Latur News : चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर आहे. गुरुवारी (ता. १४) रात्रीही जोरदार पाऊस झाला. त्यानंतर रविवारी (ता. १७) रात्रभर पावसाने जोरदार हजेरी लावली. यात अहमदपूर व उदगीर तालुक्यांत अतिवृष्टी झाली..उदगीर तालुक्यातील कर्नाटक सीमावर्ती भागातील लेंडी नदीच्या उपनदीला पूर आल्यामुळे तालुक्यातील धडकनाळ व बोरगाव शिवारातील पिकांचे मोठे नुकसान तर झालेच जनावरेही पुरात वाहून गेली. जिल्ह्यात सकाळी आठ वाजेपर्यंत मागील चोवीस तासांत सुमारे ५१.७ मिलिमीटर पाऊस झाला असून सर्वाधिक १०९.७ मिलिमीटर पाऊस अहमदपूर व ९१.१ मिलिमीटर पाऊस उदगीर तालुक्यात झाला आहे..जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून विविध भागांत जोरदार पाऊस पडत आहे. यात मुसळधार पाऊस होत असून पिके पाण्याखाली जाऊन नदीनाल्यांना पूर आला आहे. मोठ्या नद्या दुथडी भरून वाहत असून या नद्यांवरील मध्यम व मोठे प्रकल्प काठोकाठ भरले आहे. गुरुवारी रात्री धाराशिव जिल्ह्यातील कळंब व वाशी तालुक्यांत मोठा पाऊस झाला होता..Nanded Heavy Rain: नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाने कहर, हसनाळ गावामध्ये लष्कर दाखल.तसाच पाऊस रविवार रात्री उदगीर व अहमदपूर तालुक्यात झाला आहे. यात उदगीर तालुक्यातील धडकनाळ व बोरगाव यासह अनेक गावाला महापुराचा फटका बसला आहे. कर्नाटकातल्या सीमावर्ती भागांत ही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून कर्नाटकातून उदगीर तालुक्यात नद्यांतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून आले. .उदगीर देगलूर जाणाऱ्या रस्त्यावरील नदीला महापूर आला असून नदीकाठी असलेल्या धडकनाळ बोरगावसह अनेक गावांना पुराचा मोठा फटका बसला. पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने जनावरे पुरात वाहून जाऊन मृत्युमुखी पडले आहेत. वीज पुरवठा खंडित झाला असून पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्याने रस्तेही वाहतुकीसाठी रस्ते बंद झाले आहेत..Heavy Rain: अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत.अहमदपूर, उदगीरमधील मंडलातील पाऊसरविवारी रात्री अहमदपूर तालुक्यातील अंधोरी मंडलात १२५.८, अहमदपूर मंडलात १२३.३, किनगाव - १२२.३, शिरूर ताजबंद - ८४.५ तर हडोळती मंडलात ९२.८ मिलिमीटर पाऊस झाला. उदगीर तालुक्यात नागलगाव मंडलात १२३.८, वाढवणा - ७३, मोघा - १००.३, हेर - ६८.५ व देवर्जन मंडलात ८३.८ मिलिमीटर पाऊस झाला. चाकूर मंडलात ७१,८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे..अन्य तालुक्यात पडलेला पाऊस पुढीलप्रमाणेलातूर - २६.८,औसा - २८.३,निलंगा - ३२.६,चाकूर - ५५.४,रेणापूर - ४४.६,देवणी - ४२.५,शिरूर अनंतपाळ - ३७जळकोट - ३४.४.दरम्यान धाराशिव जिल्ह्यात शुक्रवारी रात्री १४.५ मिलिमीटर पाऊस झाला. मांजरा धरणाची पाणी पातळी वाढली असून आता सहा दरवाजे उघडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.