soybean rate  agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate : सोयाबीनच्या भावात काही अंशी सुधारणा

यापुढे खरीप पिकाच्या आवकेला वेग मिळेल. मुगाचा मुख्य हंगाम संपलेला दिसतोय; आवक आता साप्ताहिक ३० हजार टनांवरून १५ हजार टनांवर आली आहे.

अरूण कुलकर्णी

यापुढे खरीप पिकाच्या आवकेला (Kharif Crop Arrival) वेग मिळेल. मुगाचा मुख्य हंगाम संपलेला दिसतोय; आवक आता साप्ताहिक ३० हजार टनांवरून १५ हजार टनांवर आली आहे. सोयाबीनची आवक, (Soybean Arrival) विशेषतः राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा व महाराष्ट्रामधून वाढलेली आहे; ती आता जोर धरेल. कांद्याची आवक (Onion Arriva) मात्र कमी झाली आहे.

नवीन आवक यावयास वेळ आहे. तोपर्यंत किमती वाढण्याचा संभव आहे. हरभरा, तूर व टोमॅटो यांची आवक आता अपेक्षेप्रमाणे कमी होत आहे. ऑक्टोबरमध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे किती नुकसान झाले आहे त्याचा अंदाज अजून हाती आला नाही; त्यामुळे त्याचा उत्पादनावर किती परिणाम होईल ते सांगता येत नाही.

या सप्ताहात कापूस व मका यांचे भाव घसरले. सोयाबीनचे भाव पुन्हा २.२ टक्क्यांनी वाढले. कांद्याच्या किमती आता वाढून र. २,००० च्या वर गेल्या आहेत. ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात कांद्याच्या किमती साधारणतः दर वर्षी उच्चांकी असतात. डिसेंबरपासून त्या उतरू लागतात.

या सप्ताहातील किमतीतील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे (Cotton Rate) व कपाशीचे राजकोट मधील स्पॉट भाव (रु. प्रति १७० किलोची गाठी) सप्टेंबर महिन्यात घसरत होते. गेल्या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव (Cotton Spot Rate) १.७ टक्क्याने घसरून ३३,२८० वर आले होते; या सप्ताहात ते पुन्हा ०.९ टक्क्याने घसरून ३२,९८० वर आले आहेत. नोव्हेंबर डिलिव्हरी भाव रु. २९,९२० वर आले आहेत. कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) १.२ टक्क्यांनी वाढून रु १,७५३ वर आले आहेत. कपाशीचे हमीभाव लांब धाग्यासाठी (प्रति क्विंटल) रु. ६,३८० व मध्यम धाग्यासाठी रु. ६,०८० जाहीर झाले आहेत. सध्याच्या किमती हमीभावापेक्षा अधिक आहेत. हेजिंगसाठी अजूनही अनुकूल वेळ आहे.

मका

मक्याच्या स्पॉट (छिंदवाडा) किमती सप्टेंबर महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहात स्पॉट किमती २.४ टक्क्यांनी घसरून रु. २,२५० वर आल्या आहेत. फ्यूचर्स (नोव्हेंबर डिलिव्हरी) किमती २.५ टक्क्यांनी घसरून रु. २,२६१ वर आल्या आहेत. जानेवारी फ्यूचर्स किमती रु. २,२८६ वर आल्या आहेत. मक्याचा हमीभाव रु. १,९६२ जाहीर झाला आहे. सध्याच्या किमती हमीभावापेक्षा अधिक आहेत. मात्र या वर्षी खरीप मक्याचे देशातील उत्पादन उच्चांकी (२३.१ दशलक्ष टन) राहील असा शासनाचा अंदाज आहे. (गेल्या वर्षी ते २२.६३ दशलक्ष टन होते)

हळद

हळदीच्या स्पॉट (निजामाबाद) किमती सप्टेंबर महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहात त्या ०.७ टक्क्याने वाढून रु. ७,२७१ वर आल्या आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स किमती २.७ टक्क्यांनी वाढून रु. ७,६३८ वर आल्या आहेत. डिसेंबर फ्यूचर्स किमती रु. ७,७०६ वर आल्या आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (बिकानेर) किमती सप्टेंबर महिन्यात रु. ४,५६० ते रु. ४,७०० दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या ०.३ टक्क्याने घसरून रु. ४,६६६ वर आल्या आहेत.

मूग

मुगाच्या किमती सप्टेंबर महिन्यात वाढत होत्या. मुगाची स्पॉट किमत (मेरटा) या सप्ताहात १.४ टक्क्याने वाढून रु. ७,१०० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ७,७५५ जाहीर झाला आहे. सध्या किमती हमीभावापेक्षा कमी आहेत.

सोयाबीन

सोयाबीनची स्पॉट किमत (इंदूर) सप्टेंबर महिन्यात उतरत होती. गेल्या सप्ताहात ती ३.२ टक्क्यांनी वाढून रु. ५,१८७ वर आली होती; या सप्ताहात सुद्धा ती २.२ टक्क्यांनी वाढून रु. ५,३०३ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,३०० जाहीर झाला आहे.

तूर

तुरीची स्पॉट किमत (अकोला) या सप्ताहात रु. ७,३३२ वर स्थिर आहे. तुरीचा हमीभाव रु. ६,६०० आहे.

कांदा

कांद्याच्या किमती सप्टेंबर महिन्यात वाढत होत्या. कांद्याची स्पॉट किमत (पिंपळगाव) गेल्या सप्ताहात रु. २,१५८ होती; या सप्ताहात ती रु. २,१५० वर आली आहे.

टोमॅटो

टोमॅटोच्या किमती सप्टेंबर महिन्यात वाढत होत्या. गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किमत (जुन्नर, नारायणगाव) रु. २,००० होती.

या सप्ताहात ती वाढून रु. २,५०० पर्यंत आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठी;

कपाशीची किंमत प्रति २० किलो).

: arun.cqr@gmail.com

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fruit Crop Insurance: हवामानाधारित फळपीक विमा योजनेत परभणीतील १ हजार २१५ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

Solar Fencing Subsidy: सोलर फेन्सिंग अनुदानाचे आठ प्रस्ताव रखडले

Rural Economy: 'ग्रामीण अर्थव्यवस्थेत विविध कार्यकारी सोसायट्यांची भूमिका महत्त्वाची'

Krishi Mahotsav: तुळजापूरमध्ये तुळजाभवानी जिल्हा कृषी महोत्सव

Agrowon Podcast: आल्याचा बाजारभाव स्थिर; सोयाबीनमध्ये नरमाई, कापसावरील दबाव कायम, काकडीला उठाव तर मका दबावाताच

SCROLL FOR NEXT