Parbhani News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये कपाशीमध्ये लागवड ते वेचणी पर्यंत यांत्रिकीकरण व स्वच्छ कापूस उत्पादन संशोधन प्रकल्प अंतर्गंत राबविला जात आहे. त्यासाठी यंदा (२०२५) परभणी येथील मध्यवर्ती प्रक्षेत्रावर ५०० एकर सघन पद्धतीने कपाशीची लागवड करण्यात आली आहे..या प्रकल्पांतर्गत प्रामुख्याने कपाशीमध्ये लागवड ते वेचणीपर्यंतच्या कामांचे यांत्रिकीकरण यावर संशोधन करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कपाशीच्या एनएच १९०१, एनएच १९०२ आणि खासगी कंपनीच्या ३ वाणांची सघन पद्धतीने ९० बाय १५ सेंमी., ९० बाय १२ सेंमी., ९० बाय ९ सेंमी. या ३ अंतरावर लागवड करण्यात आली आहे. .Cotton Farming : पूर्वहंगामी कापूस पिकाची वाढ जोमात.स्वच्छ कापूस वेचणी करिता पानगळ करणाऱ्या रसायनाचा वापर, योग्य अंतर यावर संशोधन करण्यात येत आहे. कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा, अमरावती येथील नियोजन विभागाच्या उपआयुक्त कावेरी नखले, अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश ठोंबरे, महाराष्ट्र राज्य सल्लागार ऋषभ माहेश्वरी, मध्यवर्ती प्रक्षेत्राचे प्रभारी अधिकारी डॉ. विलास खर्गखराटे, वनस्पतिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, मृद् व कृषी रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर, नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राचे कृषिविद्यावेत्ता डॉ. अरविंद पांडागळे, कीटकशास्त्रज्ञ डॉ. बस्वराज भेदे उपस्थित होते..Cotton Farming Technology: कापूस तंत्रज्ञान प्रकल्पातून शेतकरी झाले जागरूक.या वेळी कपाशीच्या बियाणे उत्पादनात वाढ करण्यासाठी ‘बियाणे ते बियाणे’ यांत्रिकीकरण (सीड टू सीड मेकानायझेशन) तसेच कमी खर्चाचे तंत्रज्ञान यावर सविस्तर चर्चा झाली. सघन पद्धतीने कपाशी लागवड तंत्रज्ञान भविष्यात मराठवाड्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला..डॉ. इंद्र मणी यांनी सघन पद्धतीने लागवड केलेल्या बीटी कपाशी पिकांच्या नावीन्यपूर्ण व्यवस्थापनाबद्दल समाधान व्यक्त केले. कमी पावसाच्या स्थितीत उत्तम वाढ झालेल्या सोयाबीनच्या एमएयूएस-६१२ वाणांच्या पैदासकार (ब्रिडर सीड) बियाणे उत्पादन प्रक्षेत्राचीही त्यांनी पाहणी केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.