Nagpur News : जमीन आरोग्य जपत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण राखल्याने जगात लागवड क्षेत्र कमी असले तरी उत्पादकतेच्या बाबतीत ब्राझीलची आघाडी आहे. भारतात देखील या संदर्भाने जागरुकता वाढत सेंद्रिय कर्ब एक टक्क्यापेक्षा अधिक होण्यावर भर दिला गेला तर ब्राझीलइतकी उत्पादकता सहज मिळविता येईल, असा दावा केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. विजय वाघमारे यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना केला..डॉ. वाघमारे म्हणाले, ‘‘कपाशीच्या उत्पादकतेची सातत्याने चर्चा होते. त्याचवेळी वाण, तंत्रज्ञानाच्या संदर्भाने संशोधन संस्थांवरदेखील टीका केली जाते. मात्र सध्या भारतात उपलब्ध असलेले सर्वच वाण उत्पादनक्षम आहेत. वर्धा जिल्ह्यातील दिलीप पोहाणे यांनी एचडीपीएस तंत्रज्ञानाच्या आधारे एकरी २४ क्विंटल उत्पादकता मिळविली. .Cotton Farming: जमिनीची ताकद वाढवून कापूस उत्पादनवाढ.श्री. पोहाणे यांनी लावलेल्या वाणाची लागवड इतर भागातही झाली असेल परंतु त्यांना इतके उत्पादन शक्य झाले नसेल. यामागे अनेक घटक प्रभावी ठरतात. त्यात सेंद्रिय कार्बन त्याबरोबरच सिंचन सुविधा, व्यवस्थापन हे महत्त्वाचे आहेत. .भारतीय शेतीचा विचार करता जमिनीतील सेंद्रिय कार्बनचे प्रमाण .१ ते .३ (पॉईट १ ते पॉईट ३) इतके अत्यल्प आहे. पिकाच्या उत्पादकतेत सेंद्रिय कर्ब हा महत्त्वाचा ठरतो, ही बाब लक्षात घेतली पाहिजे. त्याकरिता पिकाच्या काढणीनंतर शिल्लक अवशेष बारीक करून ते जमिनीत गाडल्यास जमीन आरोग्य सुधारण्यास ते सहाय्यभूत ठरतात.’’.जगात कापूस उत्पादकतेत ब्राझीलची आघाडी आहे. या देशातील कापसाखालील क्षेत्र पाच लाख हेक्टरपेक्षाही कमी आहे. भारताचा विचार करता एकट्या यवतमाळ जिल्ह्यात पावणेपाच ते पाच लाख हेक्टर कापूस लागवड होते. .Cotton Rate: देशात शिल्लक कापसाचे प्रमाण ४७ टक्क्यांनी वाढले.लागवड क्षेत्र कमी असल्याने ब्राझीलमध्ये व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाची उपलब्धता करणे सहज शक्य होते. त्याबरोबरच या भागातील जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण १ टक्क्यापेक्षा अधिक आहे. ब्राझीलमध्ये उत्पादकता वाढीत हा घटक अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे, असे श्री. वाघमारे यांनी सांगितले..महाराष्ट्राचा विचार करता ८० ते ८५ टक्के क्षेत्रावर कोरडवाहू कपाशी होते. फुलधारणा किंवा बोंड परिपक्व होण्याच्या अवस्थेत पिकाला पाण्याची गरज राहते. या वेळी पावसाचा खंड पडल्यास त्याचाही उत्पादकतेवर परिणाम होतो. त्यामुळे सिंचन सुविधा बळकटीकरणावर भर देण्याची गरज आहे.- डॉ. विजय वाघमारे, संचालक, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.