Nashik News : केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या माध्यमातून किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत होणाऱ्या कांदा खरेदीत भारतीय राष्ट्रीय सहकारी पणन महासंघाने (नाफेड) सहकारी संस्थांना काम दिले. मात्र अवसायनात निघालेल्या सहकारी संस्थेकडून कांदा खरेदी झाल्याचा गंभीर प्रकार जिल्हा उपनिबंधक यांनी काढलेल्या पत्रावरून समोर आला. मात्र आता या निर्णयाला विभागीय सहनिबंधक संभाजी निकम यांनी तुर्तास स्थगिती दिली आहे. परंतु संबंधित संस्थेच्या कागदपत्रांची पडताळणी करून पुढील सुनावणीमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे. तुर्तास दिलासा असला तरी संस्थेवर टांगती तलवार कायम आहे..Onion Procurement Scam : ‘एनसीसीएफ’मध्ये कांदा खरेदीत कमिशनखोरी आता मनमानी.‘नाफेड’ने १.५० लाख टन कांदा खरेदी करताना राज्यातील एकूण २५ सहकारी संस्थांची निवड केली. त्यानुसार पिंपळगाव बसवंत येथे बाळासाहेब ठाकरे अटल नावीन्यपूर्ण सहकारी संस्थेच्या माध्यमातून खरेदी सुरू होती. दरम्यान, जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी यांनी या संस्थेच्या कागदपत्रांची पडताळणी केली असता संस्थेची निवडणूक प्रक्रिया पार पडलेली नाही, ताळेबंद सादर न केल्याने संस्थेचे संचालक मंडळ परस्पर बदलण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी सहकार कायद्याच्या आधारे संस्था अवसायनात निघाल्याबाबत पत्र काढून नोटीस बजावली होती..NAFED Onion Procurement: अवसायनातील संस्थेकडून ‘नाफेड’ची कांदा खरेदी.उपनिबंधक मुलाणी यांनी कारवाईचे आदेश दिल्यावर ‘नाफेड’ने तत्काळ ही बाब गांभीर्याने घेत खरेदी केलेला कांदा ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. तुर्तास या कांद्याचा साठा संबंधित खरेदीदार संस्थेकडे आहे. मात्र याबाबत पुढे कारवाईची प्रक्रिया सुरू होती. अशातच या संबंधित संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल केले. विभागीय सहनिबंधक निकम यांनी संबंधित संस्थेची बाजू ऐकून घेत कागदपत्रांची पडताळणी होईपर्यंत संस्थेवरील कारवाईला तूर्तास स्थगिती दिल्याचे समजते..कारवाई, स्थगितीवर संशयाचे ढग‘नाफेड’मध्ये यापूर्वी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या महासंघाच्या माध्यमातून कांदा खरेदी करत असलेले काही व्यापारी, भांडवलदार यांनी मोठी लूट केली. त्यातील काहींचे गैरप्रकार समोर आले. त्यातील काहींना यंदा काम मिळाले नाही, अशा घटकांनीच अप्रत्यक्ष तक्रारी करून या संस्थेची माहिती यंत्रणेला पुरवली. त्यानुसार अवसायनात संस्था असल्याबाबत नोटीस पुढे आली. मात्र आता पुन्हा यातील मोठा गोंधळ झाकण्यासाठी संबंधित संस्था पुढे सरसावली आहे. याबाबत सहकारी संस्थांच्या नाशिक विभागीय सहनिबंधकांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.