Soybean Seed Shortage: बाजारात सोयाबीन बियाण्यांची टंचाई

Kharif Season 2025: खरीप हंगामाला सुरुवात होत असतानाच बाजारपेठेत नामांकित खासगी कंपन्यांच्या सोयाबीन बियाण्यांची टंचाई जाणवत आहे.
Soybean Shortage
Soybean ShortageAgrowon
Published on
Updated on

Akola News: खरीप हंगामाला सुरुवात होत असतानाच बाजारपेठेत नामांकित खासगी कंपन्यांच्या सोयाबीन बियाण्यांची टंचाई जाणवत आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने अनेक ठिकाणी शेतकरी बियाण्यांसाठी फिरले. अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ म्हणजेच ‘महाबीज’चे बियाणे शेतकऱ्यांसाठी मोठा आधार बनले आहे.

सध्या सार्वत्रिक स्वरूपाचा पाऊस झालेला नसल्याने विभागनिहाय पेरण्या मागेपुढे होत आहेत. काही ठिकाणी लागवड सुरू तर काही ठिकाणी पेरण्या रखडलेल्या स्थितीत आहेत. अकोला, बुलडाणा, वाशीम या तीनही जिल्ह्यांच्या बाजारपेठेत आज रोजी नामांकित वाणांचे खासगी कंपन्यांचे बियाणे गेल्या आठवडाभरापासून संपलेले आहे. जे काही बियाणे उपलब्ध होते ते विक्रेत्यांनी तसेच कंपन्यांनी दर वाढवून बाजारात विक्री सुरू केली.

Soybean Shortage
Soybean Seeds: सोयाबीनचे ६५,७७२ क्विंटल बियाणे विक्री

एका बॅगेमागे सर्रास ३०० ते ४०० रुपये अतिरिक्त वसूल करण्यात आले. एक प्रकारे शेतकऱ्यांची ही लूटमार सुरू होती. तक्रार नसल्याने कृषी खातेही हातावर हात देऊन बसले. अशा परिस्थितीत बऱ्याच शेतकऱ्यांना ‘महाबीज’च्या बियाण्याचा मोठा आधार मिळाला. शेतकऱ्यांचा महाबीजकडे ओढा वाढलेला दिसून आला.

‘महाबीज’ने यंदा खरिपासाठी पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध करून दिले होते. यात प्रामुख्याने सोयाबीन या मुख्य पिकाचे दोन लाख क्विंटल बियाण्याचा पुरवठा केला. त्यापैकी आजवर एक लाख ३५ हजार क्विंटल बियाणे विक्री झाले. उर्वरित ६५ हजार क्विंटल बियाण्याचीही वेगाने विक्री होत आहे. ‘महाबीज’ने यंदा सोयाबीनचे १८ वाण दिले आहेत. यात काही १० वर्षांवरील तर काही ५ वर्षांआतील वाणांचा समावेश होता.

Soybean Shortage
Seed Shortage : कपाशीच्या काही वाणांची टंचाई

प्रामुख्याने मागणी असलेल्या वाणांचेच बियाणे अधिक आहे. १० वर्षांवरील वाण ३० किलो आणि ५ वर्षांआतील वाणाचे बियाणे २२ किलो वजनाच्या बॅगेत दिले. निश्‍चित केलेल्या दरानेच बाजारात या बियाण्यांची विक्री केली जात आहे. विशेष म्हणजे दोन लाख क्विंटलपैकी ७० हजार क्विंटल बियाणे हे ५ वर्षांआतील म्हणजेच नवीन वाणांचे असून ते योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत देण्यात आले.

धानाचेही ३९ हजार क्विंटल बियाणे ‘महाबीज’ने पुरवले. यात प्रामुख्याने कोकण, पूर्व विदर्भ, नाशिक, अहिल्यानगर, पुणे विभागात पुरवठा झालेला आहे. जिकडे पाऊस झाला तिकडे लागवडही होत आहे. त्यामुळे एकूण बियाण्यापैकी आजवर २४ हजार क्विंटल बियाणे विक्री झाली. उर्वरित १५ हजार क्विंटलची विक्री सुरू आहे. योजनेतून ५६०० क्विंटल धानाचे बियाणेही दिले.

तुरीचे १० हजार क्विंटल बियाणे बाजारात विक्रीसाठी ‘महाबीज’ने दिले आहे. त्यापैकी ४१०० क्विंटल बियाण्याची विक्री झाली तर ५९०० क्विंटल बियाण्याची विक्री सुरू आहे. तुरीची पेरणी उशिरापर्यंत केली जाते. त्यामुळे हे बियाणे पूर्णपणे विकल्या जाईल, असा दावा केला जातो आहे. मूग, उडीद, ज्वारी व इतर व वाणांचे बियाणे सुद्धा महाबीजने बाजारात आणलेले आहे. टंचाईच्या काळात ‘महाबीज’च्या बियाण्याचा मोठा आधार शेतकऱ्यांना मिळाला.

बाजारात सोयाबीनच्या नामांकित वाणांचे कंपन्यांचे बियाणे केंव्हाच संपले. जे होते ते वाढीव दराने विकल्या जात होते. अशा स्थितीत मी ‘महाबीज’चे तीन बॅग बियाणे घेतले. यासाठी दरही वाजवी होता.
गजानन गोमासे, तामगाव, जि. बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com