Soya Oil Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soya Oil Rate: खाद्यतेलाचे भाव का वाढत आहेत ? टनामागे ४० ते ७० डाॅलरची वाढ

Edible Oil Market: इस्त्राईल-इराण युध्द, कांडला बंदरावरील खोळंबा आणि जागतिक पुरवठा साखळीतील अडचणीमुळे भारतात सोया तेलाच्या दरात टनामागे ४० ते ७० डॉलर्सनी वाढ झाली आहे. आयात शुल्क कपात करूनही सरकार दर आटोक्यात ठेवू शकलेले नाही.

Anil Jadhao 

Pune News: इस्त्राईल आणि इराण युध्दामुळे जागतिक बाजारात खाद्यतेलाचे भाव वाढले आहे. परिणामी आयात शुल्क कमी करूनही भाव वाढत आहेत. त्यातच महत्वाच्या कांडला बंदरावर व्हेसल्स खाली करण्यासाठी उशीर होत असल्याने आयात खर्च वाढत आहे. परिणाम देशातील खाद्यतेलाचे भाववाढीला मदत होत आहे, असे ‘एसईए’चे अध्यक्ष संजीव अस्थाना यांनी म्हटले आहे.

साॅल्वेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ‘एसईए’चे अध्यक्ष संजीव अस्थाना यांनी सध्याच्या समस्यांविषयी माहीती दिली. “इस्त्राईल आणि इराण युध्दामुळे जागतिक बाजारावर परिणाम होत आहे. या दोन देशांमधील वादाचे पडसाद पश्चिम आशियातही दिसत आहे. हा भाग जागतिक इंधनाचा स्त्रोत आहे. हा वाद कायम राहीला राहीला ऊर्जाधारित उद्योगांवर परिणाम होणार आहे, तसेच जागतिक पुरवठा साखळी देखील विस्कळीत होऊ शकते. आधीच कोरोना आणि त्यानंतर देशा देशांमधील तणामुळे पुरवठा साखळी कुमकुवत झाली आहे,” असे अस्थाना यांनी म्हटले आहे.

इस्त्राईल आणि इराण यांच्यामध्ये सुरु असलेल्या युध्दाचा परिणाम जागतिक बाजारावर होत आहे. खाद्यतेल बाजारही यातून सुटला नाही. खाद्यतेलाचे भाव टनामागे ४० ते ७० डाॅलरने वाढले आहेत. यामुळे देशांतर्गत भाव कमी करण्यासाठी केलेल्या उपाय प्रभावी ठरताना दिसत नाहीत. अस्थाना म्हणाले की, “सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात कपात केल्यानंतर भाव कमी होत होते. मात्र जागतिक बाजारातील या घडामोडींमुळे दर पुन्हा वाढत आहेत. जागतिक भू-राजकीय घडामोडी आणि बाजारात निर्माण झालेली अस्थिरता तसेच पुरवठा साखळीतील अडचणी याचा हा परिणाम आहे.”

कांडला बंदरावर उशीर

कांडला बंदरांवर सध्या कंटेनर खाली करण्यासाठी उशीर होत आहे. याविषयी अस्थाना म्हणाले, “ कांडला बंदर खाद्यतेलाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. या बंदरावर अनेक मोठ्या तेल रिफायनरी आहेत. या रिफायनरींमधून उत्तर आणि पूर्व भारतात तेलाचा पुरवठा होतो. कांडला बंदरावर कंटेनर खाली करण्यासाठी वेळ लागत आहे. यामुळे देशात खाद्यतेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. १६ जून रोजी २ व्हेसल्स खाली करण्याचे काम सुरु होते. यामुळे ४५ हजार टन तेल होते. तर ८ व्हेसल्स थांबन होत्या. तसेच ५ व्हेसल्स पुढील आठवड्यात दाखल होण्याची शक्यता आहे. सध्या ९ ते १० दिवस वाट पाहावी लागत आहे. आयातीचा ओघ पाहता पुढे १५ ते २० दिवस उशीर लागू शकतो.”

आयात खर्च वाढला

व्हेसल्स खाली करण्यासाठी उशीर झाल्यास देशात खाद्यतेलाचा पुरवठा कमी होऊ शकतो. तसेच व्हेसल्स खाली करण्यासाठी उशीर झाल्याने खर्चही वाढणार आहे. परिणामी आयात खर्च वाढेल आणि देशात तेलाचे भाव वाढतील. एसईएने हा प्रश्न गुजरात सरकार आणि कांडला बंदर प्रशासनाच्या लक्षात आणून दिला आणि खाद्यतेल व्हेसल्स खाली करण्याला प्राधान्य देण्याची मागणी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lek Ladki Yojana: ‘लेक लाडकी’च्या १२५०० लाभार्थी

Farmer Innovation: शेतकऱ्यांच्या कल्पकतेला शाबासकीची थाप

War Impact on Agri: युद्धामुळे खतांच्या किंमती वाढणार?

Ahilyanagar ZP Budget: अहिल्यानगर झेडपीच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी चार कोटी

Village Mapping: गावाचे मॅपिंग नसल्याने शेतकऱ्यांची वाढली चिंता

SCROLL FOR NEXT