Parbhani News : मागील चार दिवसांपासून परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पावसाचा कहर सुरू आहे. सोमवारी (ता. १८) सकाळी १० पर्यंतच्या २४ तासांमध्ये या दोन जिल्ह्यात हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील १२ मंडलांत अतिवृष्टी झाली. .सततच्या पावसामुळे उभ्या पिकांची नासाडी होत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. धरणक्षेत्रातून पाण्याचा येवा सुरु असल्यामुळे येलदरी धरणाच्या १० दरवाजाद्वारे तर निम्न दुधना धरणाच्या २ दरवाजाद्वारे नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला..Heavy Rain Solapur : ‘दक्षिण’मध्ये दुप्पट, ‘उत्तर’ला दीड पट पाऊस .या दोन जिल्ह्यांत गुरुवार (ता. १४) रात्रीपासून पाऊस सुरु आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, हळद आदी पिकांमध्ये पाणी साचून राहिल्याने नुकसान झाले आहे. मुगाची पीक काढणीच्या अवस्थेत असून सततच्या पावसामुळे शेंगाना मोड फुटत आहेत. पालम तालुक्यातील लेंडी नदी, गलाठी नद्यांना पूर आल्यामुळे पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा रस्ते मार्गे संपर्क तुटला होता..परभणी जिल्ह्यात सोमवारी सकाळी १० पर्यंतच्या २४ तासात सरासरी ३२.३ मिमी पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यात आजवर सरासरी १६७.४ मिमी (१२६.५ टक्के) तर यंदा १ जून पासून आजवर अपेक्षित सरासरी ४९६.८ मिमी पैकी ४७४.७ मिमी (९५.६ टक्के) पाऊस झाला..जिल्ह्यातील ५२ पैकी १२ मंडलात अतिवृष्टी झाली. मानवत, सोनपेठ, गंगाखेड, पालम तालुक्यातील १२ मंडलामध्ये अतिवृष्टी झाली. हिंगोली जिल्ह्यात सोमवारी (ता. १८) सकाळी १० पर्यंतच्या २४ तासात सरासरी २६.५ मिमी,ऑगस्ट महिन्यात आजवर सरासरी २४६.७ मिमी तर १ जून पासून आजवर सरासरी ५३९.५ मिमी अपेक्षित असतांना प्रत्यक्षात ६१५.८ मिमी (११४.१ टक्के) पाऊस झाला..Heavy Rain: अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत.मंडलनिहाय पाऊस (१० मिमिच्यापुढे)परभणी जिल्हा ः परभणी ग्रामीण १३, झरी १०, सिंगणापूर ११.२, दैठणा ३३, पिंगळी २५.३, बामणी १३.५, आडगाव १०.५, दूधगाव १०, देऊळगाव १६, मानवत १९.५, केकरजवळा १९.८, कोल्हा १७.३, ताडबोरगाव १२.८, पाथरी १९.८, बाभळगाव ४५.८, हादगाव २१.८, कासापुरी ३०.५, रावराजूर ५४.५, पूर्णा २७.५, ताडकळस ३६.३, लिमला २६.८, कात्नेश्वर २७.५, चुडावा ३४.८, कावलगाव २६..हिंगोली जिल्हा ः हिंगोली ३१.५, नरसी नामदेव २६.३, सिरसम ३१.५, बासंबा ३१.५, डिग्रस ४१.३, माळहिवरा ३१.५, खंबाळा ३१.५, कळमनुरी ४१.३, वाकोडी ४१.३, नांदापूर ३२.३, आखाडा बाळापूर २६, डोंगरकडा १६.५, वारंगा १७, वसमत ११.५, अंबा १६.८, हयातनगर ११.५, गिरगाव ११.५, हट्टा १९, टेंभुर्णी ११.५, कुरुंदा १६.८, औंढानागनाथ २१.३, येळेगाव ३६.६, साळणा १६.५, जवळाबाजार २१.३, सेनगाव २६.३, गोरेगाव ५६.५, आजेगाव ५६.५, पानकन्हेरगाव २६.३..अतिवृष्टी झालेली मंडलेपरभणी जिल्हाः रामपुरी ८५.८, सोनपेठ ६६.३, आवलगाव ६६.३, शेळगाव ६६.३, वडगाव ६६.५, माखणी ९०.८, राणीसावरगाव ८७.३, पिंपळदरी ९५, पालम ६७.३, चाटोरी ८७.३, बनवस ६८, पेठशिवणी ६८..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.