Sugar Production Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Production : देशात यंदा ३१३ लाख टन साखर तयार होण्याची शक्यता

Sugar Season : गेल्या वर्षी ३२८ लाख टन साखर (इथेनॉलकडे वळवल्यानंतर) तयार झाली होती.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : यंदा देशात ३१३ लाख टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज ‘इस्मा’ने व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी ३२८ लाख टन साखर (इथेनॉलकडे वळवल्यानंतर) तयार झाली होती. यंदा केंद्राने इथेनॉलकडे साखर वळवण्यास बंदी आणल्यानंतर याचा सकारात्मक परिणाम साखरेचे प्रत्यक्षात उत्पादन वाढण्यावर होणार आहे.

उपग्रह प्रतिमांच्या आधारे ‘इस्मा’चा हा दुसरा अंदाज जाहीर करण्यात आला. यासाठी सध्याची सुरू असलेली तोडणी, सध्याचे वातावरण, साखर उतारा याबाबतची चाचणीही करण्यात आली. तसेच देशभरातील कारखान्यांशी संपर्क साधून सध्याच्या हंगामाविषयी चर्चा करण्यात आली.

या सर्वांची माहिती घेऊन साखर उत्पादनाचा अंदाज जाहीर करण्यात आला. साखर उत्पादनामध्ये उत्तर प्रदेश ११९ लाख टन साखर उत्पादन (इथेनॉलकडे वळवण्यापूर्वी) घेऊन आघाडीवर राहील त्या खालोखाल ९९ लाख टन साखर महाराष्ट्रात तयार होईल, असे असोसिएशनने म्हटले आहे.

गेल्या वर्षी ३६६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. इथेनॉलकडे ३८ लाख टन साखर वळवण्यात आली होती. त्यानंतर साखरेचे निववळ उत्पादन ३२८ लाख टन झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेचे उत्पादन कमी असले तरी इथेनॉलकडे वळवण्याचे साखरेचे प्रमाणही कमी आहे. यंदा फक्त १७ लाख टन साखर इथेनॉलकडे वळवण्यात येईल. उर्वरित साखर ही बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असेल.

यंदाचा ओपनिंग स्टॉक (ऑक्टोबर २०२३) ५६ लाख टनांचा होता. यंदाचे उत्पादन व विक्री याचा अभ्यास केल्यास ३० सप्टेंबर २४ अखेर देशात ८४ लाख टनांचा साठा शिल्लक राहील, अशी शक्यता आहे. हा साठा पुढील तीन महिन्यांसाठी वापरता येऊ शकतो. पुरेसा साठा उपलब्ध होण्याची शक्यता असल्याने केंद्राने आणखी साखर इथेनॉलला वापरण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

जानेवारीअखेर १८७ लाख टन उत्पादन

३१ जानेवारीअखेर देशात १८७ लाख टन साखर तयार झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १८२ लाख टन साखर तयार झाली होती. यंदा ५२० साखर कारखाने सुरू आहेत, गेल्या वर्षी याच कालावधीत ५१७ कारखाने सुरू होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT