Fodder Management Agrowon
चारा पिके

Fodder Management : पशुपालनात चारा व्यवस्थापनावर भर

Fodder Management in Animal Husbandry : दौंड तालुक्यातील केडगाव येथील अशोक बाळू हाके यांच्याकडे एकूण आठ एकर शेती आहे. यामध्ये कांदा, ऊस, बाजरी, मका, सुपर नेपिअर, मेथी घास अशी पिके घेतली जातात.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

शेतकरी नियोजन

पशुपालन

शेतकरी : अशोक हाके

गाव : केडगाव, ता. दौंड, जि. पुणे

एकूण शेती : ८ एकर

एकूण गाई : २०

दौंड तालुक्यातील केडगाव येथील अशोक बाळू हाके यांच्याकडे एकूण आठ एकर शेती आहे. यामध्ये कांदा, ऊस, बाजरी, मका, सुपर नेपिअर, मेथी घास अशी पिके घेतली जातात. शेतीला पूरक म्हणून त्यांनी दुग्ध व्यवसायास सुरवात केली. सध्या त्यांच्याकडे वीस गाई आहेत.

यंदा गाईंसाठी दोन एकर क्षेत्रावर चारा पीक म्हणून मका लागवड केली आहे. यासोबत ते दूध संकलन केंद्र देखील चालवितात.

असा आहे दुग्धव्यवसाय...

सध्या अशोक हाके यांच्याकडे एकूण वीस गाई आहेत. गाईंसाठी शेतातच १०० बाय २० फूट आकाराचे दोन शेड बांधले आहेत. मुक्त संचार गोठा देखील आहे. त्यात गाईंना सावलीत बसण्यासाठी शेड तयार केले आहे. मुक्त संचार गोठा पद्धतीत गाई मोकळ्या सोडल्या जातात. त्यामुळे चांगले दूध उत्पादन मिळण्यास मदत होते. मुरघास साठवण्यासाठी नव्वद टन क्षमतेचे बंकर बनवले असल्याचे अशोकराव सांगतात.

दूध उत्पादन

सध्या दररोज सर्व गाईंपासून मिळून २५० लिटर दुधाचे उत्पादन मिळते. त्यापैकी काही प्रमाणात दुधावर प्रक्रिया करून तूप बनविले जाते. साधारण एक महिन्यात पन्नास ते साठ किलो तूप उपलब्ध होते. उत्पादित सर्व तुपाची पुण्यात विक्री केली जाते. दुग्ध व्यवसायामधून दर महिन्याला सव्वा दोन ते अडीच लाख रुपयांपर्यंत उलाढाल होते. खर्च वजा जाता ५० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. दुग्ध व्यवसायामुळे कुटुंबाला आर्थिक हातभार लागण्यास मदत झाली आहे.

चारा व्यवस्थापन

शेतात चाऱ्यासाठी हत्ती घास, मका, मेथी घास इत्यादी चारा पिकांची लागवड केली आहे. गाईंना लागणारा सर्व चारा शेतामध्येच पिकविला जातो. त्यामुळे खर्चात मोठी बचत होते. साधारणपणे दीड एकरावर हत्ती घासाची लागवड केली आहे.

चारा पिकांची कापणी दररोज सकाळच्या वेळी केली जाते. त्यानंतर कडबा कुट्टी मशिनवर कुट्टी करून गाईंना चारा दिला जातो. त्यामुळे जनावरांना खाण्यासाठी सोईचे जाते.

तीन वर्षांपासून हत्ती घासाचे उत्पादन घेत आहे. लागवडीपासून पाच वर्षांपर्यंत हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते.

एकावेळी प्रति जनावरांना २० ते २२ किलो खाद्य जनावरांना दिले जाते. सकाळी आणि दुपारी वेगवेगळा चारा जनावरांना दिला जातो. त्यामुळे जनावरांना चांगले दर्जाचे खाद्य मिळते. याशिवाय मुसघास बनविला जातो. त्यामुळे चारा टंचाईच्या काळात बऱ्यापैकी फायदा होतो.

आगामी चारा नियोजन

हत्ती घासाची दर १५ दिवसांनी कापणी केली जाते. त्यापासून दर्जेदार चारा उपलब्ध होईल.

टंचाई काळात सुका चारा उपलब्ध होण्यासाठी वाळलेला चाऱ्याचे नियोजन करत आहे.

मुरघास निर्मितीवर भर दिला जाईल.

गहू, हरभरा यांचा भुस्सा यांची उपलब्धता करून ठेवली जाईल.

अशोक हाके, ९९२१९७७१७१ (शब्दांकन : संदीप नवले)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT