Soybean Rate
Soybean RateAgrowon

Soybean Rate : ओलाव्यामुळे सोयाबीनला कमी दर

मागील दोन आठवड्यांपासून सोयाबीनची आवक सुरु झाली. शेतकरी सोयाबीन काढणी केल्यानंतर लगेच बाजारात नेत आहेत. त्यामुळं ओलावा अधिक असलेल्या सोयाबीनची आवक जास्त होत आहे.
Published on

पुणेः देशातील सोयाबीनचा नवा हंगाम (Soybean Season) सुरु झाला. मात्र पावसामुळे सोयाबीन काढणीच्या (Soybean Harvesting) कामात व्यत्यय निर्माण होत आहे. तर सध्या सोयाबीनमध्ये ओलावाही (Soybean Harvesting) अधिक आहे. मात्र दिवाळी आणि रब्बी पेरणीच्या (Rabi Sowing) कामासाठी पैशांची गरज असल्याने शेतकरी सोयाबीन विक्री करत आहेत. सध्या नव्या सोयाबीनला ४ हजार ते ४ हजार ७०० रुपये दर (Soybean Rate) मिळतो आहे. मात्र ओलावा कमी झाल्यानंतर सोयाबीनला जास्त दर मिळू शकतो, असे जाणकारांनी सांगितले.

 Soybean Rate
Soybean Products : सोयाबीनपासून पौष्टिक पदार्थ कसे बनवाल ?

मागील दोन आठवड्यांपासून सोयाबीनची आवक सुरु झाली. शेतकरी सोयाबीन काढणी केल्यानंतर लगेच बाजारात नेत आहेत. त्यामुळं ओलावा अधिक असलेल्या सोयाबीनची आवक जास्त होत आहे. तर एफएक्यू म्हणजेच १० टक्के ओलावा, २ टक्के काडी-कचरा, आणि २ टक्के तुटफूट या दर्जाच्या सोयाबीनचं प्रमाण कमी असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. सोयाबीनला दरही दर्जानुसार मिळत आहे.

 Soybean Rate
Soybean Rate : सोयाबीनचे दर सुधारतील का ?

सध्या आंतरराष्ट्रीय बाजरात पामतेलाचे दर वाढल्याने सोयाबीन तेलाच्या दरालाही आधार मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तसचं देशातील बाजारातही सोयाबीन तेल आणि सोयाीबन दराला काहीसा आधार मिळाला. मात्र एफएक्यू दर्जाच्याच सोयाबीन दरात सुधारणा पाहायला मिळाली. ओलावा अधिक असलेलं सोयाबीन अद्यापही दबावात दिसत आहे.

मात्र पुढील काळात आंतराष्ट्रीय बाजारात पामतेलाची टंचाई भासून दर वाढण्याचा अंदाज आहे. त्यासोबतच सोयाबीन तेल आणि सूर्यफुल तेलाच्या दरातही सुधारणा होण्याची शक्यता आहे. तसचं देशात सोयाबीनचं मागील १५ दिवसांमध्ये पावसाने मोठं नुकसान केलं. मात्र नेमकं किती नुकसान झालं याची माहिती अद्याप उपलब्ध नाही. नक्की किती नुकसान झालं याचा आकडा पुढे आल्यानंतर त्याचा परिणाम बाजारावर होऊन शकतो.

देशातील सोयाबन नुकसानीचा आकडा जास्त असल्यास सोयाबीन दरही सुधारु शकतात. राज्यात सध्या दिवाळी आणि रब्बीच्या पेरणीमुळं शेतकरी काढणी केल्याबरोबर सोयाीबनची विक्री करताना दिसत आहेत. सध्या नव्या सोयाबीनला ४ हजार ते ४ हजार ७०० रुपये दर मिळतोय. तर जूनं सोयाबीन ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयानं विकलं जातंय. सोयाबीनमधील ओलावा कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांना किमान सरासरी ५ हजार ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळू शकतात. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्यानं सोयाबीन विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com