Nitrogen Fixation: शेतकऱ्यांना आता गव्हाला खत देण्याची गरजच पडणार नाही. कारण युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफॉर्निया येथील संशोधकांनी स्वतःच खत तयार करणाऱ्या गव्हाचे वाण विकसित केले आहे. हे वाण जमिनीतील जिवाणूंना नैसर्गिकरित्या खत तयार करण्यासाठी प्रोत्साहित करतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे बरेच कष्ट आणि खर्च कमी होतील..संशोधनाची माहितीयुनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, डेव्हिस येथील वनस्पती विज्ञान विभागातील प्राध्यापक एडुआर्डो ब्लमवॉल्ड यांच्या नेतृत्वाखाली गव्हाचा नवीन वाण विकसित करण्यात आला आहे. CRISPR जनुक संपादन तंत्रज्ञानाचा वापर करून, शास्त्रज्ञांनी गहू वाणामध्ये 'एपिजेनिन' या नैसर्गिक रसायनाचे उत्पादन वाढवले..Agricultural Innovation: साध्या भातजातीमध्ये सुगंध आणण्यात यश. जेव्हा गव्हाची मुळे हे अतिरिक्त रसायन जमिनीत सोडतात, तेव्हा ते नत्राचे स्थिरीकरण करणाऱ्या जिवाणूंना वाढीसाठी मदत करते. हे जिवाणू हवेतील नत्र शोषून त्याचे रूपांतर वनस्पतींना वापरण्यायोग्य नत्रामध्ये करतात. यामुळे अतिरिक्त नत्राची मात्रा देण्याची गरज पडणार नाही. या संशोधनामुळे शेतकऱ्यांचा नत्र खतावरील खर्च काही प्रमाणात वाचेल, मृदा आणि पाणी प्रदूषण कमी होईल आणि पीक उत्पादन वाढेल. हे तंत्रज्ञान विशेषतः विकसनशील देशांमधील अन्न सुरक्षेसाठी एक मोठे वरदान ठरणार आहे..संशोधनाच्या पायऱ्या- संशोधकांनी वनस्पतींद्वारे नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या २,८०० रसायनांचा अभ्यास केला आणि त्यापैकी २० रसायने ओळखली जी नत्रस्थिरीकरण करणाऱ्या जिवाणूंना 'बायोफिल्म' (एक चिकट संरक्षक थर) तयार करण्यास मदत करतात.- ही बायोफिल्म जिवाणूंच्या सभोवताली कमी ऑक्सिजनचे वातावरण तयार करते, जे 'नायट्रोजनेज' नावाच्या विकराला नत्र स्थिरीकरणासाठी आवश्यक असते.- संशोधकांनी 'एपिजेनिन' नावाच्या एका विशिष्ट फ्लेव्होनवर लक्ष केंद्रित केले. त्यांनी CRISPR वापरून गव्हाची रचना अशा प्रकारे बदलली की तो गरजेपेक्षा जास्त एपिजेनिन तयार करू लागला.- हा अतिरिक्त एपिजेनिन जमिनीत सोडला जातो, ज्यामुळे जिवाणू बायोफिल्म तयार करतात आणि वनस्पतींना नैसर्गिकरित्या नत्र उपलब्ध होतो. कमी खतांच्या परिस्थितीतही या सुधारित गव्हाने जास्त उत्पादन दिले..'आफ्रिकेतील लोकांची आर्थिक क्षमता कमी असल्यामुळे ते खते वापरत नाहीत आणि त्यांची शेती ६ ते ८ एकरपेक्षा मोठी नसते. जर अशी पिके लावली जी जमिनीतील जिवाणूंना पिकांसाठी आवश्यक असलेले खत नैसर्गिकरित्या तयार करण्यासाठी उत्तेजित करतात. हा खूप मोठा बदल आहे!' असे युसी डेव्हिस येथील प्रतिष्ठित प्राध्यापक एडुआर्डो ब्लमवॉल्ड म्हणाले..तृणधान्यांतही नत्र स्थिरीकरण; खतांची बचत होणार.नत्र खताची समस्यागहू हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उत्पादक तृणधान्य आहे आणि जागतिक नत्र खतांच्या वापरापैकी सुमारे १८ टक्के वापर गव्हासाठी होतो. पिकांना दिले जाणारे केवळ ३० ते ५० टक्के खत हे शोषले जाते. उरलेले खत जमिनीत तसेच राहून जाते. जमिनीत शिल्लक राहिलेल्या नत्रामुळे 'नायट्रस ऑक्साईड' हा एक हरितगृह वायू तयार होतो ज्यामुळे वायू प्रदुषण होते. तसेच जमिनीतील नत्राच्या अवशेषामुळे जमिनीची सुपीकता कमी होते..संशोधनाचे संभाव्य परिणामया संशोधनाचे दूरगामी आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय फायदे आहेत. प्रा. ब्लमवॉल्ड यांच्या अंदाजानुसार, जर देशातील ५०० दशलक्ष एकर तृणधान्य शेतीवर खतांचा वापर १०% जरी कमी झाला, तरी दरवर्षी एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त बचत होऊ शकते. अन्न सुरक्षेच्या बाबतीत आफ्रिकेसारख्या अनेक विकसनशील प्रदेशांमध्ये शेतकरी आर्थिक अडचणींमुळे खते विकत घेऊ शकत नाहीत. हे तंत्रज्ञान त्यांना नैसर्गिकरित्या खत मिळवण्याचा मार्ग उपलब्ध करून देईल, ज्यामुळे अन्न उत्पादन वाढेल. यासोबत या तंत्रज्ञानामुळे रासायनिक खतांचा वापर कमी होईल आणि पर्यावरणाचे संतुलन राखले जाईल..हे तंत्रज्ञान केवळ गव्हापुरते मर्यादित नाही; यापूर्वी भातामध्येही असे यश मिळाले आहे आणि आता इतर प्रमुख तृणधान्य पिकांसाठीही यावर काम सुरू आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाने या तंत्रज्ञानासाठी पेटंट अर्ज दाखल केला आहे, ज्याची प्रक्रिया सध्या चालू आहे. हे संशोधन भविष्यात शाश्वत, कमी खर्चाच्या आणि पर्यावरणासाठी अनुकूल शेतीसाठी एक नवीन दिशा देऊ शकते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.