Jowar Crop Protection: रब्बी हंगामात लवकर लागवड केलेले ज्वारी पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. या पिकावर खोडमाशी, खोड पोखरणारी अळी, मिजमाशी अशा अनेक महत्त्वाच्या किडींचा प्रादुर्भाव आढळत असतो. परंतु या वर्षी पिकाच्या सुरुवातीच्या टप्प्यापासूनच मावा या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सर्वात महत्त्वाची व आनंदाची बाब म्हणजे या किडींवर उपजीविका करणाऱ्या मित्रकिटकांची उपस्थितीही शेतात दिसत आहे. या लेखामध्ये या किडीबाबत आणि तिच्यावर उपजीविका करणाऱ्या मित्रकीटकांची ओळख छायाचित्रांच्या माध्यमातून करून घेऊ..मावाशास्त्रीय नाव : रोपालोसिफम मॅडिस (Rhopalosiphum maidis)यजमान पिके : ज्वारी, मका, बाजरी, राळा इ. पिके.Jowar Farming: सोलापूर जिल्ह्यात ज्वारीची फक्त ४४ टक्केच पेरणी.किडीची ओळखपिल्लावस्थाही अवस्था चार टप्प्यातून पूर्ण होते.पहिल्या अवस्थेत पिल्ले अंडाकृती, फिकट हिरव्या रंगाची आणि वरच्या बाजूस थोडी फुगलेली दिसतात. डोके, पाय आणि अँटेना हे शरीराच्या तुलनेत किंचित गडद रंगाचे असतात. पोटाच्या मागील बाजूस दोन छोट्या नळीसारख्या रचना (कॉर्निकल्स) दिसतात..दुसऱ्या अवस्थेतील पिल्ले आकाराने थोडी मोठी, फिकट हिरवी आणि तुलनेने कमी हालचाल करणारी असतात.तिसऱ्या अवस्थेत पिल्लांचे शरीर लांबट होऊ लागते, रंग किंचित गडद होतो आणि कॉर्निकल्स अधिक स्पष्ट दिसतात. चौथ्या अवस्थेत पिल्ले गडद हिरव्या रंगाची, आकाराने मोठी आणि काळ्या रंगाचे ठळक कॉर्निकल्स असलेली दिसतात. पिल्लावस्थेतील किडीची लांबी सुमारे ०.७२ मि.मी. आणि रुंदी ०.३० मि.मी. असते. तापमानानुसार किडीचा रंग बदलतो. उष्णतेत रंग पिवळसर तर थंडीत गडद हिरवा दिसतो..प्रौढ किडीचे वर्णनप्रौढ किडीचे दोन प्रकार आढळतात. १) पंखरहित आणि २) पंखधारी. प्रौढाची लांबी सुमारे १.८३ मि.मी., तर रुंदी ०.७८ मि.मी. असते.पंखरहित प्रौढ : शरीर मऊ, अंडाकृती आणि फिकट निळसर-हिरव्या रंगाचे असते. अँटेना, पाय आणि कॉर्निकल्स काळ्या रंगाचे दिसतात. पोट थोडे फुगलेले आणि चमकदार दिसते.पंखधारी प्रौढ : शरीराचा रंग काळसर आणि पंख पारदर्शक असतात. हे प्रौढ आकाराने थोडे लहान असतात. पोटाचा रंग फिकट ते गडद हिरवा दिसतो आणि पोटाच्या मागील बाजूस दोन ठळक काळ्या रंगाचे कॉर्निकल्स असतात..Rabi Jowar Pest : रब्बी ज्वारीवर ‘लष्करी’, तर हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव.जीवनक्रममादी अंडी न घालता थेट पिल्लांना जन्म देते. ती नराशिवाय प्रजनन करते. प्रत्येक मादी साधारणतः ३५ ते ४० पिल्लांना जन्म देते. पिल्लावस्था साधारण ७ ते ८ दिवसांची, तर प्रौढ अवस्था १० ते १२ दिवसांची असते. एका पिढीचा संपूर्ण जीवनचक्र साधारणतः दोन आठवड्यांत पूर्ण होतो. (प्रयोगांमध्ये तापमानानुसार जीवनचक्राचा कालावधी बदललेला आढळतो.).नुकसानीचे स्वरूपकिडीची पिल्ले आणि प्रौढ मध्य पानांच्या घडीत (पोंग्यात), खोडावर व फुलोऱ्यावर समूहाने राहून रस शोषतात. परिणामी पाने पिवळी पडतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास पानांच्या कडा तपकिरी व कोरड्या होतात. पिकाची वाढ मंदावते. ही कीड आपल्या विष्ठेद्वारे मधासारखा चिकट द्रव सोडते. त्यावर काळी बुरशी वाढून पाने काळी दिसू लागतात. त्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते. ही कीड Maize Dwarf Mosaic Virus या विषाणूजन्य रोगाच्या प्रसारासाठी वाहक म्हणूनही काम करते. पिकाच्या फुगवटा अवस्थेत (Boot stage) या किडीचा प्रादुर्भाव सर्वाधिक आढळतो..किडीचे व्यवस्थापनपर्यायी यजमान असलेल्या तणांचा नायनाट करावा.नत्रयुक्त खतांचा संतुलित वापर करावा.पेरणीपूर्वी शेतात आधीच्या हंगामात किडीचे यजमान पीक निवडले गेलेले नसल्याची खात्री करावी.ढालकिडे, क्रायसोपा, सिरफिड माशी आदी मित्रकिटकांचे संवर्धन करावे..रासायनिक नियंत्रणाविषयीकेंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणीकरण समितीच्या नोंदीनुसार, या किडीस कोणत्याही रासायनिक कीटकनाशकाची शिफारस नाही. त्यामुळे प्रादुर्भाव जास्त आढळल्यास अॅग्रेस्को शिफारशीच्या आधारे, तसेच मित्रकीडांची संख्या लक्षात घेऊन संबंधित तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच फवारणीचे नियोजन करावे. या किडीच्या नियंत्रणामध्ये मित्रकीटकांची महत्त्वाची भूमिका असल्याने, त्यांना हानी पोहोचवणाऱ्या कीटकनाशकांचा वापर टाळावा.रवींद्र पालकर ८८८८४०६५२२ (पीएच. डी. स्कॉलर, कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.