Raigad Newa: समुद्र किनारपट्टी व खाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर लहान आकाराचे मासे पकडले जात असल्याच्या तक्रारींवर मत्स्यव्यवसाय विभागाने कडक पावले उचलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. माशांच्या पुनरुत्पादनावर परिणाम होऊ नये आणि मासेमारी संसाधनांचे संरक्षण व्हावे, या हेतूने ठराविक आकारापेक्षा कमी असलेले मासे पकडणे कायदेशीरदृष्ट्या दंडनीय असल्याचे सांगण्यात आले आहे..रायगड जिल्ह्यातील मत्स्य उत्पादन सातत्याने घटत चालले आहे. यास काही नैसर्गिक कारणे आहेत, त्याचप्रमाणे काही मानवनिर्मित कारणेही आहेत. यामध्ये लहान मासे पकडणे हे महत्वाचे कारण आहे. किनारी भागात आलेले लहान मासे पकडले जातात, अशा तक्रारी मत्स्यव्यवसाय विभागाकडे सातत्याने येत असतात..Fish And Heart Health : मासे खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो का?.अनेक ठिकाणी बेकायदेशीर जाळी, काटेरी जाळी आणि अतिसूक्ष्म जाळ्यांचा वापर वाढत असल्याचे निरीक्षण आल्याने तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास जाळी जप्त करणे, नौका सील करणे आणि आर्थिक दंड अशी कडक कारवाई केली जाणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले..Ujani Dam : उजनीतील लहान मासे मारण्यास प्रतिबंध करा.सध्या वेगेवगळ्या कारणाने मत्सव्यवसाय अडचणीत असतानाच लहान मासे पकडले जात असताना या व्यवसायवर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याबाबत कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. माशांचे पुनरुत्पादन आणि मासेमारी संसाधनांचे संरक्षणासाठी यामुळे मदत होणार आहे..जैव विविधता टिकवण्याचे आवाहनजिल्ह्यातील सर्व मच्छीमार संघटनांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले असून, समुद्री जैवविविधता टिकवण्यासाठी माशांच्या किमान आकार मर्यादा काटेकोरपणे पाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मच्छीमार संघटनांनी याआधीही याबाबत प्रशासनाकडे तक्रार केली होती, तरीही काही जणांकडून नियमांचे उल्लंघन केले जात होते. त्यामुळे आता याबाबत कडक धोरण राबवणार असल्याचेही सांगम्यात आले आहे..काही मच्छिमार लहान आकाराची जाळी लावून मासेमारी करीत असतात, त्याचा परिणाम उत्पन्नावर होत आहे. यासाठी सहकारी संस्था, स्थानिक प्रशासन व मत्स्यव्यवसाय विभाग यांनी एकत्र येऊन जागरुकता आणि कडक नियमबद्धता लागू करणे गरजेचे आहे.- संजय पाटील, सहाय्यक उपायुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग- रायगड.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.