Banana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Market : खानदेशात केळीची आवक कमी

Banana Update : खानदेशात केळीची आवक कमी होत आहे. दुसरीकडे सणासुदीनिमित्त कामगार उपलब्धता कमी झाली आहे. तसेच खरेदीदार केळीची खरेदी टाळत आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात केळीची आवक कमी होत आहे. दुसरीकडे सणासुदीनिमित्त कामगार उपलब्धता कमी झाली आहे. तसेच खरेदीदार केळीची खरेदी टाळत आहेत. यामुळे केळी दरात कुठलीही सुधारणा झालेली नाही.

केळीची कमी दरातील खरेदी सुरूच आहे. केळीला किमान १३०० व कमाल १८०० ते १९०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. केळीची आवक खानदेशात सध्या प्रतिदिन सरासरी १२० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) एवढी आहे.

आवक जळगाव, जामनेर, चोपडा, यावल, पाचोरा, भडगाव या भागांत अधिक आहे. रावेर, मुक्ताईनगरात आवक कमी आहे. चोपडा, जळगाव, जामनेर आदी भागांत दर्जेदार केळी उपलब्ध आहे. यामुळे केळीला या भागात चांगल्या दरांची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

केळीचे दर रावेर व अन्य बाजार समित्या कमाल २००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत जाहीर करीत आहेत. परंतु एवढा दर कुठेही शेतकऱ्यांच्या हाती येत नसल्याची स्थिती कायम आहे. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथेही केळीचे दर १२०० ते १६५० व कमाल १८०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. बऱ्हाणपुरातील दरांनुसार खानदेशात केळीची खरेदी केली जात असल्याची माहिती मिळाली.

केळी आवकेत मागील आठवड्यात घट झाली आहे. केळीला उत्तरेकडे मागणी आहे. राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, काश्मिर आदी भागात केळीची पाठवणूक केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vidarbha Heat Wave: विदर्भातील तीन जिल्ह्यांत अति उष्णतेची लाट; मध्य महाराष्ट्रातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज

Banana Variety Selection: कमी पावसातील लागवडीसाठी केळीचा कंद निवडताना काय तपासावे?

Cotton Cultivation: अकोल्यात कपाशीच्या लागवडीत वाढीची शक्यता

Online RTI Portal: क्षेत्रीय कार्यालयांतही ऑनलाइन माहिती अधिकार

Petrol Diesel Shortage: पेट्रोल- डिझेलचा साठा, मग पंपांवर रांगा का?; मुख्यमंत्री फडणवीसांनी खरं कारण सांगितलं

SCROLL FOR NEXT