चंद्रकांत जाधवAgriculture Success Story : जळगाव जिल्ह्यात कुऱ्हे पानाचे (ता. भुसावळ) हे प्रसिद्ध गाव आहे. त्याच्या नावावरूनच येथील शेतकऱ्यांनी पानवेली (खाऊचे पान) शेतीची परंपरा जपल्याची प्रचिती येते. गावातील सुरेश बोबडे या शेतकऱ्यांपैकी एक. आजोबा- पणजोबांच्या काळापासून त्यांच्या घरी पानवेलीची शेती जोपासण्यात आली आहे. .बोबडे अल्पभूधारक आहेत. हा पट्टा दुष्काळाचा आणि त्यात शेती दोनच एकर. अशा प्रतिकूलतेत शेतीचे अर्थकारण मजबूत करण्याचे आव्हान होते. त्यासाठी सुरेश तज्ज्ञ, प्रयोगशील शेतकरी यांच्या संपर्कात राहिले. ज्ञानासोबत सकारात्मक ऊर्जाही मिळत गेली. आज २० गुंठ्यांत पानवेलीचा मळा आहे..वाणात केला बदलपूर्वी घेत असलेल्या पानवेलीच्या कपुरी या पारंपरिक वाणाच्या पानांचा आकार लहान होता. हिवाळा व उन्हाळ्यात तसेच कमी पाण्यात वाण तग धरत नव्हते. रोगराईस बळी पडायचे. उत्पादन कमी मिळायचे..Betel Leaf Farm : अतिपावसामुळे ३० टक्के पानमळे धोक्यात.दरम्यान कृषी विभाग- आत्मा यांच्या माध्यमातून बंगळूर येथील पानवेल संशोधन केंद्रात अभ्यास दौरा करण्याची संधी सुरेश यांना मिळाली. तेथे विकसित केलेले पानवेल वाण प्रत्यक्ष पाहण्याबरोबर सविस्तर माहितीही मिळाली. त्यानंतर बंगळूरहून हे वाण आणून २०१८ मध्ये दोन गुंठ्यांत लागवड केली..वाण केला यशस्वीअनेक वर्षांचा पीक व्यवस्थापन अनुभव आणि अभ्यासातून हे वाण सुरेश यांनी यशस्वी केले. आजमितीला त्याची २० गुंठ्यांत लागवड होते. सुमारे सहा वर्षांचा त्यातील अनुभव तयार झाला आहे. पानांचा आकार मोठा आहे. तिन्ही ऋतूंमध्ये त्याचे उत्पादन चांगले येते. कमी पाण्यात ते तगते. जळगाव भागात उन्हाळ्यात ४५ अंश किंवा तापमानाचा पारा त्याहून वर जातो..अशावेळीही पानांचा दर्जा चांगला असतो. सुरेश यांनी हलक्या, मध्यम जमिनीत हा वाण चांगला फुलविला आहे. चार बाय अडीच फूट या अंतरात पट्टा पद्धतीची लागवड आहे. सिंचनासाठी ठिबक असून सरींमध्ये आर्द्रता टिकविण्यासाठी ‘रेन पाइप’ आहे. पानवेलीला आधारासाठी शेवग्याची लागवड केली आहे..पानमळ्याचे उष्ण व थंड वाऱ्यांपासून संरक्षण होण्यासाठी दक्षिण व पश्चिमेला हिरवी नेट लावली आहे. व्यवस्थापन पूर्णपणे सेंद्रिय करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रयोगाची पाहणी बंगळूर येथील पानवेल संशोधन केंद्रातील तसेच जळगाव व पाल येथील कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी करून प्रसंशा केली आहे..Agriculture Success Story : शेतीसारखे समाधान कुठेच अनुभवले नाही....बांधावर तयार केले मार्केटप्रति १० गुंठ्यांत दररोज १० हजार ते १५ हजारांपर्यंत पानांचे उत्पादन मिळते. कुऱ्हे भागातील खाऊच्या पानांना भुसावळ, जळगाव, बुलडाणा, नांदुरा, मलकापूर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणी मार्केट आहे. सुरेश यांच्याकडील वाण वेगळे असल्याने त्यांना त्यासाठी वेगळे मार्केट तयार करावे लागले..जाफराबाद, चिखली व महोरा भागांत ते तयार केले देखील. आता अहमदाबाद येथील व्यापारी जागेवर येऊन खरेदी करतात. पावसाळ्याच्या काळात पानांची आवक अधिक असते. त्या वेळी प्रति पेटाऱ्यास (प्रति पेटारा २५०० पाने) एक हजार रुपये, तर उन्हाळ्यात १२०० रुपयांपर्यंत दर मिळतो. क्वचित व थोड्या काळासाठी १८०० रुपये असाही दर एकदा मिळाल्याचे सुरेश यांनी सांगितले..अर्थकारणप्रति १० गुंठ्यांना वर्षभरात सुमारे ८० ते ९० हजार रुपये खर्च येतो. ४० ते ५० टक्क्यांपर्यंत नफा मिळतो. पाऊसमान चांगले राहिल्यास पुढे पाण्याची समस्या कमी राहून उत्पादन चांगले येते. दर्जेदार रोपांची निर्मिती करून माफक दरात विक्री केली जाते. गुणात्मकतेमुळे शेतकऱ्यांकडून त्यास मागणी आहे. क्षेत्र कमी असले तरी अन्य क्षेत्रात गहू, हरभरा, मिरची, झेंडू, फुलपिके अशी बारमाही पद्धत वापरून सुरेश शेतीतील नफा वाढवतात. काही शेती भाडेतत्वावर कसतात..कुटुंबाचे कष्टरमेश यांच्यासह वडील सुरेश व बंधू राहुल देखील शेतीत राबतात. मजुरांवर एक रुपयाही खर्च केला जात नाही. सुरेश सांगतात, की पानवेलीची शेती अत्यंत कष्टाची आहे. छाटणी, दर सहा महिन्याला माती व शेणखताची भर घालणे अशी कामे असतात..काढणी दररोज असते. मात्र कुटुंबाचा सर्व कामांमध्ये हातखंडा तयार झाला आहे. शेती डोंगराळ भागानजीक असून वन्यप्राणी आहेत. त्यामुळे रात्रंदिवस राखणदारी करावी लागते. त्यासाठी कुटुंबातील एक सदस्य बारमाही रात्रीच्या वेळेस शेतात असतो.रमेश बोबडे ८००७४०७८८१.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.