ३५.४, जावळी मेढा ४६, पाटण ७२.१, कराड ३०.७, कोरेगाव १५.१, वाई २१.३,
महाबळेश्वर ६८.४, शिराळा ३१.१, तासगाव २७.४, वाळवा २५.५, खानापूर २३.७, पलूस २६.६, कडेगाव २५.६, राधानगरी ८३.६, गडहिंग्लज २६,
भुदरगड ६४.४, आजरा ६०.९, चंदगड ५६.७
मराठवाडा : नांदेड १६.९, मुदखेड १२.१,
विदर्भ : अमरावती २२.१, चांदूर रेल्वे ४३.८, तिवसा १३.२, धामणगाव रेल्वे ३५, यवतमाळ ३५.२, बाभूळगाव ४८.५, कळम २६.३, दारव्हा ३८, दिग्रस २२.२, नेर ५४.२, वनी ३१, झारीझमणी २७.६,
राळेगाव २५.४, सेलू ३१.६, देवळी ३४.३, हिंगणघाट ४०.२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.