Rice Export : भारताच्या तांदूळ निर्यातबंधनामुळे जागतिक पातळीवर धास्ती

Rice Export Ban : भारताने तांदूळ निर्यातीवर निर्बंध लादल्याने जागतिक पातळीवर मोठा पेच निर्माण झाला आहे. कारण जागतिक तांदूळ निर्यातीत भारताचा हिस्सा ४० टक्के आहे.
Rice Export
Rice ExportAgrowon
Published on
Updated on

Rice Market Update : भारताने तांदूळ निर्यातीवर निर्बंध लादल्याने जागतिक पातळीवर मोठा पेच निर्माण झाला आहे. कारण जागतिक तांदूळ निर्यातीत भारताचा हिस्सा ४० टक्के आहे. यामुळे आयातदार देश अडचणीत येऊन या देशांची अन्नसुरक्षा धोक्यात येऊ शकते.

आफ्रिका आणि मध्य पूर्वेतील देश तांदळासाठी मोठ्या प्रमाणात भारतावर अलंबून आहेत. या देशांनी आता फक्त भारतावरच अवलंबून न राहता तांदूळ आयातीसाठी इतरही अनेक पर्याय शोधावेत, असे व्हिएन्ना येथील काॅम्प्लेक्सिटी सायन्स हब आणि ऑस्ट्रिया सप्लाय चेन इन्टेलिजन्स इन्स्टिट्यूट या दोन्ही संस्थांनी सूचवले आहे.

जागतिक पातळीवर तांदळाची भाववाढ आणि टंचाई लक्षात घेतली तर या देशांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे या देशांनी केवळ भारतावर अवलंबून न राहता आपली गरज भागविण्यासाठी इतर वेगवेगळ्या देशांकडून आयातीसाठी चाचपणी करावी; कारण यापुढील काळात भारताकडून आणखी धक्के बसू शकतात. त्याआधी आयातीचे पर्याय निर्माण धुडाळावेत. वाहतुकीच्या अडचणी आणि राजकीय धोरणात्मक बाबी त्यात अंतर्भूत असल्यामुळे नवीन पर्याय निर्माण करण्यासाठी वेळ लागतो असेही या संस्थांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.

Rice Export
Export Non Basmati Rice : केंद्राचा सात देशांना दिलासा; गैर-बासमती तांदूळ निर्यात करण्यास दिली मान्यता

भारतात यंदा दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे तांदूळ उत्पादनाला फटका बसू शकतो. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे भारत २०२४ मध्ये तांदूळ निर्यातीवरील निर्बंध कायम ठेवेल, अशी दाट शक्यता आहे. भारताने जुलै २०२३ मध्ये बिगर बासमती आणि पांढऱ्या तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घतली. तर अर्ध उकडलेल्या तांदळाच्या निर्यातीवर २० टक्के शुल्क लावले.

तसेच बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य ९५० डाॅलर प्रतिटन केले. निर्यातीवरील भारताचे हे निर्बंध पुढील वर्षीही कायम राहिल्यास जागतिक बाजारात तांदळाच्या भावात आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाज काॅम्प्लेक्सीटी सायन्स हब आणि ऑस्ट्रिया सप्लाय चेन इन्टेलिजन्स इन्स्टिट्यूट या दोन्ही संस्थांनी व्यक्त केला आहे.

या संस्थांनी आपल्या अहवालात म्हटले आहे, की जागतिक तांदूळ निर्यातीत भारताचा वाटा मोठा आहे. मध्य आशिया आणि आफ्रिकेतील अनेक देश तांदळासाठी भारतावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. या देशांना भारतातूनच मोठ्या प्रमाणात तांदळाचा पुरवठा केला जातो. भारताने निर्यातीवरील निर्बंध आणखी एक वर्ष कायम ठेवल्यास या देशांना तांदूळ मिळण्यात अडचण येईल.

Rice Export
Rice Export : तांदळाच्या निर्यातीवर २० टक्‍के शुल्क ; पूर्व विदर्भातील ‘राइस मिल’ उद्योग संकटात

भारतात तांदळाची टंचाई भासत असल्यामुळे मागील वर्षभरात भावात जवळपास ११.५ टक्के वाढ झाली. जागतिक बाजारात भारतापाठोपाठ तांदूळ निर्यात करणाऱ्या थायलंड आणि व्हिएतनाम या देशांमध्येही भाववाढ झाली. थायलंडमध्ये तांदळाचे भाव १४ टक्क्यांनी वाढले, तर व्हिएतनाममध्ये भावपातळी २२ टक्क्यांनी वाढली आहे.

या पार्श्‍वभूमीवर दीर्घकाळासाठी वेगवेगळ्या देशांकडून तांदूळ आयातीचे पर्याय निर्माण केले तर जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली, तरी आयात करण्यात अडचणी येणार नाहीत. पण असे आयातीचे पर्याय निर्माण करण्यासाठी खर्चही जास्त येऊ शकतो. परंतु अशा संकटाच्या काळात पुरवठ्याची हमी मिळवून देण्यासाठीची किंमत म्हणून या खर्चाकडे पाहिले पाहिजे, असे काॅम्प्लेक्सिटी सायन्स हब आणि ऑस्ट्रिया सप्लाय चेन इन्टेलिजन्स इन्स्टिट्यूट या संस्थांनी म्हटले आहे.

भारताने तांदूळ निर्यातीवर निर्बंध लादले तरी ज्या देशांबरोबर मैत्रीचे संबंध आहेत, त्या देशांच्या सरकारांनी मागणी केली तर बिगर बासमती तांदळाची निर्यात करण्यात येईल. कारण मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या देशांच्या अन्नसुरक्षेची काळजी भारतालाही आहे, असे कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

पण देशातील एकंदर परिस्थिती पाहता येत्या काळात केंद्र सरकार तांदळाची निर्यात संपूर्णपणे बंद केली तरी आश्चर्य वाटणार नाही. तसे झाल्यास आफ्रिका आणि मध्य पूर्वेतील देशांना मोठ्या अडणीला सामोरे जावे लागू शकते. दुसऱ्या बाजूला भारतातील भात उत्पादक शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com