Yavatmal News: अवकाळी पावसाने कापूस व सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. उत्पादनापेक्षा खर्च अधिक झाल्याने शेतकरी हवालदिल आहेत. त्यातच शासकीय कापूस विक्रीसाठी वापराव्या लागणाऱ्या कपास किसान अॅपवर माहिती भरताना क्लिष्ट प्रक्रियेला सामोरे जावे लागत असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे..कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना ‘कपास किसन अॅप’ डाऊनलोड करून माहिती भरण्याच्या सूचना आहेत. परंतु, सर्वांनाच ही प्रक्रिया जमत नसल्याने शासकीय कापूस खरेदीची प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच व्हावी, अशी मागणी होत आहे. कपास किसान अॅपमध्ये माहिती भरण्यासाठी अॅपडाउनलोड करावे लागते..Kapas Kisan App : हमीभावाने कापूस विक्रीसाठी कपास किसान अॅपद्वारे नोंदणी .त्यानंतर आवश्यक माहिती - जमिनीचा प्रकार,कापूस पिकाच्या लागवडीची माहिती,कापसाची अपेक्षित आवक (क्विंटल/बॅल), बँक खाते क्रमांक व आयएफएससी कोड भरावा लागतो. ही प्रक्रिया अतिशय क्लिष्ट आणि डोकेदुखी देणारी असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे..नोंदणीची प्रक्रिया‘कपास किसान अॅप’ डाउनलोड करून अॅपमध्ये विचारलेली माहिती भरावी. तुमच्या कापसाची अपेक्षित आवक क्विंटलमध्ये नमूद करा. बँकेची माहिती द्या- कापसाच्या विक्रीची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी बँक खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड यांसारखी माहिती. ती भरल्यानंतर ‘सबमिट’ बटणवर क्लिक करा. नोंदणीनंतर जवळच्या खरेदी केंद्रांची माहिती अॅपमध्ये दिसेल. तुम्ही नोंदणी केलेला कापूस कोणत्या दिवशी आणि कोणत्या ठिकाणी विक्रीसाठी न्यावा, याचे तपशील अॅपवर उपलब्ध होतील..CCI: हमीभावाने कापूस विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीची संपूर्ण माहिती |Kapas Kisan.शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर बाजार समिती सर्व कागदपत्रे तपासून सीसीआयकडे शिफारस करेल. सीसीआयने मंजुरी दिल्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांच्या सोयीनुसार स्लॉट बुकिंग करून कापूस विक्रीसाठी आणायचा आहे. काही अडचण असल्यास कृषी उत्पन्न बाजार समितीशी संपर्क साधता येईल.-विशाल राठोड, सचिव, कृ.उ.बा.स., आर्णी. शेतकरी राबराब राबतो. शेतीच्या कामातून त्याला फुरसत मिळत नाही. त्यात कापूस विक्री करायचा असल्यावर अॅपवर माहिती भरावी लागते. ही झंझट नकोच. सरळ कापूस विक्रीला आणण्याची सुविधा असावी.-अरुण ठाकरे, शेतकरी, धानोरा (बु.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.