Fodder Management : देशी गोवंश संवर्धन अन् आदर्श चारा व्यवस्थापन

Farmer Success Story : नाशिक जिल्ह्यातील वाजगाव (ता. देवळा) येथील बाळासाहेब देवरे यांनी शेतीत सेंद्रिय पद्धती व गोधन संवर्धनाला सर्वोच्च महत्त्व दिले. त्यातून सुमारे सत्तर देशी गायींचे पालन व दुष्काळातही आदर्श चारा व्यवस्थापन करून त्यात स्वयंपूणतः मिळवली आहे.
Balasaheb Devre
Balasaheb DevreAgrowon

Cattle Conservation : नाशिक जिल्ह्यातील वाजगाव (ता. देवळा) येथील कडूजी व पार्वतीबाई या देवरे दांपत्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राबून शेतीचा विकास केला. त्यांचा वारसा मुले केवळ, बापूसाहेब, बाळासाहेब, शिवाजी, संजय व राजेंद्र यांनी जपला.

आजही हे कुटुंब एकत्रित असून शेतीची मुख्य जबाबदारी सध्या कडुजी यांची नातवंडे सुनील व विजय (बाळासाहेबांचे चिरंजीव) यांच्याकडे आहे. चौथ्या पिढीतील आदित्य व हर्ष हेही मदत करतात. कुटुंबाची पूर्वी ४० एकर जमीन होती. आज ती ७० एकर आहे.

गोमातेची सेवा

सिंचन सुविधा निर्माण करून देवरे कुटुंब १९९० पासून फलोत्पादनाकडे वळले. दहा वर्षांपासून द्राक्ष पीक वगळता अन्य सर्व पिकांत शंभर टक्के सेंद्रिय शेती केली जात आहे. काळी आई आणि गाय ही आपली खरी संपत्ती आहे हा विचार देवरे कुटुंबाने ४० वर्षांहून अधिक काळापासून जपला आहे. कडुजी म्हणायचे की हयातभर गायीची सेवा करावी.

मग कधीच काही कमी पडणार नाही. आज गीर, खिलार, कांकरेज या गोवंशाच्या मिळून ७० हून अधिक गायींचे पालन होते. शंभर गायींच्या क्षमतेच्या मुक्तसंचार गोठ्याची उभारणी केली आहे. साडेतीन एकरांवर सेंद्रिय पद्धतीने चारापिके घेतली जातात.

Balasaheb Devre
Cattle Conservation : सेवाभावी वृत्तीने नृसिंहवाडीत गोसंवर्धन

...असे होते गोसंगोपन

एकाही गायीच्या दुधाची धार काढली जात नाही. त्याचा वापर केवळ वासरांसाठी. घरच्या दुधासाठी दोन म्हशींचा वापर.

शेण आणि गोमूत्राचा वापर सेंद्रिय शेतीत. गोमूत्र संकलनासाठी २० हजार लिटर क्षमतेची सिमेंट टाकी बांधली आहे. जिवामृत तयार करून मड पंपांच्या साह्याने ठिबकमधून पिकांना दिले जाते. त्यातून रासायनिक निविष्ठांवरील खर्च कमी केला आहे. शेतीमालाची गुणवत्ता सुधारल्याने व्यापाऱ्यांकडून जास्तीत जास्त खरेदी बांधावरच होते.

प्रामुख्याने ६० ते ७० टक्के खर्च चारा, पशुखाद्यावर होतो. हे जाणून वर्षभर हिरव्या चाऱ्याचा पुरवठा होण्याच्या दृष्टीने आदर्श चारा व्यवस्थापन. अधिक चारा विकत घेण्याची गरज पडणार नाही आणि खर्चातही बचत होईल हे सूत्र ठेवण्याचा प्रयत्न.

नेपियर विषयी

बहुवार्षिक चाऱ्याचा पर्याय म्हणून अडीच एकरांत सुपर नेपियर गवत.

सुमारे सात वर्षांपूर्वी लागवड केलेला हे पीक आजही उत्पादन देतो आहे.

चार फुटी सरी ठेवल्याने आंतरमशागत करणे सुलभ झाले. ठिबक सिंचन असल्याने मर्यादित पाण्यात उत्पादन घेता येते.

कापणी प्रत्येक सव्वा दोन महिन्यांनी व जमिनीपासून १५ ते २० सेंटिमीटर अंतरावर. त्यातून फुटवे चांगले येतात.

वर्षभर एकरी ७०० ते ८०० क्विंटल हिरवा चारा उत्पादन. सकाळी दररोज बाजरी, ज्वारी, मका, हरभरा चुनी अशा मिश्रणाचे खाद्य गोळे देण्यात येतात. वर्षभरात आलटून पालटून एक एकरावर मका व ज्वारीची प्रत्येकी अर्धा एकरात लागवड.

जनावरांची एकूण संख्या, वय आणि शारीरिक अवस्थेनुसार आहार व्यवस्थापन.

डोगरावरील गवताच्या गाठींचीही खरेदी.

मुरघास व सुका चारा साठविण्यासाठी स्वतंत्र बंकर ऊस तोड सुरू झाल्यानंतर वैरणीत ऊसबांडीचा समावेश

‘ॲग्रोवन’चे आम्ही नियमित वाचक आहोत. त्यातील माहिती-ज्ञानाचा खूप उपयोग होतो. मध्यंतरी त्यात ड्रॅगन फ्रूटची यशकथा वाचून येवला तालुक्यातील संबंधित महिला शेतकऱ्याच्या शेतीला भेट दिली. पुणे जिल्ह्यातील गूळनिर्मितीची यशकथा वाचून तेथेही भेट दिली.
विजय देवरे - ८८३०९४८ ००३
Balasaheb Devre
Fodder Management : दुष्काळाचा फेरा आधी चारा पेरा

मुरघास निर्मिती ठरला मोठा आधार

मका, ज्वारी व नेपियर या हिरव्या चाऱ्यापासून तसेच गूळ, मीठ, खनिज मिश्रण व जिवाणू संवर्धक वापरून मुरघास निर्मिती होते. एक टन क्षमतेच्या संरक्षित बॅगेत तो हवाबंद करून ठेवण्यात येतो. चाळीस दिवसांनंतर तो वापरण्यासाठी उपलब्ध होतो. हा चारा विविध घटकांनी युक्त असल्याने जनावरांचे आरोग्य चांगले राहते.

अन्य चाऱ्यावरील खर्च कमी होण्यासह दुष्काळी स्थितीतही तो मोठा आधार ठरला आहे. कुट्टी यंत्राच्या साह्याने कोरड्या चाऱ्याचे अर्धा ते पाऊण इंच लांबीचे तुकडे करून त्याची साठवणूक केली जाते. फळबाग क्षेत्र अधिक असल्याने दरवर्षी सरासरी ३० ट्रॉली चाऱ्याची खरेदी केली जाते. यंदा दुष्काळाची दाहकता जास्त असल्याने ५० ट्रॉली मका व बाजरी चारा कुट्टी स्वरूपात साठविला आहे.

प्रयोगशीलतेचा वारसा

सन १९९८ मध्ये पार्वतीबाई देवरे यांचा जिजामाता कृषिभूषण पुरस्काराने सन्मान.

बाळासाहेब यांना अन्नधान्य-गळीत धान्य पीककस्पर्धेत जिल्हा व राज्य पातळीवर प्रथम कमांक.

सन २०१९ मध्ये त्यांना कृषी विभागाचा ‘उद्यानपंडित’ तर भारतीय कृषी संशोधन संस्थेचा (IARI, नवी दिल्ली) सर्वोत्कृष्ट नवनिर्मिती- प्रयोगशील शेतकरी पुरस्कार.

कृषी पर्यटन केंद्रात पाहा गोधन

देवरे यांनी शिवपर्व कृषी पर्यटन केंद्र सुरू केले आहे. तेथे ३५ प्रकारच्या फळपिकांची बाग तसेच ७० गायींचे संगोपन पाहता येते. सेंद्रिय भाजीपाला, धान्य पाहण्याबरोबर सेंद्रिय अन्नाचा आनंद येथे घेता येतो.

विजय देवरे ८८३०९४८ ००३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com