Khandesh Urad Market Price : खानदेशातील बाजारांमध्ये उडदाची घटली आवक

Black Gram Khandesh Market Rate : देशातील बाजारात सध्या उडदाचे भाव टिकून आहेत. यंदा सरकारने उडदासाठी ६ हजार ६०० रुपये हमीभाव जाहीर केला. पण देशात उडदाचे उत्पादन कमी झाल्याने बाजारात आवक घटली आहे. त्यामुळे सध्या उडदाला सरासरी ८ हजार ५०० ते ९ हजार रुपये दर मिळत आहेत.
Urad
UradAgrowon

Urad Market Rate : खानदेशातील बाजारांत अद्याप उडदाची हवी तशी आवक नाही. काही गावांत शेतकऱ्यांनी उडदाची खरेदीदारांना थेट विक्री केली असून, त्यास ८ हजार ५०० ते ९ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला आहे.

Urad
Kharif Sowing : नांदेड जिल्ह्यात ज्वारी, उडीद, मुगाचा पेरा घटला

अनेक भागांत उडदाची पाऊस उशिरा आल्याने पेरणी झालेली नाही. जळगाव जिल्ह्यात अमळनेर, चोपडा, पारोळ्यातील काही भाग, चाळीसगाव, धुळ्यात शिरपूर, साक्री भागात उडदाची पेरणी झाली.

त्यात काही शेतकऱ्यांनी तुषार सिंचनाच्या मदतीने पीक वाचविले. पण खानदेशात अपेक्षित क्षेत्रात पेरणी होऊ शकलेली नाही. जळगाव जिल्ह्यात दरवर्षी १६ ते १७ हजार हेक्टरवर उडदाची पेरणी केली जाते. परंतु एवढी पेरणी झालेली नाही. पेरणी फक्त ६० ते ६५ टक्केच झाली आहे.

Urad
Tur and Urid Stock : तूर आणि उडीद डाळीच्या साठ्याबाबत सरकारकडून निर्बंध, कायदा मोडल्यास होणार कारवाई

धुळे व नंदुरबारातही अशीच स्थिती आहे. यात काही शेतकऱ्यांच्या क्षेत्रातील उडदाची कापणी झाली आहे. लवकरच काढणीदेखील होईल. अनेक शेतकऱ्यांनी कापूस पिकात आंतरपीक म्हणून पेरणी केली होती. त्यात शेंगा पक्व झाल्या आहेत.

पण पावसाने या शेंगांत पूर्णतः दाणे पक्व झालेले नाहीत. अशात काही शेतकरी शेंगा तोडून त्यांची घरी पारंपरिक पद्धतीने मळणी करून घेत आहेत. बाजार समित्यांत उडदाची आवक अल्प किंवा नगण्य आहे.

त्यात फक्त धुळ्यातील शिरपूर, जळगावमधील अमळनेर बाजार समितीत उडदाची काही शेतकऱ्यांकडून आवक झाली. पण तीदेखील अल्प किंवा ४० ते ५० किलो एवढीच राहिली.

जळगावातील चोपडा, जळगाव या बाजार समित्यांत कुठलीही उडदाची आवक झालेली नाही. मागील आठवड्यात अमळनेर, शिरपूर, साक्री या भागात मिळून फक्त १० क्विंटल उडदाची आवक झाली आहे.

त्याचे दर साडेआठ हजार रुपयांवरच आहेत. उडदाची ही सुरुवातीची स्थिती आहे. पुढील सात ते आठ दिवसांनंतर आवक व उलाढाल काहीशी अधिक राहील, अशी माहिती मिळाली. परंतु यंदा मागील हंगमाच्या तुलनेत उत्पादन, आवक कमीच राहण्याचे संकेतही आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com