Sugar Production : यंदा साखरेचे उत्पादन घटणार की वाढणार? शुगर असोसिएशने वर्तवला अंदाज

Sugar Association Predicts : देशात चालू गळीत हंगामात ३१६ लाख टन साखरचे उत्पादन तर महाराष्ट्रात ९६ लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे.
Sugar Production
Sugar Productionagrowon
Published on
Updated on

All India Sugar Trade Association : मागच्या वर्षीच्या तुलनेत देशभरात यंदा साखरेचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा ४ टक्क्यांनी उत्पादन कमी होणार असल्याचा असा पहिला अंदाज ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनने (ऐस्टा) दर्शविला आहे. देशात चालू गळीत हंगामात ३१६ लाख टन साखरचे उत्पादन तर महाराष्ट्रात ९६ लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. राज्यातील गळीत हंगाम मार्चअखेरपर्यंत चालेल शुगर असोसिएशनकडून सांगण्यात आले.

मागच्या वर्षी देशभरात ३२९ लाख टन साखरचे उत्पादन झाले होते. अल निनोच्या स्थितीमुळे देशातील २५ राज्यात कमी पावसाची प्रतिकूल स्थिती आहे. यामुळे उसाचे पीक घेणाऱ्या राज्यात यंदा साखरचे उत्पादन कमी होण्याची शक्यता साखर कारखान्यांच्या संघटनांनी तसेच सरकारनेही वर्तविली आहे.

तसेच ऐस्टाच्या अहवालातही गतवर्षीपेक्षा ४ टक्के कमी उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यात इथेनॉलकडे वळविल्या जाणाऱ्या सुमारे २० लाख टन साखरचा समावेश करण्यात आला नाही. चालू हंगामाच्या सुरुवातीला देशात ५७ लाख टन साखर शिल्लक होती. ती आणि ३१६ लाख टन अशी ३७३ लाख टन साखर हंगामाअखेर उपलब्ध होणार आहे. देशाची गरज २९० लाख टन साखरची आहे. त्यामुळे हंगामाअखेर ८२ लाख टन साखर शिल्लक राहणार आहे.

महाराष्ट्रात जादा उत्पादन शक्य

ऐस्टाकडून मिळालेल्या माहितीनुसार मागच्या वर्षीच्या हंगामात महाराष्ट्राच १०७ लाख टन साखरचे उत्पादन झाले होते. यंदा आतापर्यंत ९६ लाख टनांवर आहे दरम्यान हंगाम संपण्यापूर्वी हे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. ऊसतोड मजुरांची संख्या कमी असल्याने गाळप हंगाम मार्चअखेरपर्यंत चालणार आहे.

Sugar Production
Sugar Production : तर साखर कारखानदारीसह शेतकरी अडचणीत येईल, हसन मुश्रीफांची केंद्रावर नाराजी

उत्तर प्रदेशात सर्वाधिक

चालू हंगामात उत्तर प्रदेशात ११७ लाख टन साखरचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. गतवर्षीपेक्षा ते १० लाख ७० हजार टनांनी कमी असले तरी हे राज्य देशात साखर उत्पादनांत प्रथम क्रमांकावर राहणार आहे. महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटक ४७ लाख टन साखर उत्पादन करून तिसच्या क्रमांकावर आहे.

यावेळी ऐस्टाचे अध्यक्ष प्रफुल्ल विठलानी म्हणाले की, हंगामाच्या सुरूवातीला १५ ते २० टक्के उत्पादनात घट होण्याची शक्यता वाटत होती. त्यामुळे चालू हंगामात झालेले साखर उत्पादन, शेतात उभ्या असलेल्या उसाचे क्षेत्र याचा आढावा घेऊन जानेवारी महिन्यात ऐस्टा आपला साखर उत्पादनाचा पहिला अंदाज वर्तविते, या अंदाजात तीन टक्के कमी जास्त असा फरक पडू शकतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com