Interculture Operation : उत्पादन वाढीसाठी वेळेत आंतरमशागत महत्त्वाची

Agriculture Crop Production : उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी वेळेत पिकांची आंतरमशागत करणे आवश्यक आहे, असे मत कृषी महाविद्यालय व विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे व्यक्त केले.
Kharif Season
Kharif SeasonAgrowon
Published on
Updated on

Latur News : उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी वेळेत पिकांची आंतरमशागत करणे आवश्यक आहे, असे मत कृषी महाविद्यालय व विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे व्यक्त केले. माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत या उपक्रमात बुधवारी (ता. १०) कोळपा (ता. लातूर) येथे आयोजित शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते.

शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी व शेती व्यवसाय शाश्‍वत करण्यासाठी महाविद्यालयातील शास्त्रज्ञ अविरत तत्पर राहून काम करत आहेत. शेतकऱ्यांनी शेतीला पशुधनाची जोड द्यावी व स्वतःचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचवावा, असे आवाहन डॉ. ठोंबरे यांनी कतेले. डॉ. विजय भामरे, डॉ. अनंत शिंदे, पोलिस पाटील नंदकिशोर आंबेकर, हनमंत श्रीगिरे, उद्धव आंबेकर, अरुण कातळे, सोमनाथ खराबे, बबन पठाण, शिवाजी कातळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Kharif Season
Inter-culture Operation : कोरडवाहू पिकांची आंतरमशागत

डॉ. भामरे यांनी कीड व उपाययोजना व डॉ. शिंदे यांनी पशुरोग व्यवस्थापन व लसीकरणाचे महत्त्व या विषयावर सुसंवाद साधला. डॉ. प्रभाकर अडसूळ, कृषिकन्या मीरा देशमुख, डॉ. ज्ञानेश्‍वर सुरडकर, श्रीकांत धनशेट्टी, नितीन देवकते, अनिश देशमुख, आयन मोंडल, शुभम अंबुलगे, ऋतुजा बलसरप, श्रावणी बेटेवर, शुभांगी भुसागरे, सायली बिचुकले, अनुराधा बोनलावर, शिवराणी चव्हाण, यशपाल चव्हाण, विवेक चौधरी, निखिल देवकाते, लोकेश्री धारजने, प्रज्ञा ढेंगरे, विशाल ढोकरे, गौतमी दुधारे यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

Kharif Season
Zero Tillage Farming : शून्य मशागत तंत्रज्ञानाने होणार दहा हजार एकरांवर शेती

कृषी सप्ताहानिमित्त कार्यक्रम

समृद्ध व आनंदी जीवनासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक असल्याचे डॉ. उदय खोडके यांनी सांगितले. दोन्ही महाविद्यालयात आयोजित कृषी सप्ताहानिमित्त ते बोलत होते. या वेळी बदनापूर कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राकेश अहिरे, अंबाजोगाई कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता संजीव बंटेवाड, वनस्पतिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, डॉ. शिवाजी शिंदे, उपकुलसचिव (विद्या) डॉ. गजानन भालेराव,

संचालक शिक्षण कार्यालयाचे तांत्रिक अधिकारी डॉ. गणपत कोटे, अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे, डॉ. अच्युत भरोसे, डॉ. रमेश ढवळे, डॉ. सारिका भालेराव, डॉ. भास्कर आगलावे, डॉ. महेंद्र दुधारे, डॉ. राहुल चव्हाण, डॉ. विद्या हिंगे, डॉ. योगेश भगत, मनीषा बगाडे, सुरेखा आंबटवाड, आश्‍विनी गरड, तानाजी गंपले, संगीता सोरेकर यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com