Wheat Harvesting : गहू मळणीसाठी एकरी ३५०० रुपयांपर्यंत दर

Wheat Production : उन्हाच्या झळा तीव्र होत असताना रब्बी हंगामातील गहू पिके काढणीला आली आहेत.
Wheat Harvesting
Wheat Harvesting Agrowon
Published on
Updated on

Pune News : उन्हाच्या झळा तीव्र होत असताना रब्बी हंगामातील गहू पिके काढणीला आली आहेत. जिल्ह्यातील अनेक भागांत सध्या गहू मळणीला वेग आला आहे. बहुतेक शेतकरी गहू मळणीसाठी हार्वेस्टरला पसंती देत आहेत. मळणीसाठी एकरी ३००० ते ३५०० रुपये दर हार्वेस्टरचालक घेत आहेत.

जिल्ह्यात सरासरीच्या ३९ हजार ८०३ हेक्टरपैकी ३६ हजार ४०० हेक्टर म्हणजेच ९१ टक्के पेरणी गव्हाची झाली आहे. यामध्ये दौंड तालुक्यात सर्वाधिक सुमारे सहा हजार ४३९ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

Wheat Harvesting
Wheat Harvesting : गहू काढणी सुरू

त्यापाठोपाठ जुन्नर, शिरूर, बारामती, इंदापूर या तालुक्यात चांगल्या पेरण्या झाल्या आहेत. तर हवेली, मुळशी, मावळ, वेल्हे, भोर, पुरंदर तालुक्यात कमी पेरण्या झाल्या आहेत. परंतु मागील महिन्यापासून उन्हाचा चटका (Summer Heat) वाढत असताना पिके काढणीच्या अवस्थेत आली आहेत.

Wheat Harvesting
Wheat Harvesting : गहू पीक काढणीच्या अवस्थेत

गेल्या १५ ते २० दिवसांपासून पंजाब, हरियाना भागातून हार्वेस्टरचालक राज्यात दाखल झाले आहेत. मोठ्या हार्वेस्टरमुळे गहू कापणी, गोळा करणी व नंतर लहान हार्वेस्टरने मळणी, असे चित्र आहे. त्यामुळे वेळ व खर्च वाचत आहे. शिवाय, पैसेही कमी लागत आहेत. एका तासात तीन ते चार एकरांतील गव्हाची मळणी व्यवस्थितपणे होत आहे.

मजुरांच्या तुलनेत हार्वेस्टर फायदेशीर

सध्या मजूर उपलब्ध होत नाहीत. त्यात मोठ्या हार्वेस्टरच्या तुलनेत अधिकचा खर्चही येत आहे. एकरी अडीच हजार ते २८०० रुपये खर्च मजुरांकडून गहू कापणी, गोळा करण्यासाठी येतो. ट्रॅक्टरचलित यंत्रणेद्वारे मळणीसाठी प्रतिक्विंटल ३०० रुपये खर्च लागत आहे. यामुळे पंजाब, हरियानातील हार्वेस्टरला गहू मळणीसाठी मागणी आहे. ही मंडळी विविध भागातील पेट्रोल पंप, ढाबे, शेतांमध्ये मुक्कामी राहत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com