Satara News : जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असल्याने धरणातील पाण्याची आवक होत आहे. यामुळे जिल्ह्यातील सहा प्रमुख धरणापैकी पाच धरणातून विसर्ग केला जात आहे. हा विसर्ग नदीपात्रात होत असल्याने नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू झाला असून रविवारी (ता. १७) मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. पावसाच्या अधुनमधून दमदार सरी येत आहेत. .जिल्ह्याच्या पूर्व भागाच्या तुलनेत पश्चिम भागात पावसाचा जोर आधिक आहे. सोमवारी सकाळापासून पावसाचा जोर कायम होता. सलग पावसामुळे शेतातील कामे ठप्प झाली आहेत. धरण क्षेत्रातही पावसाचा जोर वाढल्याने पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. या अगोदरच प्रमुख सहा धरणांतील पाणीसाठा ९० टक्क्यांवर झाला आहे. .Maharashtra Rain: राज्यात २३० मंडलांत अतिवृष्टी.पाण्याची आवक होत असल्याने पाणीसाठा नियंत्रित रहाण्यासाठी पाण्याच्या विसर्गात वाढ केली जात आहे. सहा प्रमुखपैकी पाच धरणांतून विसर्ग सुरू आहे. कोयना धरण क्षेत्रातील कोयना ११३, नवजा १५१, महाबळेश्वर १२१ मिलिमीटर पाऊस झाला असून धरणात ३८,८०३ क्युसेक पाण्याची आवक होत आहे..पाण्याची आवक जास्त असल्याने धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. सध्या धरणाच्या पायथा वीज गृहातून २१०० व सहा वक्र दरवाज्यातून १०,००० असा एकूण १२,१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. .सोमवारी पावसाचा जोर वाढल्याने दुपारी ४ वाजता कोयना धरणाचे १६ वक्र दरवाजे तीन फुटांनी उघडून २९२०० क्युसेक व पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक असा २१३०० क्युसेक विर्सग सुरू करण्यात आला. धरणात पाण्याची आवक सुरू असल्याने सायंकाळी विसर्गात वाढ करून ३३ हजार क्युसेक करण्यात येणार आहे..Heavy Rain: अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत.धोम धरण क्षेत्रात २३ मिलिमीटर पाऊस झाला असून ३५६३, धोम-बलकवडी धरणातून ३०६४ क्युसेक विसर्ग सुरू आहे. कण्हेर धरणातून ७४० क्युसेक विसर्ग सुरू असून पावासाचा जोर वाढत असल्याने १२०० क्युसेक विसर्ग करण्यात येणार आहे. .उरमोडी धरणातून ४५० क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. पाण्याचा विसर्ग वाढवला जात असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.