Sowing Delayed by Rain: वागदरी (ता. अक्कलकोट) सह परिसरातील गोगाव, खैराट, भुरीकवठे, किरणळी, घोळसगाव, बोरगाव, बादोला, शिरवळ, सदलापूर शिरवळवाडी या परिसरात खरीप हंगामातील पेरणीला वेग आला आहे. .यंदा पावसाने दडी मारल्याने या परिसरातील पेरण्या खोळंबल्या होत्या. अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. पाऊस येईल या आशेवर या परिसरातील शेतकरी खरीप पेरण्या करत आहेत..Kharif Sowing: विदर्भात पावसाअभावी पेरण्या रखडल्या.गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे या परिसरातील खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला होता. तर यंदा पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. खरीप हंगामातील पेरण्या एक महिना पुढे गेल्याने शेतकरी मूग, उडीद पिकाला फाटा देऊन सोयाबीन, तूर पेरणे पसंत करत आहेत..Kharif Sowing Update: पूर्व विदर्भात केवळ ३३ टक्के पेरण्या.महिन्यापासून या परिसरात अत्यल्प पाऊस झाला आहे. शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. परंतु पाऊस न झाल्याने शेतकरी अल्पशा ओलाव्यावर पेरणी करत आहेत..केवळ पावसाच्या भरवसावर काळया आईची ओटी भरण्यासाठी शेतकरी कर्ज काढून पेरणी करत आहे. आतापर्यंत या परिसरात खरीप हंगामातील ८० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत...ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.