Watershed Flood Management : यावर्षी राज्यात मॉन्सूनचा लहरीपणा अगदी सुरुवातीपासून सुरू आहे. मेमध्ये जवळपास महिनाभर पूर्वमोसमी पाऊस पडला. त्यानंतर ऐन पेरणीच्या काळात (जूनचा पहिला पंधरवाडा) मात्र पावसाने उघडीप दिली. तुरळक ठिकाणी पडणाऱ्या पावसाच्या हलक्या सरींवर काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या ते पावसाच्या खंडाने अडचणीत आल्या. जूनच्या तिसऱ्या आठवड्यात मात्र कोकण तसेच घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला असला तरी मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र तहानलेलाच होता. त्यानंतर जूनच्या शेवटीच राज्यभर जोरदार पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी खरिपाचा विचकाच केला. .त्यानंतर जुलैच्या दुसऱ्या आणि शेवटच्या आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. जून-जुलैमधील पावसाच्या अशा लहरीपणाचा फटका भात, कापूस, सोयाबीनसह खरिपातील इतरही सर्वच पिकांना बसला. यातून वाचलेल्या पिकांना १५ ऑगस्ट दरम्यान मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीने लोळवले. वरून अतिवृष्टी चालू असताना अचानकच धरणांतून सोडण्यात आलेल्या पाण्याने नदी-नाल्यांना आलेल्या पुरात परिसरातील पिके वाहून नेण्याचे काम केले. .शेतीबरोबर नदी-नाल्या काठच्या गावांत पाणी शिरून शेतकऱ्यांचे घर-गोठे पडले. एका शेतकऱ्यासह अनेक पशुधनाचा बळी देखील या पुराने घेतला आहे. त्यामुळे आताची अतिवृष्टी आणि पुराने हवामान, कृषी, जलसंपदा, ग्रामविकास, महसूल आणि पोलिस प्रशासन यांच्यातील असन्वय पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणण्याचे काम केले आहे..Flood Management : चंद्रपूरच्या पूरग्रस्त भागात तत्काळ उपाययोजना करा.दरवर्षीप्रमाणे देखील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी खरीप हंगाम उभा केला आहे. सातत्याच्या नैसर्गिक आपत्ती आणि कीडरोगांचे वाढलेले प्रमाण, त्यातून घटते उत्पादन आणि वाढलेला पीक उत्पादन खर्च शिवाय सोयाबीन, कापूस, तूर, हरभऱ्यापासून ते इतरही सर्वच शेतीमालास मिळणारा कमी भाव यामुळे राज्यभरातील शेतकरी प्रचंड आर्थिक तणावात आहेत. त्यात या वर्षी बहुतांश शेतकरी थकित बाकीमुळे पीककर्जापासून वंचित आहेत. .अनेक शेतकऱ्यांनी या वर्षी पीकविमा देखील भरला नाही. अशा एकंदर परिस्थितीत सध्याची अतिवृष्टी आणि पुराने पिकांसह इतरही मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीचे पाहणी-पंचनामे तत्काळ करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळायला हवी. सर्वाधिक धरणे असलेल्या राज्यात विसर्गाचे योग्य व्यवस्थापन नसल्याचा दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसत आला आहे. अतिवृष्टी काळात धरणांत पाणीसाठा वाढत असताना त्यातून पाणी सोडावेच लागते. परंतु वरचा पाऊस खंडल्यावर हे पाणी सोडले तर पुराचा धोका कमी होतो..Flood Management : चंद्रपूरच्या पूरग्रस्त भागात तत्काळ उपाययोजना करा.त्याच वेळी धरणाखालील परिसरात अशावेळी सतर्कतेचा इशारा देऊन तो त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. तसे मराठवाडा, विदर्भातील बहुतांश भागात आत्ता झाले नाही. त्यामुळे जीवित-वित्तहानी वाढली. शिवाय खरीप हंगाम शेवटी अथवा रब्बीत शेतकऱ्यांच्या गरजेनुसार आवर्तने सोडली जात नाहीत. त्यामुळे एका संरक्षित पाण्यावाचून शेतकऱ्यांची पिके वाया गेली आहेत. अर्थात धरण प्रशासनाने समयसूचकता दाखविली तर पूर आणि पाण्यावाचून पिके असे शेतकऱ्यांचे नुकसान टळू शकते. गंभीर बाब म्हणजे राज्यातील धरणांच्या संकल्पनेत पूर नियंत्रणाची तरतूद नाही..पुराच्या एकूण पाण्यात धरणांच्या पाणलोटातून आलेल्या पाण्यापेक्षा मुक्त पाणलोटातून आलेल्या पाण्याचा वाटा जास्त असतो. मुक्त पाणलोट क्षेत्र जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत येत नाही. अतिक्रमणांमुळे नद्यांच्या वहनक्षमता कमी होण्याला जलसंपदाऐवजी अन्य शासकीय विभाग देखील जबाबदार आहेत. पूरनियंत्रणात अशा अनंत अडचणी आहेत. अशावेळी पूरनियंत्रणासाठी माथा ते पायथा मृद्-जल संधारण ते धरणांतून पाणी सोडणे यातील प्रत्येक टप्प्यांवर व्यापक बदल करावे लागतील. पाणलोटनिहाय एकात्मिक पूरनियमनावर विचार झाला पाहिजे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.