Murghas Bag Subsidy : मुरघास बॅगेच्या अनुदानात सातारा जिल्ह्यात वाढ

Subsidy Update : शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून सायलेज बॅगेच्या ५० टक्के किंवा तीन हजार यापैकी कमी असेल इतक्या अनुदानाची मर्यादा करण्यात आली आहे.
Murghas
Murghas Agrowon

Satara News : जिल्हा परिषद सेसअंतर्गतच्या अनुदानावर मुरघास बॅग योजनेस शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढत आहे. शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून सायलेज बॅगेच्या ५० टक्के किंवा तीन हजार यापैकी कमी असेल इतक्या अनुदानाची मर्यादा करण्यात आली आहे. एखाद्या लाभार्थ्यास देय अनुदान मर्यादेत तीन टनाच्या दोन बॅगा अनुदानात मिळणार आहेत.

जिल्हा परिषद सेस अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांबरोबर जिल्हा परिषद कृषी विभागाने दुष्काळजन्य परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. पशुधनाच्या कार्यक्षम वापरासाठी मुरघास साठवणुकीसाठी सायलेज बॅग व कडबाकुट्टी योजनेला जिल्हा परिषदेच्या ठराव समितीने मान्यता दिली आहे.

Murghas
Murghas Making : मालेगावात शेतकऱ्यांना मुरघास निर्मितीचे धडे

जनावरांना दिल्या जाणाऱ्या चाऱ्याची गुणवत्ता व उपयुक्तता वाढविण्यासाठी सायलेज बॅगेची मदत होणार आहे. खर्चात बचत होऊन पशुधनाची रोगप्रतिकारशक्ती वाढून दुग्ध उत्पादनात सातत्य राहील. तसेच शेतकऱ्यांच्या नफ्यात वाढ होणार आहे.

Murghas
Murghas Making : मुरघास कसा तयार करावा ?

या योजनेंतर्गत निवड होणाऱ्या लाभार्थ्यांना ५०० किलो ग्रॅम मुरघास साठवणूक क्षमतेच्या जास्तीत जास्त सहा सायलेज बॅगसाठी किमतीच्या ५० टक्के किंवा १८०० रुपये यापैकी कमी असेल इतके अनुदान होते.

आता तीन टनच्या दोन बॅगा

दरम्यान, या योजनेला प्रतिसाद मिळू लागल्याने योजनेत बदल करून अनुदान वाढविले आहे. आता सायलेज बॅगच्या ५० टक्के किंवा तीन हजार यापैकी कमी असेल इतक्या अनुदानाची मर्यादा करण्यात आली आहे. तसेच एखाद्या लाभार्थ्यास देय अनुदान मर्यादेत तीन टनच्या दोन बॅगा अनुदानात मिळतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com