Nashik News : कांद्याला योग्य दर मिळत नसल्यामुळे विंचूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलन सकाळी दहा वाजता विंचूर उपबाजारं समितीच्या प्रवेशद्वारासमोर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर संघटनेचे नेते निवृत्ती गारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती..नेते गारे यांनी यावेळी सांगितले की, सध्या शेतकऱ्यांच्या कांद्याला केवळ २०० ते जास्तीत जास्त १२०० रुपयांपर्यंतचा भाव मिळत आहे. तर कांद्याचा उत्पादन खर्च पंधराशे रुपये होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. कांद्याला अडीच ते तिन हजारदर मिळणे अपेक्षित आहे. .Onion Market : निर्यात धोरणाचा, बाजार हस्तक्षेपाचा कांदा दरावर विपरीत परिणाम.केंद्र सरकारने नाफेड आणि एनएसएफद्वारे खरेदी केलेला कांदा सध्या बाजारात विक्रीसाठी येत आहे. ज्यामुळे दरात आणखी घसरण होत आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांचा कांदा विकून होईपर्यंत केंद्राने खरेदी केलेला कांदा बाजारात विक्रीसाठी आणू नये. .Onion Price Drop: बेळगाव बाजारात कांद्याचे भाव घसरले; शेतकरी चिंतेत.तसेच सोयाबीनला सध्या मिळणारा चार हजार दर अपुरा असून, केंद्र सरकारने सात हजार रूपये हमीभाव सोयाबीनला दिला पाहिजे, तरच शेतकऱ्याला दोन पैसे मिळतील..तसेच, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही एकरकमी एफआरपी देण्याचा न्यायालयाचा आदेश असतानाही साखर कारखाने त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. या पार्श्वभूमीवर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस, कांदा व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी या रास्ता रोको आंदोलनातून लावून धरली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.