Betel Leaf  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Betel Leaf Market : खाऊच्या पानांचे दर टिकून; ग्राहकांना दिलासा

Betel Leaf Price : सध्या पानांचा प्रती तीन हजार पानांना ३०० ते ९०० रुपये असा दर मिळत आहे. सद्यःस्थितीला पानांचे दर टिकून आहेत.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : सांगली जिल्ह्यातील पान मळ्यांचा हंगाम आटोपला असून मळ्यांची उतरण सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पानांची आवक मंदावली आहे. यंदाच्या हंगामात पानांच्या दरात चढ-उतार झाल्याने पान उत्पादकांना काही अंशी आर्थिक फटका बसला आहे. सध्या पानांचा प्रती तीन हजार पानांना ३०० ते ९०० रुपये असा दर मिळत आहे. सद्यःस्थितीला पानांचे दर टिकून आहेत.

मार्गशीर्ष पूजेसाठी राज्यातील विविध पानांच्या बाजारपेठात खाऊच्या पानांची मागणी वाढली होती. त्यामुळे पानांचे दर टिकून होते. जिल्ह्यातील मिरज, पूर्व भागातील यंदाचा पान विक्रीचा हंगाम आटोपला आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत पानमळ्यांना विश्रांतीचा काळ आहे. पान उत्पादक शेतकरी पानमळ्यांची उतरण करण्याचे नियोजन करू लागला आहे. तीन महिन्यांनंतर नव्या पानांचा हंगाम सुरू होईल.

एप्रिल महिन्यापासून पानांचा हंगाम सुरू झाला. परंतु जून महिन्यापासून ऑक्टोबरअखेर पाऊस पडला. परिणामी पानमळे अतिपावसाने धोक्यात आले होते. त्यातूनही शेतकऱ्यांनी पानमळे साधले. परंतु अति पावसामुळे पानांचे उत्पादन वीस टक्के घटले. दसरा, दिवाळीदरम्यान पानांच्या बाजारपेठेत पानांची आवक कमी होती. त्यामुळे दरात वाढ झाली होती. त्यानंतर पुन्हा पानांच्या दरात घसरण झाली.

मार्गशीर्ष महिन्यात पूजेसाठी पाने लागतात. या दरम्यान, पुन्हा पानांच्या दरात वाढ झाली होती. गेली महिनाभर पानांचे दर टिकून होते. मार्गशीर्ष महिना संपला आहे. त्यामुळे पानांची मागणी कमी झाली आहे. परिणामी पुन्हा पानांच्या दरात (प्रति ३ हजार पाने)१०० ते २०० रुपयांनी दर कमी झाले आहे.

यंदाच्या हंगामात तीन ते चार वेळा पानांच्या दरात वाढ झाली. त्यामुळे या दरम्यान, पान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. परंतु उत्पादन घटल्याने अगोदरच पान उत्पादक शेतकरी धास्तावला होता. त्यातच सातत्याने पानांच्या दरात चढ-उतार होत असल्याने पान उत्पादक शेतकऱ्यांना काही अंशी आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे आर्थिक ताळमेळ घालण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली असल्याचे चित्र आहे.

पानांची आवक सुरू

जिल्ह्यातील पानांचा हंगाम संपल्याने चेन्नइतील विजयवाडा, चिन्नूर, कुण्णूर या भागांतील पानांची आवक राज्यातील पानांच्या पेठात होऊ लागली आहे. त्यामुळे त्याचा परिमाण स्थानिक पानांच्या दरावर झाला असल्याचे पान उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले आहे. चेन्नइतील विजयवाडा, चिन्नूर, कुण्णूर या भागांतील पानांची आवक मे अखेर सुरू राहण्याचा अंदाज पान उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

यंदा पावसामुळे पानांचे उत्पादन घटले. सण, उत्सवाच्या काळात चांगले दर मिळाले. परंतु एकंदर पानांचा हंगाम दरामुळे फारसा समाधानकारक राहिला नाही. पानमळ्यांच्या उतरणीचे कामाचे नियोजन सुरू केले आहे.
भाऊसो नागरगोजे, पान उत्पादक शेतकरी, नरवाड, जि. सांगली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT