Gobair Agrowon
टेक्नोवन

Agriculture Technology : गाईच्या शेणापासून बनविले ‘गोबायर’

Gobair Production : इंदूर येथील भारतीय प्रौद्योगिकी संस्थेने (आयआयटी) गाईच्या शेणातून फेस निर्मिती करणारा नैसर्गिक घटक (फोमिंग एजंट) वेगळा करण्यात यश मिळवले आहे.

Team Agrowon

'Gobair' From Cow Dung : इंदूर येथील भारतीय प्रौद्योगिकी संस्थेने (आयआयटी) गाईच्या शेणातून फेस निर्मिती करणारा नैसर्गिक घटक (फोमिंग एजंट) वेगळा करण्यात यश मिळवले आहे.या फेसनिर्मात्या घटकाचा उपयोग कॉन्क्रिटमध्ये केल्यास आधुनिक बांधकामाचे वजन कमी होऊन, ते उष्णता रोधणाचेही काम करेल, असा दावा संस्थेच्या प्रतिनिधीने केला आहे.

इंदूर येथील भारतीय प्रौद्योगिकी संस्थेतील प्रो. संदीप चौधरी आणि त्यांचे पीएच. डी. चे विद्यार्थी संचित गुप्ता यांनी गाईच्या शेणापासून फोमिंग घटक वेगळा केला. हे अशा प्रकारचे देशातील संपूर्णपणे पर्यावरणपूरक आणि नावीन्यपूर्ण असे पहिलेच संशोधन असून, त्याला गोबायर (GOBAiR) असे नाव देण्यात आले आहे.

या फोमिंग एजंटचा वापर काँक्रीटमध्ये केल्यास त्याचे आकारमान वाढेल. परिणामी, काँक्रीट कमी लागून खर्चात बचत होईल. हा घटक उष्णतारोधक असल्यामुळे त्याचा वापर केलेल्या इमारती उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात उष्ण राहण्यास मदत होईल. या पर्यावरणपूरकतेमुळे इमारतींना हरित दर्जा मिळवणेही सोपे जाईल.

या संशोधनाविषयी माहिती देताना प्रो. चौधरी म्हणाले, की सध्या आम्ही भटक्या गाईंची देखभाल करणाऱ्या गोशाळांना अधिक उत्पन्न मिळावे, यासाठी गाईच्या शेणापासून कोणती उच्च दर्जाची उत्पादने मिळवता येतील, यावर काम करत आहोत. त्या प्रयत्नातून गोबायर विकसित करणे शक्य झाले. काँक्रीटमध्ये गोबायरचा वापर केल्यास त्याचे वजन कमी होणार असून, सामान्य काँक्रीटच्या तुलनेमध्ये खर्चात २४ टक्के बचत होऊ शकते.

यांचा वापर सिमेंटच्या विटा, टाइल्स बनविण्यामध्येही करणे शक्य असून, मातीच्या लाल विटा किंवा फ्लाय ॲशच्या विटापेक्षाही आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल. या सर्व फायद्यांचे मूल्य आर्थिक भाषेमध्ये मांडल्यास, गाईच्या ओल्या शेणाचे मूल्य ४ रुपये प्रति किलोपेक्षा जास्त होऊ शकते. आज ओल्या शेणाला एक रुपयापेक्षाही कमी मूल्याचे मानले जाते.

गोबायर या नावीन्यपूर्ण उत्पादनासाठी पेटंट कार्यालयाकडे अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे या उत्पादनाला हरित उत्पादन म्हणून भारतीय हरित इमारती परिषदेची (आय.जी.बी.सी.) मान्यता मिळावी, यासाठी सध्या प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती प्रो. चौधरी यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Farming Success Story: संतुलित आहार आणि नियोजनबद्ध गोठा व्यवस्थापनावर भर

Orchard Management: तापमानवाढ, कमी आर्द्रता स्थितीत बागेचे व्यवस्थापन

Farmer Success Story: प्रयोगशील शेतकरी उद्योजक

Water Conservation: जलसंधारणातील साथीदार...

Ethanol Blended Petrol: केंद्राचे मोठे पाऊल; पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉल मिश्रण, मसुदा जारी

SCROLL FOR NEXT