‘पोकरा’ प्रकल्प संचालकपदी श्याम तागडे यांची नियुक्ती

तागडे हे १९९१ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. पोकरा प्रकल्प संचालक पदावर त्यांची पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली आहे.
POCRA
POCRAAgrowon

मुंबई ः मराठवाडा, विदर्भातील पंधरा जिल्ह्यांमधील हवामानाच्या दृष्टीने संवेदनशील गावांसाठी व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या अशा नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पाची (POCRA Project) धुरा भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) प्रधान सचिव दर्जाचे अधिकारी श्याम तागडे (Shyam Tagade) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. पोकराचे प्रकल्प संचालक पद प्रधान सचिव स्तरावर उन्नत करून ही नियुक्ती करण्यात आली आहे.

तागडे हे १९९१ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. पोकरा प्रकल्प संचालक पदावर त्यांची पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली आहे. तागडे यांच्या रूपाने मागील दोन वर्षांत प्रथमच पोकराला पूर्णवेळ अधिकारी मिळाला असून, प्रकल्पाला गती देण्यासाठी याचा लाभ होईल. तागडे यांना प्रशासकीय सेवेतील प्रदीर्घ अनुभव आहे. सुरुवातीला गडचिरोलीचे जिल्हाधिकारी, तसेच महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक संघ, महसूल व वन विभाग, सामाजिक न्याय अशा विविध विभागांमध्ये प्रमुख पदांचा कार्यभार त्यांनी सांभाळला आहे.

तत्पूर्वी, २०१७-१८ मधील पोकराच्या प्रकल्प स्थापनेपासून जुलै २०२१ पर्यंत विकासचंद्र रस्तोगी यांनी पोकरा प्रकल्पाची पायाभरणी करून गती दिली. या दरम्यान २०२० मध्ये काही महिने गणेश पाटील यांनी प्रकल्प संचालक म्हणून काम पाहिले होते. रस्तोगी यांच्यानंतर जुलै २०२१ पासून सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव इंद्रा मालो यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. मालो यांची २५ फेब्रुवारी २०२२ रोजी केंद्रीय महिला व बालकल्याण विभागात सहसचिवपदी पदोन्नती झाल्याने पोकराचे प्रकल्प संचालकपद रिक्त होते. त्यानंतर मार्चमध्ये वस्तू व सेवा कर विभागाचे सहआयुक्त राहुल द्विवेदी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. आता तागडे यांची पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली आहे.

हवामान बदलांमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करणे व शेती व्यवसाय किफायतशीर करण्यास साहाय्य करणे हा पोकरा प्रकल्पाचा उद्देश आहे. प्रकल्पाअंतर्गत हवामान अनुकूल तंत्रज्ञानाच्या वापरासाठी तीसहून अधिक विविध घटकांसाठी ५० ते १०० टक्के अर्थसाहाय्य देण्यात येते. यामध्ये भूमिहीन, महिला, अल्पभूधारक शेतकरी, गट व गावांचे सक्षमीकरण केले जाते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com