POCRA Shmeme Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

POCRA : ‘पोकरा’अंतर्गत ७९ कोटींवर अनुदान वितरित

पोकराअंतर्गत तीन टप्प्यांमध्ये जिल्ह्यातील २४० गावांची निवड झालेली आहे. या गावांतील शेतकऱ्यांना फळबाग लागवड, विहिरी, बीजोत्पादन, कंपोस्ट खतनिर्मिती आदी घटकांतर्गत कामे पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ देण्यात येतो.

टीम ॲग्रोवन

हिंगोली ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) (POCRA) शुक्रवार (ता. ५)पर्यंत २६ हजार ९८ शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीद्वारे ७९ कोटी ९२ लाख ८४ हजार रुपये अनुदान (POCRA Subsidy) जमा करण्यात आले. अजून मुंबई कार्यालय (डेस्क ७) स्तरावर ५२९ शेतकऱ्यांचे ३२ लाख २४ हजार रुपये एवढ्या अनुदानाचे प्रस्ताव प्रलंबित आहेत.

पोकराअंतर्गत तीन टप्प्यांमध्ये जिल्ह्यातील २४० गावांची निवड झालेली आहे. या गावांतील शेतकऱ्यांना फळबाग लागवड, विहिरी, पंप, शेततळी, शेडनेट, पॉलिहाउस, तुषार संच, ठिबक संच, मत्स्यपालन, परसातील कुक्कुटपालन, रेशीम शेती, बीजोत्पादन, कंपोस्ट खतनिर्मिती आदी घटकांतर्गत कामे पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ देण्यात येतो. आजवर जिल्ह्यातील ४२ हजार ९३३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ३८ हजार ९६८ शेतकऱ्यांची पडताळणी झाली आहे. नोंदणीकृत शेतकऱ्यांनी विविध घटकांच्या लाभासाठी १ लाख १७ हजार ६७५ अर्ज केले आहेत. त्यापैकी ग्राम कृषी संजीवनी (डेस्क १) स्तरावर ५ हजार ४६२ अर्ज प्रलंबित आहेत.

कृषी सहायक स्थळ पाहणी (डेस्क २) स्तरावर १२ हजार ५२० अर्ज प्रलंबित आहेत. उपविभागीय कृषी अधिकारी (डेस्क ३) स्तरावर पूर्वसंमतीसाठी १ हजार ४४५ अर्ज प्रलंबित आहेत. कामे पूर्ण करुन पोर्टलवर देयके अपलोड केलेल्या शेतकऱ्यांची संख्या १४ हजार ३२४ एवढी आहे. मोका तपासणीसाठी कृषी सहायक (डेस्क ४) स्तरावर ३ हजार १३०, तर लेखा अधिकारी (डेस्क ५) स्तरावर ३ अर्ज प्रलंबित आहेत. अंतिम मंजुरीसाठी उपविभागीय कृषी अधिकारी (डेस्क ६) स्तरावर २० अर्ज प्रलंबित आहेत.

आजवर अनुदान वितरित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या २६ हजार ९८ असून, अनुदानाची रक्कम ७९ कोटी ९२ लाख ८४ हजार रुपये आहे. उपविभागामध्ये मृदा व जलसंधारणाची १ हजार ५५५ कामे प्रस्तावित आहेत. त्यावर १३९ कोटी ५२ लाख ९४ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. २२९ कामांना तांत्रिक मंजुरी देण्यात आली. १५४ कामांचे कार्यारंभ आदेश दिले. त्यापैकी १२८ कामे पूर्ण झाली असून, त्यावर ३ कोटी ५१ लाख ३४ हजार रुपये निधी खर्च झाला. खरीप आणि रब्बीत प्रत्येकी १३८ मिळून एकूण २७६ शेतीशाळांचे नियोजन आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shalinitai Patil Passes Away: माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन

Sugarcane Price: प्रतापगड कारखान्याचा प्रतिटन एकरकमी ३३५० रुपये दर

Wheat Rust Disease: गव्हावरील तांबेरा रोगाचे नियंत्रण करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

Flood Relief: भूम तालुक्यात पूरग्रस्तांना ९० कोटींचे अनुदान वाटप

Loan Recovery Issue: कर्जमाफीची घोषणा; तरीही ऊसबिलातून वसुली सुरूच!

SCROLL FOR NEXT