Pune News : जिल्ह्यातील आंबेगाव, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, खेड आणि जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यात एकेकाळी नाचणीचे (रागी) आगार म्हणून ओळखले जात होते. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, कमी दर यामुळे या पिकापासून दूर जात असून, या पिकाकडे शेतकरी पाठ फिरवत आहे. यंदा खरीप हंगामात केवळ सरासरीच्या २१०८ हेक्टरपैकी १०४७ हेक्टर म्हणजेच ४८ टक्के क्षेत्रावर नाचणीची लागवड झाली असल्याचे चित्र आहे..पूर्वी जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यात भाताबरोबरच नाचणी, सावा आणि वरई ही महत्त्वाची पिके घेतली जात होती. परंतु सावा आणि वरईची पिके शेतातून नामशेष झाली असून आता नाचणीही त्याच मार्गावर आहे. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी आदिवासी पट्ट्यात भात लागवडीपूर्वी पंधरा-वीस दिवस नाचणी लागवड होत असे. त्यावेळी शेतकऱ्यांना टनामध्ये उत्पादन मिळत होते. नाचणी शेतकऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. गेल्या काही वर्षांत या पिकाचे क्षेत्र झपाट्याने कमी झाले आहे..Ragi Seed Bank: नाचणीच्या १७ प्रकारच्या बियाण्यांची साकारतेय बँक .या भागातील शेतकरी नाचणी पिकाला बाजारात योग्य दर मिळत नसल्याने आणि शेतीसाठी मजूर उपलब्ध होत नसल्याने शेतकरी इतर पर्याय शोधत आहे. त्यामुळे या पिकापासून दूर जात आहेत. नाचणी हे पीक पूर्णान्न असून त्यात फायबर, कॅल्शिअम, लोहाचे प्रमाण भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे वजन नियंत्रण, हाडांचे आरोग्य, पचनशक्ती आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. .लहान मुले आणि वृद्धांसाठी हे पीक विशेष फायदेशीर आहे. तरी देखील आर्थिक आणि सामाजिक कारणामुळे शेतकरी या पिकापासून दुरावत चाललेअ सल्याचे दिसून येते. दरम्यान, नाचणीच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने योग्य दर तसेच मजुरांचा प्रश्न सोडवण्यासाठी यांत्रिकीकरणाने जागरूकता मोहिमेवर भर देणे गरजेचे आहे. अन्यथा हे पारंपरिक आणि पौष्टिक पीक नामशेष झाल्यावाचून राहणार नाही, असे शेतकरी मत व्यक्त करत आहेत..Ragi Cultivation: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात, नाचणी रोप लागवड पूर्ण.पोखरी (ता. आंबेगाव) येथील प्रगतशील शेतकरी बाळू बेंढारी म्हणाले, की नाचणीला अपेक्षित दर मिळत नाही. शेतात काम करण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता आणि शासनाकडून रेशनिंगवर मोफत धान्य वाटपामुळे शेतकऱ्यांनी नाचणी पिकांकडे पाठ फिरवली आहे. पूर्वी बारीक धान्याची पिके घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. आता तरुण पिढी कष्टाची कामे करत नाही. त्यामुळे सावा, वरई, नाचणी आणि खुरसणे शेतातून हद्दपार होत आहेत..भोरमध्ये यंदा ५९ टक्के लागवड :यंदाच्या नाचणी पिकाच्या लागवडीची सरासरी पाहता भोर तालुक्यात सरासरीच्या १३२९ हेक्टरपैकी ७८२ हेक्टर म्हणजेच ५९ टक्के नाचणी पीक घेण्यात आले आहे. तर वेल्हे तालुक्यात सरासरीच्या ४३५ हेक्टरपैकी १३९ हेक्टर म्हणजेच ३२ टक्के या पिकाची पेरणी झाली आहे. खेड तालुक्यात १३९, मुळशी ५४, आंबेगाव ११, खेड २६, मावळ ५ हेक्टरवर हे पीक घेण्यात आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.