Murghas Agrowon
टेक्नोवन

Agriculture Technology : गुणवत्तापूर्ण मुरघास निर्मितीचे तंत्र

Team Agrowon

डॉ. गणेश देशपांडे

Murghas Production Techniques :

हवाबंद स्थिती

मुरघास निर्मितीमध्ये हवा विरहित पद्धत ही अतिशय महत्त्वाची बाब असते. म्हणजेच मुरघास तयार करीत असताना चाऱ्याची कुट्टी अशा पद्धतीने दाब देऊन भरली पाहिजे, की जेणेकरून त्यामध्ये थोडी सुद्धा हवा राहणार नाही. कारण आतमध्ये हवा राहिली तर बुरशी वाढते. बुरशीची वाढ झालेला मुरघास जनावरांना खाण्यास योग्य नसतो.

प्लास्टिक बॅगेमध्ये मुरघास तयार करीत असताना, सुरुवातीस कुट्टी चांगली दाबण्यात येते. परंतु जशी बॅग भरत येते, तशी कुट्टी व्यवस्थित दाबण्यात येत नाही. तसेच बॅग बंद करताना संपूर्ण हवा काढून, बॅग बंद करण्यात येत नाही. बॅग बंद करीत असताना थोडेसे जरी दुर्लक्ष झाले, तरी बॅगमध्ये हवा राहून बुरशी तयार होते. अशावेळी बॅग बंद करताना शक्य असल्यास, व्हॅक्यूम पंपाने आतील हवा संपूर्णपणे बाहेर काढून घ्यावी.

पाण्याचे प्रमाण

मुरघास तयार करीत असताना महत्त्वाची बाब म्हणजे आद्रता. चारा किंवा कुट्टीचा मुरघास तयार करावयाचा आहे, त्यातील पाण्याचे प्रमाण सर्वसाधारण सरासरी ६५ टक्के एवढे असावे. यापेक्षा जास्त पाणी असल्यास, चारा किंवा कुट्टी दोन ते चार तास सुकू द्यावी आणि त्यातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यानंतरच मुरघास तयार करावा. चारा किंवा कुट्टीमध्ये आवश्यक प्रमाणापेक्षा अधिक पाणी असल्यास किंवा बाहेरून पाणी आत गेल्यास कुट्टी किंवा मुरघास सडतो.

साठवण

मुरघास साठवणूक योग्य प्रकारे करणे आवश्यक असते. उंच ठिकाणी, ज्या ठिकाणी पाणी साठणार नाही,

तसेच बॅगवर छतावरचे पाणी ओघळणार नाही अशा ठिकाणी साठवणूक करावी.

मुरघास बॅग उंदरांनी कुरतडण्याचा धोका असतो. बॅग कुरतडल्यास त्यामध्ये हवा जाऊन मुरघास खराब होऊ शकतो. त्यासाठी मुरघास बॅग जमिनीपासून तीन ते चार फूट उंचीवर लाकडी फळांच्या प्लॅटफॉर्मवर ठेवाव्यात.

मुरघास बॅग साठवणुकीच्या ठिकाणी गिरीपुष्पाचे रोप लावावे. तसेच पिंजरा, झिंक फॉस्फाईडचा वापर करूनही उंदरांचा बंदोबस्त करता येईल.

मुरघासाचा वापर आणि फायदे

उत्तम प्रतीच्या मुरघासाठी तयार करण्यासाठी ताक किंवा सायलेज कल्चर, उसाची मळी यांचा वापर करावा.

जनावरांना शरीर वजनाच्या प्रमाणामध्ये मुरघास खाऊ घालावा. सर्वसाधारणपणे प्रतिदिन १६ ते २० किलो मुरघास खाऊ घालावा. मुरघासासोबत वाळलेला चारा (कडबा कुट्टी) प्रतिदिन चार ते सहा किलो खाऊ घालावी.

जनावरांचे शरीर स्वास्थ चांगले राहून, रोगप्रतिकारशक्ती कायम राहते. दूध उत्पादनामध्ये सातत्य राहून वाढ होते.

प्रजनन क्षमता कायम राहते. गाय, म्हैस वेळेवर माजावर येते, गाभण राहते.

मजुरी खर्चामध्ये बचत होते, जनावरांना आवश्यक चारा वेळेवर उपलब्ध होतो.

मुरघासासाठी एकाच वेळी पिकाची कापणी केल्यामुळे, एकाच जमिनीमध्ये दोनपेक्षा अधिक पिके घेता येतात.

उत्तम प्रतीच्या मुरघासाची लक्षणे

वास : चांगल्या तयार झालेल्या मुरघासाचा आंबट असा वास येतो.

रंग : रंग फिकट हिरवा किंवा तपकिरी असतो.

आम्लता : सामू ३.५ ते ४.५ असतो.

ओलावा : ६५ ते ७० टक्के पाण्याचे प्रमाण असते.

मुरघासाची तपासणी

मुरघासामधील अन्न घटकाचे प्रमाण तसेच जनावरांना खाऊ घालण्यास योग्य आहे किंवा नाही, याची प्रयोगशाळेत तपासणी करून घ्यावी.

पशुसंवर्धन विभागाच्या पशुखाद्य विश्लेषण प्रयोगशाळा, गोखलेनगर, पुणे येथे मुरघासामधील अन्नघटकांची तपासणी करण्यात येते. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी राज्यस्तरीय रोग अन्वेषण संस्था, औंध, पुणे येथे बुरशी प्रादुर्भाव तसेच विषबाधाकारक पदार्थाची तपासणी करण्यात येते.

डॉ. गणेश देशपांडे, ९६२३६४१८५६

(उपसंचालक (वैरण विकास), पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT