Sudhakar Shirsat and Agriculture Agrowon
टेक्नोवन

Agriculture Technology : तंत्र जाणले यश हाती आले

Vegetable Farming : रानमसले (जि. सोलापूर) येथील सुधाकर सिरसट यांनी विविध तंत्रांचा खुबीने वापर करीत कारले, काकडी, वाल घेवडा आदी वेलवर्गीय पिकांची शेती यशस्वी केली आहे.

सुदर्शन सुतार

Indian Agriculture : सोलापूर-बार्शी महामार्गावर रानमसले (ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) रानमसले गाव आहे. कांदा, कारले, ढोबळी मिरची, भेंडी आदी भाजीपाला पिकासाठी ते प्रसिद्ध असून, येथील शेतकऱ्यांचा या पिकांमध्ये हातखंडा तयार झाला आहे. यातीलच सुधाकर सिरसट यांचे नाव प्रयोगशील शेतकरी म्हणून घेतले जाते. खरे तर त्यांची घरची काहीच शेती नव्हती. परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने वडील दादाराव शेतात मजुरीसाठी जात. सुधाकर यांनीही बारावीनंतर काहीकाळ मजुरी केली. स्वतःची शेती घेणे परवडणारे नव्हते.

मात्र शेतीच्या आवडीतून मजुरी करतच १९९८ मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून उद्यानविद्या शाखेची पदविका मिळवली. त्यानंतर शेळी-मेंढीपालन, सायकल दुकान, किराणा असे व्यवसाय केले. त्यातून ते आर्थिकदृष्ट्या काहीसे स्थिर झाले. मग मात्र २००४ मध्ये गावालगत अडीच एकर शेती घेत शेतकरी होण्याचे स्वप्न साकार केले. कांदा, कलिंगड, खरबूज आणि भाजीपाला पिके घेत प्रगती साधली.

शेती व्यवस्थापन तंत्र

वेलवर्गीय पिकांना प्रमुख पीकपद्धती बनवले आहे. यात कारले, काकडी व वाल घेवडा ही मुख्य पिके. जोडीला बाजारपेठेच्या अभ्यासानुसार वर्षभर आलटून-पालटून ढोबळी मिरची, भेंडी, टोमॅटो आदी फळभाज्यांचे उत्पादन.

दरवर्षी अडीच ते पावणेतीन एकर कारले व तेवढेच काकडीचे क्षेत्र. कारले संपल्यानंतर काकडी किंवा वाल घेवडा अशी आतापर्यंतची पद्धती होती. मात्र यंदा कमी कालावधीची काकडी व दीर्घ कालावधीचे कारले असा एकत्रित लागवडीचा प्रयोग केला. यात एकाच गादीवाफ्यावर (बेड) मल्चिंग पेपर, दोन बेडमध्ये आठ फूट अंतर व त्यात प्रत्येकी चार फुटांवर कारल्याची १९ मे रोजी व काकडीची २४ मे रोजी एकाड एक पद्धतीने लागवड.

प्रति एकर तीन ट्रॉली शेणखत, गंधक व सूक्ष्म अन्नद्रव्ये, ह्युमिक ॲसिड यांचा वापर सातत्याने.

सुधाकर सांगतात, की ३६ दिवसांनी काकडी सुरू होते. पुढे ४० दिवसांपर्यंत ती उत्पादन देत राहते. कारल्याचे सव्वादोन महिन्यांनी उत्पादन सुरू होते. तोपर्यंत काकडीचे बहुतांश उत्पादन संपलेले असते. म्हणजे काकडीचा पैसा सुरू असताना कारल्याचा पैसाही सुरू झालेला असतो. पैशांचा हा स्रोत दीर्घकाळ असाच सुरू राहतो.

दरवर्षी कारल्यानंतर जानेवारी दरम्यान काकडी किंवा वाल घेवडा लागवड. मेपर्यंत हा प्लॉट संपतो. म्हणजे उन्हाळ्यातही उत्पन्नाचा ओघ सुरूच राहतो.

कारले व काकडी ही दोन्ही वेलवर्गीय पिके असल्याने त्यांना वरपर्यंत विनाअडथळा व्यवस्थित पसरण्यासाठी व आधार देण्यासाठी नेट बसवण्याचे तंत्र उपयोगात आणले आहे. त्यामुळे काकडी किंवा कारले खाली पडणे, लोंबकळणे, जमिनीला स्पर्श करणे असे प्रकार होत नाहीत. जाळीलाच ते व्यवस्थितपणे लटकून राहात असल्याने तोडणी सहज सोपी होते.

दरवर्षी वेलवर्गीय पिकांमध्ये फळमाशीच्या नियंत्रणासाठी एकरी २० पर्यंत, तर रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी सुमारे ४० ते ५० निळ्या व पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर. त्यांच्या वापरातून कीडनाशक फवारण्या व त्यावरील खर्च २५ ते ४० टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे.

भाजी प्रकार दरवर्षीचे उत्पादन (एकरी) दर (रु. प्रति किलो)

कारले १४ टनांपर्यंत ३० ते ६५

काकडी २० ते २२ टन १५ ते ४५

वाल घेवडा २० ते २५ टन ४०, ६० ते १००

यंदाच्या प्रयोगातील उत्पादन

सध्या काकडी पूर्ण जोमात असून आतापर्यंत सहा टन उत्पादन मिळाले असून, अजून १८ टनांपर्यंत उत्पादन मिळण्याचा अंदाज आहे. सध्या किलोला १८ ते २२ रुपये दर सुरू आहे.

कारल्याचे अलीकडेच उत्पादन सुरू झाले असून, एक टनांपर्यंत ते मिळाले आहे. किलोला ४० ते ६५ रुपये दर सुरू आहे. मुंबई, पुणे व हैदराबाद येथील बाजारपेठांमध्ये दरांचा आढावा घेऊन माल कुठे पाठवायचा याचा निर्णय ते घेतात.

शेतीतील प्रगती

या भागातील शेती पावसावर आधारित आहे. पण दोन विहिरी, नऊ बोअर्स यांच्या आधारे संपूर्ण शेतीला शाश्‍वत सिंचन केले आहे. सुधाकर यांच्या आई प्रयागबाई, पत्नी सत्यशिला या देखील शेतात राबतात. मुलगा प्रसादला कृषी पदवीचे शिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मुलगी गायत्री बीएस्सीला शिकत आहे. शेतीतील उत्पन्नाच्या जोरावरच विविध सोयीसुविधा विकसित केल्या. एकेकाळी काहीही शेती नसताना मजुरी करून अडीच एकर व अलीकडे पाच एकर शेती घेत आज सुधारक साडेसात एकरांचे मालक झाले आहेत. दोन सौरपंप घेतले. दोन ठिकाणी जागा घेतल्या. मुलांना चांगले शिक्षण देता आले. घराचेही बांधकाम करायचे आहे.

सुधाकर सिरसट ९७६३८७०५४७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT