Irrigation Scheme : झाशीनगर सिंचन योजना २७ वर्षांनंतरही अपूर्ण

Jhashinagar Irrigation Scheme : अर्जनी मोरगाव तालुक्‍यातील साडेचार हजार हेक्‍टरला सिंचनाची सोय व्हावी याकरिता १९९६ मध्ये झाशीनगर उपसा सिंचन योजना अंमलात आली.
Irrigation Scheme
Irrigation SchemeAgrowon
Published on
Updated on

Gondiya News : अर्जनी मोरगाव तालुक्‍यातील साडेचार हजार हेक्‍टरला सिंचनाची सोय व्हावी याकरिता १९९६ मध्ये झाशीनगर उपसा सिंचन योजना अंमलात आली. मात्र २७ वर्षांनंतरही हा प्रकल्प पूर्णत्वास गेला नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे.

अर्जुनी मोरगाव तालुक्‍यातील झाशीनगर परिसरातील शेतकऱ्यांची सिंचनाची सोय व्हावी याकरीता मध्यम प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. झाशीनगर उपसा सिंचन योजना असे याचे नामकरण करण्यात आले. या प्रकल्पासाठी १४ कोटी ४३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली.

Irrigation Scheme
Upsa Irrigation Scheme : बोदवड योजनेसाठी ९६ कोटी निधी

यानंतर कामाला सुरुवात करण्यात आले, मात्र या योजनेचे काम सुरू असतानाच नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची घोषणा आली. परिणामी या प्रकल्पाचे काही क्षेत्र व्याघ्र प्रकल्पात येत असल्याने अडचण निर्माण झाली. त्यानंतर व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात येणाऱ्या भागात काम करण्यासाठी फाइल वनविभागाकडे पाठविण्यात आली.

त्याला बराच विलंब झाल्याने या प्रकल्पाचे काम रखडले व तेव्हापासून या योजनेला जणू ग्रहणच लागले. हे ग्रहण २७ वर्षांतही सुटू शकले नाही. परिणामी शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्नही भंगले आहे. प्रकल्प रखडल्याने प्रकल्पाच्या किमतीतही वाढ झाली आहे.

Irrigation Scheme
Agriculture Irrigation Scheme : ‘आष्टी उपसा’चे पाणी मोडनिंबच्या शिवारात

झाशीनगर उपसा सिंचन प्रकल्पाची सिंचन क्षमता ४२२५ हेक्‍टर होती. या प्रकल्पातून रब्बी हंगामात १५० हेक्‍टरला पाणी देण्यात आले होते. या योजनेचा लाभ १२ गावांतील शेतकऱ्यांना होणार होता. लवकरच पाइपलाइन टाकण्यात येणार असून तीन गावांना पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे अधिकारी सांगतात. ७० टक्‍के काम झाल्याचा दावाही केला जातो, परंतु शेतकऱ्यांना पाणी मिळाले तरच हा दावा खरा ठरणार आहे.

प्रकल्पाची किंमत वाढली

१९९६ मध्ये या प्रकल्पाची किंमत १४ कोटी ४३ लाख रुपये होती. आता २७ वर्षांनंतर त्यात वाढ होत ती १२७ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com