Sorghum, Wheat Production : तीन जिल्ह्यांत ज्वारी, गव्हाच्या हेक्टरी उत्पादकतेत तफावत

Variation in Productivity : पीक कापणी प्रयोगानुसार छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत रब्बी ज्वारी, गव्हाच्या हेक्‍टरी उत्पादकतेत तफावत दिसते आहे.
Wheat And Jowar Crop
Wheat And Jowar CropAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : आजवर प्राप्त पीक कापणी प्रयोगानुसार छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत रब्बी ज्वारी, गव्हाच्या हेक्‍टरी उत्पादकतेत तफावत दिसते आहे. ओलीचा अभाव, पाण्याची अनुपलब्धता, हवामानाची प्रतिकूलता याला कारणीभूत असल्याचे मानले जाते आहे.

यंदाच्या रब्बी हंगामात कृषी विभागाच्या छत्रपती संभाजीनगर विभागातील तीन जिल्ह्यांत सरासरी ७ लाख ४१ हजार १८० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ८ लाख ९१ हजार ८१ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली. सरासरीच्या तुलनेत १२० टक्के क्षेत्रावर ही पेरणी झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रब्बी ज्वारीच्या सरासरी ४६ हजार ३७७ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ३९ हजार ५९ हेक्टरवर पेरणी झाली होती.

Wheat And Jowar Crop
Sorghum Crop : ज्वारी पिकाचे पुनरुज्जीवन महत्त्वाचे

पीक कापणी प्रयोगानुसार या ज्वारीची हेक्टरी उत्पादकता ९ क्विंटल ८ किलो ५४० किलोग्रॅम आली आहे. दुसरीकडे गव्हाचे सरासरी क्षेत्र ६९ हजार ४०० हेक्टर असताना प्रत्यक्षात ६८ हजार ७८५ हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली होती. प्राप्त पीक कापणी प्रयोगानुसार या गव्हाची सरासरी हेक्टरी उत्पादकता १४ क्विंटल ७५ किलो ४०० ग्रॅम आली आहे. जालना जिल्ह्यात रब्बी ज्वारीची सरासरी ८६ हजार ९३८ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १ लाख ६ हजार ६४० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती.

या ज्वारी पिकाच्या २९४ पीक कापणी प्रयोगापैकी १० पीक कापणी प्रयोगाचे अहवाल प्राप्त झाले. त्यानुसार जिल्ह्यात रब्बी ज्वारीचे सरासरी हेक्टरी उत्पादन ११.३८ किलो ७० ग्रॅम आले आहे. जालना जिल्ह्यात गव्हाच्या सरासरी ४८ हजार २०९ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ४०९१९ हेक्टरवर पेरणी झाली होती. या गहू पिकाचे जवळपास ३१२ पीक कापणी प्रयोगापैकी दोन प्रयोगाचे अहवाल प्राप्त झाले. त्यानुसार गव्हाची हेक्टरी उत्पादकता १५ क्विंटल ८५ किलो ग्रॅम आली आहे.

Wheat And Jowar Crop
Wheat Harvesting : गहू काढणी सुरू

बीड जिल्ह्यात रब्बी ज्वारीचे सरासरी क्षेत्र १ लाख ६८ हजार ८२२ हेक्टर असताना प्रत्यक्षात १ लाख ९३ हजार १२७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. प्राप्त पीक कापणी प्रयोगानुसार जिरायती रब्बी ज्वारी पिकाची हेक्टरी उत्पादकता ११ क्विंटल ९१ किलो ४६ ग्रॅम तर बागायत रब्बी ज्वारी पिकांची उत्पादकता हेक्‍टरी १६ क्विंटल ६४ किलो १६ ग्रॅम आली आहे.

जिल्ह्यात गव्हाची सरासरी क्षेत्र ३९ हजार ५०६ हेक्‍टर असताना प्रत्यक्षात ३५ हजार ४९५ हेक्‍टरवर पेरणी झाली होती. पेरणी झालेल्या गव्हाच्या पीक कापणी प्रयोगानुसार गव्हाची उत्पादकता हेक्‍टरी २० क्विंटल २५ किलो ९२ ग्रॅम येत असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

तीन जिल्ह्यांची उत्पादकता स्थिती

छत्रपती संभाजीनगर

पीक : ज्वारी

उत्पादकता : ९ क्विंटल ८ किलो ५४० किलोग्रॅम

पीक : गहू

उत्पादकता : १४ क्विंटल ७५ किलो ४०० ग्रॅम

जालना

पीक : ज्वारी

उत्पादकता : ११.३८ किलो ७० ग्रॅम आले

पीक : गहू

उत्पादकता ; १५ क्विंटल ८५ किलो ग्रॅम आली

बीड

पीक : ज्वारी

उत्पादकता : ११ क्विंटल ९१ किलो ४६ ग्रॅम

पीक : गहू

उत्पादकता : २० क्विंटल २५ किलो ९२ ग्राम

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com