Wheat Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Wheat Market : गहू आवक वाढली

Wheat Arrival : विदर्भाच्या बहूतांश बाजार समित्यांमध्ये नव्या हंगामातील गहू, हरभऱ्याची आवक वाढली आहे.

Team Agrowon

Nagpur News : विदर्भाच्या बहूतांश बाजार समित्यांमध्ये नव्या हंगामातील गहू, हरभऱ्याची आवक वाढली आहे. परिणामी, काही बाजार समित्यांनी तर एका दिवशी एकच शेतीमाल आणण्याचे आवाहन केले आहे.

अमरावती बाजार समितीमध्ये लोकवन जातीच्या गव्हाची आवक २२१५ क्‍विंटलवर पोहोचली आहे. या बाजरात २४५० ते २७५० असा दर मिळाला. कळमना बाजारातील सरबती गव्हाची आवक १००० क्‍विंटलच्या घरात आहे. याला ३१०० ते ३५०० असा दर मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

रब्बी हंगामातील शेतीमालाच्या आवकेमुळे बाजार सध्या फुलला आहे. अमरावती बाजार समितीत गव्हाची आवक वाढत आहे. या ठिकाणी गावरान हरभरा आवक विक्रमी साडेआठ हजार क्विंटलवर पोहोचली आहे. ५४०० ते ६१०० असा दर हरभऱ्याला मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून साठवणुकीऐवजी विक्री केली जात आहे.

वाशीम जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीत हरभरा आणि गव्हाची दैनंदिन आवक प्रत्येकी साडेपाच हजार क्विंटलपेक्षा अधिक आहे. त्यातच अवकाळी पाऊस, गारपीट होण्याची शक्‍यतेने बाजार समितीने काही दिवस गहू न आणण्याचे आवाहन केले आहे.

अवकाळी पावसामुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेडच्या क्षमतेनुसारच शेतीमालाची खरेदी करण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे. या ठिकाणी सोमवारी (ता. १८) हरभऱ्याची ६१०० क्‍विंटल आवक झाली. ५००० ते ५३५५ असा दर हरभऱ्याला मिळाला. येत्या काळात हरभऱ्याच्या दरात काहीशी सुधारणा होण्याची शक्‍यता आहे.

नागपूरच्या कळमना बाजारात सरबती तसेच स्थानिक जातीच्या गहू वाणाची आवक होत आहे. स्थानिक गहू वाणाची आवक सरासरी ५०० तर सरबतीची आवक १००० क्‍विंटल आहे. स्थानिक गहू वाणाचे व्यवहार २३०० ते २४२२ आणि सरबती गव्हाचे व्यवहार ३१०० ते ३५०० रुपयांप्रमाणे होत आहेत. चांदूरबाजार (अमरावती) बाजार समितीत गव्हाला २२७५ ते २६०० असा दर मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Whatsapp Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?

SCROLL FOR NEXT