Weekly Weather : कमाल, किमान तापमान वाढण्यास सुरवात

Weather Update : पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची व दुपारची सापेक्ष आर्द्रता कमी राहील.
Weather
WeatherAgrowon

Agriculture Weather : महाराष्ट्रावरील हवेचे दाब या आठवड्यात १०१२ हेप्टापास्कल इतके कमी राहणार आहेत. जेव्हा कमाल व किमान तापमानात वाढ होते, तेव्हा हवेचे दाब कमी होतात. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मराठवाड्यातील धाराशिव, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची व दुपारची सापेक्ष आर्द्रता कमी राहील.

त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. सकाळी थंड व कोरडे हवामान, तर दुपारी उष्ण व कोरडे हवामान राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग साधारणच राहील. या वर्षी उन्हाळी हंगामाची चाहूल लवकरच सुरू होईल. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढेल. उन्हाळी हंगामातील पिकांना कमी पाणी उपलब्ध राहील.जनावरांसाठी चारा उत्पादनावर भर द्यावा लागेल. पिण्यासाठी पाणी कमी उपलब्ध असेल.

प्रशांत महासागराचे विषुववृत्तीय भागातील पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान बऱ्याच भागात २८ ते २९ अंश सेल्सिअस, तर काही ठिकाणी ते ३० अंश सेल्सिअस असल्याने एल निनोचा प्रभाव कमी झालेला आहे. त्यामुळे यापुढील काळात सुपर एल निनोची भीती बाळगण्याचे कारण नाही.

हिंदी महासागराचे बऱ्याच भागात पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्याचे दिसून येते, तर अरबी समुद्राचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान २९ अंश सेल्सिअस असून, बंगालचे उपसागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान २८ अंश सेल्सिअस आहे. हवामानात स्थिरता आहे.

कोकण

पालघर जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. सर्वच कोकणातील जिल्ह्यांत किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील.

पालघर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ५१ टक्के, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यात ४० ते ४९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्व जिल्ह्यांत २० ते २६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ९ किमी राहील. या आठवड्यात पावसाची शक्यता नाही. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. त्यामुळे कोकणात सकाळी थंड व दुपारी मध्यम स्वरूपात उष्ण हवामान राहील.

Weather
Weather Update: विदर्भातील पाच जिल्ह्यात पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

उत्तर महाराष्ट्र

धुळे व नंदुरबार जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. नाशिक व जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. उत्तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे सकाळी हवामान थंड व कोरडे राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. नंदुरबार जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४४ टक्के, जळगाव जिल्ह्यात २८ टक्के राहील.

धुळे व नंदुरबार जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ३४ ते ३५ टक्के राहील. दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत सर्वच जिल्ह्यांत बरीच घट होऊन ती १४ ते १७ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे दुपारी हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग नाशिक जिल्ह्यात ११ किमी., जळगाव जिल्ह्यात १२ किमी., नंदुरबार जिल्ह्यात १३ किमी. व धुळे जिल्ह्यात १४ किमी राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. त्यामुळे हवामान थंड राहील.

मराठवाडा

छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. हिंगोली, बीड, लातूर जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. धाराशिव, नांदेड व परभणी जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे दुपारी हवामान उष्ण राहील.

धाराशिव व बीड जिल्ह्यात किमान तापमान १८ अंश सेल्सिअस, नांदेड व परभणी जिल्ह्यात किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील. धाराशिव जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. लातूर व नांदेड जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ३२ टक्के, धाराशिव व

बीड जिल्ह्यात २९ टक्के राहील. परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २५ ते २८ टक्के इतकी कमी राहील. हवामान कोरडे राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता संपूर्ण मराठवाड्यात १३ ते १५ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. लातूर जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १७ किमी राहील, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १३ किमी राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.

पश्चिम विदर्भ

बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती या जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील, तर अमरावती जिल्ह्यात किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील. बुलडाणा, अकोला, वाशीम जिल्ह्यात किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. त्यामुळे सकाळी हवामान थंड राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता २५ ते २७ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान सकाळी कोरडे राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १४ ते १५ टक्के राहील. हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते ११ किमी आणि दिशा वायव्येकडून राहील.

Weather
Weather Update : ढगाळ हवामान, उन्हाची तीव्रता कायम राहणार

मध्य विदर्भ

यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे दुपारी उष्ण हवामान राहील. किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील. सकाळी हवामान थंड राहील. आकाश निरभ्र राहील. नागपूर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ३६ टक्के राहील. यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात३० टक्के राहील.

सकाळी हवामान कोरडे राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत केवळ १३ ते १४ टक्के राहील. त्यामुळे दुपारी हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते ११ किमी राहील. वाऱ्याची दिशा यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून व नागपूर जिल्ह्यात ती वायव्येकडून राहील.

पूर्व विदर्भ

गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस, भंडारा जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस आणि चंद्रपूर जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली जिल्ह्यात किमान तापमान १८ अंश सेल्सिअस, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश सर्वच जिल्ह्यांत निरभ्र राहील.

गडचिरोली जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ५० टक्के, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ४२ टक्के आणि चंद्रपूर जिल्ह्यात ३९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत १५ ते १६ टक्के राहील. हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.

दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस, पुणे, नगर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. सांगली व सातारा जिल्ह्यात किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर, पुणे व नगर जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस, सोलापूर जिल्ह्यात ते १८ अंश सेल्सिअस राहील. सकाळी हवामान थंड राहील.

कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. पुणे जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४१ टक्के आणि कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर व नगर जिल्ह्यात ३१ ते ३९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत १३ ते १६ टक्के राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याची दिशा सांगली व सोलापूर जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून व इतर जिल्ह्यांत ती वायव्येकडून राहील.

कृषी सल्ला

आंबा मोहरावरील फुलकिडीचे नियंत्रण करावे.

तुरीच्या शेंगातील दाणे परिपक्व झाले असल्यास सकाळी काढणी करावी.

गव्हाच्या पिकास वाढीच्या अवस्थेनुसार पाणी द्यावे.

ज्वारीच्या कणसातील दाणे परिपक्व झाले असल्यास काढणी करावी.

जनावरांसाठी ज्वारी, मका या पिकांची हिरवा चारा उत्पादनासाठी पेरणी करावी.

कोंबडीपालन शेडमध्ये पाण्याची भांडी वाढवावीत.

धने, मेथी, पालक, चवळी पेरणी करावी.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com