वनशेतीमध्ये वनीय कुरण, कृषी वनीयकुरण, उद्यान वनीयकूरण आणि बांधवरती चारा पिकांची लागवड फायदेशीर ठरते. चाऱ्यासाठी वनशेतीमध्ये सुबाभूळ, अंजन, कडुलिंब, हादगा, शेवरी, महारूख, तुती, शेवगा, बाभूळ लागवड करावी. ग्रामीण कुटुंबांच्या उत्पन्नामध्ये पशुपालनाचे योगदान सुमारे १५ टक्के असून ग्रामीण भागातील दोन तृतीयांश लोकांचे जीवन निर्वाह यावर अवलंबून आहे. सध्या जनावरांसाठी मुख्य खाद्य स्रोत म्हणजे गवत, गायरान, सामुदायिक कुरणे, पिकाचे अवशेष, शेती-उत्पादने, शेतामध्ये लावलेला चारा, शेतातील तण, वृक्षांची पाने व शेती-औद्योगिक उपउत्पादने इत्यादी उपलब्ध आहेत. भारत हा जैविविधतेच्या बाबतीत जगामध्ये प्रमुख देशांमध्ये येतो. देशात गवत कुळ वर्गाच्या १,२५६ प्रजातीपैकी एक तृतीयांश प्रजाती या चारा म्हणून उपयुक्त आहेत. त्याचप्रमाणे, सुमारे ४०० पेक्षा जास्त लेगुमिनोसी या कुळातील प्रजाती चारा म्हणून उपयुक्त आहेत.परंतु, देशाच्या एकूण भू-भागांपैकी फक्त ५ टक्के क्षेत्र चारापिके लागवडीखाली आहे. दर्जेदार खाद्य आणि चारा यांची उपलब्धता ही भारतातील पशुधन क्षेत्राची वाढ आणि उत्पादन क्षमतेची मोठी अडचण आहे. सध्या देशात २१ टक्के हिरवा चारा, २६ टक्के सुका चारा आणि ३४ टक्के खाद्याची निव्वळ तूट आहे. राज्यात मका, बाजरी, ज्वारी, मेथी गवत, नेपियर चारा गवत ही मुख्य चारा पिके असून यांची लागवड ७० टक्यांपेक्षा जास्त क्षेत्रात होते. याचबरोबर गिनी गवत, ऱ्होडस गवत, पॅरा ग्रास, नेपियर, दीनानाथ, अंजन, डोंगरी, पवना, स्टायलो, रानमूग व गोकर्णी सारख्या चारा पिकांचा समावेश होतो. चारा वृक्षांमध्ये सुबाभूळ, अंजन, निंबारा, कडुलिंब, हादगा, शेवरी, महारूख, तुती, शेवगा, बोर, बांबू व बाभूळ इत्यादींचा समावेश होतो. चारा उत्पादनासाठी वनशेतीच्या पद्धती जनावरांच्यासाठी चाऱ्याची गरजा भागविण्यासाठी चारा क्षेत्र वाढविण्याबरोबरच त्याची गुणवत्ता वाढवली पाहिजे. जनावरांच्या चाऱ्याची पूर्तता करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे प्रति एकक जमीन क्षेत्रावरती हिरव्या चाऱ्या उपलब्धता टिकवून उत्पादकता वाढविण्यासाठी नवनवीन पद्धतींचा उपयोग करणे. यामध्ये वनीयकुरण, कृषिवनीयकुरण, उद्यान वनीयकूरण आणि बांधवरती चारा पिके या पद्धतींचा वापर फायदेशीर ठरतो. या पद्धतींमुळे पडीक, बरड किंवा मुरमाड जमिनींचा पर्यायी वापर करून उत्पादकता, संसाधनाचे संरक्षण आणि पर्यावरणाचे संवर्धनाबरोबर चारा, जळावू लाकूड, फळ आणि इमारती लाकूड मिळते. वनशेतीच्या विविध प्रणाली पर्यावरणीयदृष्ट्या व्यवहार्य आहेत. उदा. योग्य वनीयकुरण पद्धतीचा वापर केल्याने पडीक जमिनीची उत्पादकता ०.५ टन प्रति हेक्टर पासून १५ टन प्रति हेक्टर पर्यंत वाढविणे शक्य होते. शेतकऱ्यांचा कल उद्यानिकीकुरण ही पद्धती अवलंबण्यास वाढत असून याद्वारे निकृष्ट दर्जाच्या जमिनीपासून फळ उत्पादनाबरोबर अतिरिक्त चारा उपलब्ध होतो. चाऱ्याची आवश्यकता मोठ्या जनावरांना (म्हशी आणि गाई) सुमारे २० ते ३० किलो हिरवा चारा, ६ ते ८ किलो सुका चारा आणि २ किलो (+प्रती लिटर ४०० ग्रॅम) पशू खाद्य प्रती दिवस लागते. छोट्या जनावरांना (मेंढी आणि शेळी) ४ ते ५ किलो हिरवा चारा, १ किलो सुका चारा आणि २५० ग्रॅम पशू खाद्य प्रती दिवस आवश्यक असते. झाडांची पाने चारा म्हणून वापरल्याने उच्च पौष्टिक मूल्य आणि दुधाचे उत्पादन ३० टक्के आणि मांस उत्पादनात २५ टक्के वाढविण्याची क्षमता ठेवतात. चारा देणाऱ्या वृक्षांची वैशिष्ट्ये
चाऱ्यासाठी झाडांची लागवड शेवगा
(टीप: लागवडीसाठी शेवगा बियाणे स्वतः तयार केलेले वापरावे.) हादगा
लागवड
खत व्यवस्थापन या पिकाला खतमात्रेची गरज कमी असते. मात्र योग्य मात्रा दिली तर उत्पादन वाढविण्यास मदत होते. लागवडीच्यावेळी माती परिक्षणाच्या शिफारशीनुसार सेंद्रिय आणि रासायनिक खताची मात्रा द्यावी. पाणी लागवड केल्यानंतर लगेच पाणी द्यावे. त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. पावसाळ्यामध्ये लागवड केल्यास पाण्याची विशेष गरज लागत नाही. छाटणी वेळ पहिली छाटणी लागवडीनंतर ५ ते ६ महिन्याने करता येते. त्यानंतरच्या छाटणी ५० ते ६० दिवसाच्या अंतराने करू शकतो. उत्पादन: ५०-६० टन प्रती वर्षी सुबाभूळ
जाती के ३४१, के ८, सुबाभूळ सीओ-१, एफडी- १४२३, निर्बिजा लागवड
पाणी लागवड केल्यानंतर लगेच पाणी द्यावे. त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. सहसा या पिकाला पाण्याची आवश्यकता कमी लागते. परंतु १५ ते २० दिवसातून आवश्यकतेनुसार पाणी दिल्याने उत्पादनात वाढ होते. छाटणीची वेळ पहिली छाटणी लागवडीनंतर ५ ते ६ महिन्याने जमिनीपासून ९० ते १०० सेंमी उंचीवर करू शकतो. त्यानंतरची छाटणी ५० ते ६० दिवसाच्या अंतराने करू शकतो. कमी पावसाच्या प्रदेशामध्ये सुमारे ९० ते १०० दिवसांच्या अंतराने वर्षातून तीन छाटण्या करू शकतो. उत्पादन सुरवातीच्या काही वर्षामध्ये प्रति हेक्टरी १२ ते १५ टन प्रती वर्षी चाऱ्याचे उत्पादन मिळू शकते. संपर्क - संग्राम चव्हाण, ९८८९०३८८८७ (राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती,जि.पुणे )
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.