Export Non Basmati Rice agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Rice Export : तांदूळ निर्यातीवरील निर्बंध कायम राहण्याची शक्यता

Rice Market : केंद्र सरकारच्या धोरणातील अनिश्चितता आणि उच्च स्थानिक दरामुळे २०२४ हे वर्ष आव्हानात्मक असेल असा अंदाज भारतीय तांदूळ निर्यातदारांनी व्यक्त केला.

Team Agrowon

Rice Market Update : केंद्र सरकारच्या धोरणातील अनिश्चितता आणि उच्च स्थानिक दरामुळे २०२४ हे वर्ष आव्हानात्मक असेल असा अंदाज भारतीय तांदूळ निर्यातदारांनी व्यक्त केला. एकंदरीत यामुळे देशातून तांदूळ निर्यात सामान्य होण्यात अडथळा येत असल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे.

S&P ग्लोबल कमोडिटी इनसाइट्सने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे, की २०२३ मध्ये भारत सरकारकडून धोरणात्मक हस्तक्षेप करत बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालणे, तांदळाच्या निर्यातीवर २० टक्के शुल्क लागू करणे आणि ९५० दशलक्ष टन किमान निर्यात मूल्य निश्‍चित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. यामुळे बासमतीच्या बाजारपेठेवर परिणाम होत आहे.

जागतिक परिणाम आणि अनेक वर्षांपासून दर उच्च असूनही किमान २०२४ च्या पहिल्या सहामाहीपर्यंत बिगर बासमती पांढऱ्या तांदळावर असलेले निर्बंध कायम राहण्याची शक्यता असल्याचे संकेत आहेत.

तांदूळ निर्यात रोखण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामागे देशांतर्गत दर वाढवण्याचा आणि देशासाठी पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्याची इच्छा असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे. एप्रिल-मे २०२४ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी सरकार निर्बंध कमी करणार नाही, असा अंदाज बहुतेक उद्योग तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

२०२३-२४ च्या खरीप हंगामात ‘एल-निनो’मुळे कोरड्या हवामानामुळे तांदूळ उत्पादनात घट झाल्याने पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाने ऑक्टोबर-सप्टेंबर या कालावधीसाठी भारतातील एकूण तांदूळ उत्पादन १२८ दशलक्ष टन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे, जो गेल्या वर्षीच्या १३५.५ दशलक्ष टनांपेक्षा कमी आहे.

व्यापार प्रतिबंध असूनही, स्थानिक तांदळाचे दर मजबूत राहिले आहेत, ज्यामुळे सरकार किरकोळ विक्रेत्यांना इशारे देत आहे. तथापि, काही राज्य सरकारांनी देऊ केलेल्या उच्च खरेदी दर आणि दक्षिण भारतीय राज्यांकडून असलेली मोठी मागणी यामुळे मिलर्स आणि निर्यातदारांना पुढील खरीप हंगामापर्यंत उच्च दराची स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे.

बासमतीला कमी मागणी

भारतीय तांदळाचा महत्त्वाचा ग्राहक असलेल्या पश्चिम आफ्रिकेतील मागणीही दराच्या संवेदनशीलतेमुळे कमी होण्याची शक्यता आहे. २०२३ मध्ये, पश्चिम आफ्रिकेतील अनेक खरेदीदारांनी निर्यात रोखण्याच्या भीतीने मोठ्या प्रमाणात तांदूळ आयात केला.

तथापि, निर्बंधांमुळे आता खरेदी मंदावली आहे आणि उच्च दरामुळे या प्रदेशात भारताच्या बिगर बासमती तांदळाची निर्यात आणखी कमी होऊ शकते.

आग्नेय आशियासह इतर काही आखाती देशांकडून मागणी स्थिर राहण्याची अपेक्षा असताना, निर्यातदारांना पश्चिम आफ्रिकेतील आव्हानांचा अंदाज आहे. जास्त रसद खर्च आणि किमान निर्यात मूल्यामुळे बासमती तांदळाच्या स्थिर मागणीमध्ये अडथळे येऊ शकतात.

निर्यातदार सकारात्मक

सकारात्मक नोंदीवर, भारतीय अन्न महामंडळाच्या मध्यवर्ती पूलमध्ये भारताचा तांदूळ साठा १ डिसेंबरपर्यंत ५६ दशलक्ष टन होता, जो दरवर्षी १५ टक्क्यांनी वाढला आहे. सततच्या निर्बंधांबद्दल चिंता असूनही, स्टॉकची पातळी सरकारच्या बफर स्टॉकच्या प्रमाणापेक्षा खूप वर आहे, ज्यामुळे निर्यातीतील मर्यादांमध्ये शिथिलता मिळण्याची आशा आहे. निर्यातदार आशावादी आहेत की या हंगामात खरेदीची संथ सुरुवात झाल्यामुळे निर्यातीसाठी धानाची उपलब्धता सुधारेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT