Tur Production : परभणी जिल्ह्यात तुरीची उत्पादकता सरासरीहून कमी

Tur Market : परभणी जिल्ह्यातील २०२३-२४ च्या खरीप हंगामातील तुरीची प्रतिहेक्टरी सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी ११.४५ क्विंटल (एकरी ४.५८ क्विंटल) आली आहे.
Tur
TurAgrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील २०२३-२४ च्या खरीप हंगामातील तुरीची प्रतिहेक्टरी सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी ११.४५ क्विंटल (एकरी ४.५८ क्विंटल) आली आहे. पीक कापणी प्रयोगाच्या निष्कर्षावरून हे स्पष्ट झाले आहे. मागील पाच वर्षांतील तुरीची सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी ११.६५ क्विंटल आहे. त्या तुलनेत यंदा सरासरी २० किलोने घट झाली आहे.

Tur
Tur Production : नगरमध्ये तुरीचे हेक्टरी सहा क्विंटल उत्पादन

यंदा जिल्ह्यातील ९ पैकी ६ तालुक्यांतील तुरीची उत्पादकता सरासरीपेक्षा कमी आली आहे. सरासरीच्या तुलनेने सर्वाधिक ३.२३ क्विंटल घट परभणी तालुक्यात असून पाथरी तालुक्यात २.४ क्विंटलने घट आली आहे. घट आलेल्या अन्य तालुक्यात जिंतूर, मानवत, गंगाखेड, पालम या तालुक्यांचा समावेश आहे.

२०२३-२४ च्या खरीप हंगामात कृषी, महसूल, ग्रामविकास विभागातर्फे जिल्ह्यातील सर्व ९ तालुक्यांमध्ये तुरीचे १९२ पीककापणी प्रयोग घेण्यात आले. प्रयोगाच्या निष्कर्षावरून सरासरी ११ क्विंटल ४५ किलो उत्पादकता आल्याचे स्पष्ट झाले आहे. परभणी तालुक्याची उत्पादकता प्रतिहेक्टरी ८.४३ क्विंटल, जिंतूर तालुक्यात ११.५२ क्विंटल, सेलू तालुक्यात १२.९८ क्विंटल, मानवत तालुक्यात ११.०४ क्विंटल, पाथरी तालुक्यात ९.२५ क्विंटल, सोनपेठ तालुक्यात १५.६६ क्विंटल, गंगाखेड

Tur
Tur Market : देशभरात तुरीच्या भावाची चढती कमान

तालुक्यात ११.०९ क्विंटल, पालम तालुक्यात ११.५८ क्विंटल, पूर्णा तालुक्यात १२.५९ क्विंटल उत्पादकता आली आहे. परभणी जिल्ह्यात २०१७-१८ ते २०२१-२२ या पाच वर्षात तुरीचे सरासरी क्षेत्र ४५ हजार ४१३ हेक्टर असून, सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी ११.६५ क्विंटल आहे. गतवर्षी २०२२-२३ मध्ये ३६ हजार ४७४ हेक्टरवर पेरणी झाली असतांना प्रतिहेक्टरी ९.२३ क्विंटल उत्पादकता आली होती.

२०२३ च्या खरिपात ३७ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. जुलै, ऑगस्टमधील पावसाचा दीर्घ खंड पडला. जिरायती क्षेत्रातील तुरीच्या वाढीवर परिणाम झाला. फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतांना नोव्हेंबरमध्ये अतिवृष्टी झाली. त्यानंतर बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे तुरीच्या उत्पादकतेवर परिणाम झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com