Weather Forecast: राज्यात पाऊस ओसरला असून, बहुतांश ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. राज्यात ऊन-सावल्यांच्या खेळ अनुभवायला मिळत आहे. आज (ता. १०) पुणे घाटमाथा, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथावर जोरदार सरींची शक्यता असल्याने, तसेच पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे..वायव्य मध्य प्रदेश आणि नैॡत्य उत्तर प्रदेशात ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, ईशान्येकडे सरकणारी ही प्रणाली आज निवळून जाणार आहे. मॉन्सून देशाच्या संपूर्ण भागात पोचल्यानंतर मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानातील अनुपगडपासून रोहतक, कमी दाबाचे केंद्र ते फुरसतगंज देहरी, धनबाद, बंकुरा, दिघा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे..Maharashtra Weather: नोव्हेंबर महिन्यात राज्यात थंडी कमी राहणार.दक्षिण गुजरात आणि केरळच्या किनाऱ्यालगत किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. पूर्व बांग्लादेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ ते ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे..Maharashtra Weather Forecast: पूर्व विदर्भात वादळी पाऊस शक्य.गुरुवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १८.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. कोकण, घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. .सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये अनेक ठिकाणी १५० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. घाटमाथ्यावरील तामणी येथे राज्यातील उच्चांकी २५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.