Tur Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Rate : तुरीच्या दरात प्रतिक्विंटल १०० ते २०० रुपयांची घट

Team Agrowon

Amravati News : स्थानिक बाजार समितीत गेल्या आठवड्यापासून तुरीला बारा हजार रुपये क्विंटलचा दर मिळत होता. आता मात्र अमरावतीसह विदर्भातील बहुतांश बाजारांमध्ये तुरीचे दर सरासरी शंभर ते दोनशे रुपये क्विंटलने कमी झाले आहेत. सोमवारी (ता.२२) अमरावती बाजार समितीत तुरीला कमीत कमी ११,००० तर जास्तीत जास्त ११,९०० रुपये असा दर मिळाला. २२६२ क्विंटलची आवक नोंदविण्यात आली.

अमरावतीसह नागपूरच्या कळमना बाजार समितीत तुरीने बारा हजार रुपयांचा पल्ला गाठला होता. आता मात्र तुरीचे दर काहीसे दबावात आले आहेत. प्रतिक्विंटल सरासरी १०० ते २०० रुपयांची घट तुरीच्या दरात नोंदविण्यात आली आहे. यापुढील काळात पुन्हा तूर १२ हजार रुपये क्विंटलच्या पुढे जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. यवतमाळ बाजार समितीचा विचार करता १८ एप्रिल रोजी या बाजारात ९ हजार ते दहा हजार १७५ असा दर तुरीला मिळाला होता.

त्यानंतर याच बाजारात दुसऱ्या दिवशी ९००० ते ९९०० या दराने तुरीचे व्यवहार झाले. ९,२०० ते १०,१८५ असा दर २० एप्रिल रोजी याच बाजारात तुरीला मिळाला. सोमवारी (ता. २२) यवतमाळ बाजार समितीत ९,७५० ते ११,६७५ या दराने तुरीचे व्यवहार झाले. यवतमाळ बाजार समितीत तुरीसोबत हरभऱ्याचे दर देखील दबावात असल्याचे चित्र आहे.

अमरावती बाजार समितीत हरभऱ्याने ६१०० रुपये क्विंटलचा टप्पा गाठला आहे. यवतमाळ बाजार समितीत त्याचवेळी ४५०० ते ५९०० असा दर हरभऱ्याला मिळाला.

सात क्विंटलची उडीद आवक

अमरावती बाजार समितीत सोमवारी अवघ्या सात क्विंटल उडदाची आवक नोंदवली गेली. ७,३०० ते ८,००० असा दर उडदाला मिळाला. त्याचवेळी मुगाची मात्र आवक झाली नाही. ७,५०० ते ९,१०० असा दर मुगाचा जाहीर करण्यात आला.

कापूस पोहोचला ७४०० रुपयांवर

अमरावती आणि यवतमाळ दोन्ही बाजार समिती अंतर्गत कापसाची आवक होत आहे. सोमवारी अमरावती बाजार समितीत अवघ्या वीस क्विंटल कापसाची आवक नोंदविण्यात आली. याला ६,८००ते ७,३५० असा दर मिळाला. त्याचवेळी ‘कॉटन सिटी’ अशी ओळख असलेल्या यवतमाळ बाजार समितीमध्ये कापसाला ७४०० रुपयांचा दर मिळाला, असे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT