Drip Irrigation
Drip Irrigation Agrowon
टेक्नोवन

Drip Irrigation : ठिबक सिंचन संचासाठी आम्ल प्रक्रिया

अरुण देशमुख

Agriculture Irrigation : उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यासाठी ठिबक सिंचन संचाचे योग्य व्यवस्थापन अपेक्षित आहे. ठिबक सिंचन संच वापरादरम्यान भेडसावणाऱ्या प्रमुख समस्यामध्ये ड्रीपर बंद होऊन त्यांचा प्रवाह कमी होणे, वीज कमी जास्त होणे त्यामुळे संच चालण्यासाठी पुरेसा दाब न मिळणे,

त्यामुळे शेतात सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात पाणी व खते न मिळणे, ठिबक सिंचनातील लोखंडी भाग गंजणे यांचा समावेश होतो. पाण्यात भौतिक पदार्थ तसेच शेवाळ जास्त प्रमाणात असल्यास वाळूच्या गाळण टाकीचा वापर करावा. खोल कूपनलिकेमधील किंवा नदीतील पाणी वापरत असल्यास पाण्यामध्ये वाळूचे बारीक कण येण्याची शक्यता असते. अशा ठिकाणी हायड्रोसायक्लोन फिल्टरचा वापर करावा.

पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण जास्त असल्यास आम्ल प्रक्रिया करणे जरुरीचे असते. आम्ल उपचारासाठी पुढीलपैकी कोणत्याही एका ॲसिडचा वापर करावा.

सल्फ्यूरिक ॲसिड (६५%)

हायड्रोक्लोरिक ॲसिड (३५%)

नायट्रिक ॲसिड (८५ %)

फॉस्फोरिक ॲसिड (८५ %)

टीप : जर पाण्यात लोहाचे प्रमाण ०.५ पीपीएमपेक्षा जास्त असेल, तर फॉस्फोरिक ॲसिडचा वापर टाळावा.

क्लोरीन प्रक्रिया

सूक्ष्म जिवाणूंमुळे किंवा शेवाळामुळे ड्रीपरची छिद्रे बंद झाल्याची तीव्रता लक्षात घेऊन ३० ते ५० मि. ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात सोडिअम हायपोक्लोराइड किंवा कॅल्शिअम हायपोक्लोराइडचा वापर करावा.

क्लोरीनयुक्त पाणी नळ्यामध्ये तासभर तसेच राहू द्यावे.

एक तासानंतर लहान जलवाहिनीच्या टोकाशी क्लोरीनचे प्रमाण मोजावे आणि ते कमीत कमी १ मि. ग्रॅम प्रति लिटर एवढे असावे.

क्लोरिनचे प्रमाण समाधानकारक असल्यास गाळण टाकीसह सर्व नळ्या फ्लश कराव्यात.

लहान जलवाहिनीच्या टोकाशी क्लोरीनचे प्रमाण समाधानकारक नसेल, तर १ मि. ग्रॅम प्रति लिटर क्लोरीनचे प्रमाण मिळेपर्यंत वरील प्रक्रिया पुन्हा करावी.

आम्ल प्रक्रिया करण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती

एक लिटरचे माप, डिस्पोजेबल सीरिंज, पीएच तपासण्यासाठी लिटमस पेपर / पीएच मीटर, हातमोजे, एक लिटरचे भांडे.

सुरुवातीस जे आम्ल वापरत आहोत, त्यानुसार एक लिटर पाण्याचा पीएच दोन आणण्यासाठी किती मिलि आम्ल लागते ते काढण्यासाठी डिस्पोजेबल सीरिंजमधून एक लिटर पाण्यात आम्ल टाकत राहावे. पीएच मीटर किंवा लिटमस पेपरने खात्री करून घ्यावी.

आम्ल प्रक्रिया १५ मिनिटांसाठी करावी.

संचामधून १५ मिनिटांत किती पाणी जाणार आहे, त्यानुसार किती आम्ल लागणार आहे ते काढून घ्यावे.

उदाहरण : खालील तक्त्यामध्ये १५ मिनिटे आम्ल प्रक्रिया करण्यासाठी किती आम्ल लागेल हे कसे काढावे हे दाखविले आहे. इथे ड्रीपरमधील अंतर ४० सेंमी आणि ड्रीपरचा प्रवाह ताशी २ लिटर धरला आहे.

विवरण दोन नळ्यांतील अंतर

४ फूट ५ फूट ६ फूट ७ फूट ८ फूट

एक एकराचे क्षेत्रफळ (चौरस फूट) ४३,५६० ४३,५६० ४३,५६० ४३,५६० ४३,५६०

एकूण ठिबक नळीची लांबी (फूट) १०,८९० ८,७१२ ७,२६० ६,२२२ ४,८४०

एकूण ड्रीपरची संख्या (नग) ८,७१२ ६,९६९ ५,८०८ ४,९७८ ३,८७२

एक एकरमध्ये तासी पडणारे पाणी (लिटर) १७,४२४ १३,९३८ ११,६१६ ९,९५६ ७,७४४

एक एकरमध्ये १५ मिनिटांमध्ये पडणारे पाणी (लिटर) ४,३५६ ३,४८५ २,९०४ २,४८९ १,९३६

एक लिटर पाण्याचा पीएच २ करण्यासाठी लागणारी आम्लाची मात्रा (मिलि) २.२५ २.२५ २.२५ २.२५ २.२५

एक एकरमध्ये १५ मिनिटांमध्ये पडणाऱ्या पाण्याचा पीएच २ करण्यासाठी लागणारी आम्लाची मात्रा (मिलि लिटर) ९,८०१ ७,८४० ६,५३४ ५,६०० ४,३५६

एक एकरमध्ये १५ मिनिटांमध्ये पडणाऱ्या पाण्याचा पीएच २ करण्यासाठी लागणारी आम्लाची मात्रा (लिटर) १० ८ ६.५ ५.५ ४.५

टीप : आम्ल प्रक्रिया झाल्यानंतर संच २४ तास बंद ठेवावा. दुसऱ्या दिवशी जास्त दाबाने मेन लाइन, सब मेन लाइन आणि लॅटरल्स / ड्रीप लाइन फ्लश कराव्यात.  ड्रीपरचा प्रवाह तपासून ड्रीपर स्वच्छ झाल्याची खात्री करून घ्यावी.

अरुण देशमुख, ९५४५४५६९०२

(प्रमुख, कृषिविद्या विभाग, नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रा.लि., पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Stamp Duty : सातारा जिल्ह्यात पीककर्जासाठी ‘मुद्रांक शुल्क’ माफ

Onion Market : कांदा दरात घसरणीने उत्पादक अडचणीत

Water Scarcity : लोणी भापकर योजनेमुळे आठ गावे अन् ७८ वाड्या होणार टंचाईमुक्त

Co-operative Society : विकास सेवा सोसायट्यांवर आता ‘सीसीटीव्ही’चा ‘वॉच’

Silver Rate : चांदी दरात १४०० रुपयांची वाढ

SCROLL FOR NEXT