Pune News : राज्यात मागील तीन दिवसांपासून विविध भागात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. राज्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी, पूर व वादळी वाऱ्यांमुळे तब्बल ५ लाख ४९ हजार ७८५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार, १९ ऑगस्टपर्यंत मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे..कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात २ लाख ५९ हजार ७८९ हेक्टरवरील पिकं बाधित झाली आहेत. यामध्ये कंधार, मुदखेड, भोकर, माहूर, लोहा, मुखेड या तालुक्यांचा समावेश असून मूग, सोयाबीन, मका, उडीद आणि ज्वारीसह फळपिकांचे नुकसान झाले आहे..Nanded Heavy Rain: नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाने कहर, हसनाळ गावामध्ये लष्कर दाखल.विदर्भात फटकायवतमाळ जिल्ह्यात ८० हजार ९६९ हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन, कापूस व तुर पिकांचं नुकसान झाल्याचं कृषी विभागाच्या अहवालात सांगण्यात आले आहे. तसेच अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात ४३ हजार ७०३ हेक्टर क्षेत्रावर तर अमरावती जिल्ह्यात १२ हजार ३६१ हेक्टरवरील क्षेत्रावरील सोयाबीन, कापूस, तूर पिकं प्रभावित झाली आहेत. बुलढाणा जिल्ह्यात १० हजार ७०२ हेक्टर, अमरावती जिल्ह्यात १२ हजार ३६१ हेक्टर आणि वर्धा जिल्ह्यातील ७७६ हेक्टर क्षेत्रावरील पिकं जमीनदोस्त झाली आहेत..Heavy Rain Alert: कोकण, घाटमाथ्यावर मुसळधारेचा इशारा.मराठवाड्यातील स्थितीछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २ हजार ७४ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, तूर मूग, उडीद, मका, बाजरी, भाजीपाला आणि फळ पिके उद्धवस्त झाली आहेत. तसेच परभणीमध्ये १४ हजार हेक्टर, हिंगोलीत ४० हजार हेक्टर, जालना २ हजार १४६ हेक्टर तर बीड जिल्ह्यात ९३० हेक्टर क्षेत्र बाधित झाले धाराशिवमध्ये २८ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावरील मूग, सोयाबीन, उडीद, तूर आणि ऊस पिकांना फटका बसला आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात १० हेक्टर क्षेत्रातील ऊस पीक पाण्याखाली गेले आहे..पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रसोलापूर जिल्ह्यातील उत्तर-दक्षिण भाग व अक्कलकोट तालुक्यात ४१ हजार ४७२ क्षेत्र बाधित झाले. जळगावमध्ये १२ हजार ३३७ हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन, कापूस, मका आणि ऊसासह फळपिकांचे नुकसान झाले आहे. तर धुळे जिल्ह्यातील २३ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे..राज्यभरातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी, पूर व वादळी वाऱ्यामुळे मोठा आर्थिक फटका बसला असून, सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर व मका या प्रमुख खरीप पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने सरसकट मदत जाहीर करावी, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याचे सांगितले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.