Solapur News: उजनी धरण सध्या १०० टक्के भरलेले असून धरणात ११७ टीएमसी पाणी आहे. शेतीसाठी धरणातून रब्बी हंगामातील पहिले आवर्तन १५ जानेवारीपासून सोडले जाणार आहे. सध्या आचारसंहिता सुरू असल्याने कालवा सल्लागार समितीची बैठक होणार नाही. .जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने उजनीतून शेतीसाठी पहिले आवर्तन सोडण्याचे नियोजन झाले आहे. उजनी धरणातील पाण्याचे नियोजन आठमाही आहे. धरणातील पाणी शेती व पिण्यासाठी कसे ठेवायचे, याचे नियोजन दरवर्षी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत होते. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व स्थानिक आमदारांची या बैठकीला उपस्थिती असते..Ujani Dam: सादेपूरमध्ये दीड किमी कालवाच बुजवला.मात्र, सध्या महापालिकेची निवडणूक सुरू असून पुढे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा बिगूल वाजणार आहे. आचारसंहितेत कालवा सल्लागार समितीची बैठक घेता येणार नसल्याने लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता राज्याच्या जलसंपदा विभागाच्या सचिवांना पत्रव्यवहार करून त्यांच्या परवानगीने आता रब्बी हंगामातील पहिले आवर्तन शेतीसाठी सोडणार आहेत. दरम्यान, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यात १० ते १२ दिवस पुरेल इतकेच पाणी आहे..मात्र, समांतर जलवाहिनीमुळे औजमध्ये नदीवाटे पाणी सोडण्याची मागणी केली जाणार नसल्याची महापालिकेची भूमिका आहे. भीमेतून औजमध्ये पाणी सोडल्यास त्याचे पैसे जलसंपदा विभागाला द्यावे लागतील, हे त्यामागील कारण आहे. उन्हाळ्यात नदीत पाणी सोडल्यावर आपोआप औज बंधारा भरतो, ते पाणी सोलापूर शहरासाठी वापरता येईल, असेही महापालिकेचे नियोजन आहे..Agriculture Irrigation: गिरणा पट्ट्यातील अनेक प्रकल्पांचा रब्बीस लाभ.४० दिवसांचे असणार आवर्तनरब्बीच्या पहिल्या आवर्तनासाठी ६ टीएमसी पाणी लागणार आहे. उजव्या, डाव्या कालव्यासह दहिगाव, सीना-माढा उपसा सिंचन योजना व बोगद्यातून पाणी सोडले जाणार आहे. पहिले आवर्तन ४० दिवसांचे असणार आहे. त्यानंतर १५ मार्चनंतर दुसरे आवर्तन सोडले जाणार आहे. सोलापूर शहरासाठी सोलापूर ते उजनी अशी १७० एमएलडी क्षमतेची समांतर जलवाहिनी झाल्याने भीमा नदीतून सोडले जाणारे २० टीएमसी पाण्याची बचत होणार आहे..उजनीतील सध्याची स्थितीएकूण पाणीसाठा११७ टीएमसीउपयुक्त पाणीसाठा५३.५७ टीएमसीपहिल्या आवर्तनासाठी पाणी६ टीएमसीपहिल्या आवर्तनाचे दिवस४०.आचारसंहितेमुळे उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने घेतला जाईल. सध्या शेतकऱ्यांची पाण्यासाठी मागणी येत असून साधारणत: १५ जानेवारी दरम्यान उजनीतून पहिले आवर्तन सोडले जाईल. आचारसंहिता संपल्यानंतर उजनी धरणातील पाण्याचे नियोजन अंतिम केले जाईल. एस. एस. खांडेकर, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.